सुष्मिता… मोदी… आणि बरचं काही !

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन यांनी लग्न केले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे

टीम बाईमाणूस

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन यांनी लग्न केले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी मालदिवमध्ये लग्न केले, अशाही चर्चा सुरु झाल्या. यानंतर स्वतः ललित मोदी यांनी लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ललित मोदी यांनी आम्ही दोघांनी लग्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आम्ही सध्या एकमेकांना ‘डेट’ करत आहोत, अशी कबुली दिली.

तीन वेळा रिलेशनशीपमध्ये असूनही सुष्मिता सेनने आत्तापर्यंत लग्न केलं नव्हत. सुष्मिता सेनचे वय 46 वर्ष आहे. मात्र आम्ही सध्या डेट करतोय एवढीच माहिती सुष्मिता सेन हीच्याकडून देण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सुष्मिता काही दिवसांपासूर्वी रोहमनसोबत रिलेशनशिपमध्ये होती मात्र काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. रोहमन सुष्मिताच्या मुली आणि तिच्या कुटुंबाच्याही खूप जवळचा होता.

ललित मोदी यांनी देशात आयपीएलची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबीताल अनेकांना आयपीएलमध्ये पार्टनरशीपही दिली होती. त्यांनी केलेल्या कामाचा फायदा त्यांच्या नीकटवर्तीयांनाच मिळाल्याचा आक्षेप आहे. 2008 साली आय़पीएल आल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्याचे श्रेयही ललित मोदींच्या पदरात पडले. 2005 ते 2010 त्यांच्याकडे बीसीसीआयच्या अपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. 2008 ते 2010 या काळात त्यांच्याकडे आयपीएलचा कार्यभार होता. ते आयपीएलचे अध्यक्ष आणि कमिश्नर होते. 2010 साली घोटाळ्याच्या आरोपावरुन त्यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.

ललित मोदींनी केलेलं पहिलं ट्विट

विशेष म्हणजे याआधी ललित मोदी यांनी स्वतः सुश्मिता सेनला ‘बेटर हाफ’ म्हणत तिच्यासोबतचे काही फोटो ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये ललित मोदी म्हणाले, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.” अशा आशयाचे ट्विट केलं होतं.

सुश्मिता लग्नाच्या बेडीत आजवर का अडकली नाही?

वयाची पंचेचाळीशी ओलांडल्यानंतरही सुष्मिताने लग्न केलं नाही पण लग्न न करण्यामागे सुष्मिताने जे कारण सांगितलं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गेल्याच महिन्यात ट्विंकल खन्नाच्या टॉक शोमध्ये सुष्मिताने हजेरी लावली होती. यावेळी सुष्मिताने तिच्या खासगी आयुष्याबाबत बोलताना म्हटलं की, “मला मुलं आहेत म्हणून मी आजवर लग्नच केलं नाही असं लोकांना वाटत असेल. पण यामागचं कारण काही वेगळंच आहे. रेनीला मी दत्तक घेतलं. पण त्यानंतर माझं पहिलं प्राधान्य कोण असेल? हे समजून घेणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली नाही. कोणी जबाबदारी सांभाळावी अशी माझी अपेक्षा नाही. पण मी माझ्या मुलींपासून लांब राहू शकत नाही. माझ्या मुलींना माझी गरज आहे.”

सुष्मिताने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, “नशिबाने माझ्या आयुष्यामध्ये चांगली मुलं सुद्धा आली. पण मी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही कारण मी ज्यांची निवड केली तेच माझ्यावर नाराज होते. यामध्ये माझ्या मुलींचा काही दोष नाही. माझ्या मुली कधीच माझ्या नात्याआड आल्या नाहीत. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तींचा त्यांनी आदर केला आहे.

लग्न न करण्यामागे सुष्मिताची वेगळी कारणं आहेत. पण आता सुष्मिता-ललित लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ललित मोदींनी शेअर केलेल्या फोटोंमधून सुष्मिता आणि त्यांच्यातील जवळीक दिसून येतेय. ललित मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “माझ्या लग्नाबाबतच्या वृत्तावर स्पष्टीकरण देण्यासाठी हे ट्वीट करत आहे. आम्ही लग्न केलेलं नाही. सध्या आम्ही केवळ एकमेकांना ‘डेट’ करत आहोत. लग्न देखील एक दिवस होईल.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here