माड-भात खाणार… तरीही वर्ल्डकप फुटबॉल खेळणार

झारखंडच्या आदिवासी अनिता कुमारीचा मातीच्या घरापासून अंडर-17 विश्वचषक फुटबॉल संघाच्या शिबिरापर्यंतचा प्रवास.

रिना महतोले – पुजा येवला / ३० मे २०२२

आई-वडील मजूर आणि मुलगी ‘फिफा’च्या अंडर-१७ टीममध्ये… ही कहाणी आहे रांचीच्या अनिताकुमारीची. अतिशय कमी वयात आणि हलाखीच्या परिस्थितीत असूनही अनिताने फिफा अंडर-१७ च्या विश्वचषक फुटबॉल शिबीरात स्वत:चे स्थान निश्चित केले आहे. अनिताच्या घरी दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असताना तिने हे दाखवून दिले आहे की, श्रीमंत असो वा गरिब… जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही पुढे जाऊ शकता.

सध्या झारखंडमध्ये भारताच्या १७ वर्षांखालील महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या शिबीरामध्ये झारखंडच्या सात मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंतिम 33 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. गोलरक्षक अंजली मुंडा, कर्णधार सेलिना कुमारी, सुधा अनिता टिर्की, अष्टम ओराव, पूर्णिमा कुमारी, मिडफिल्डर नीतू लिंडा आणि विंगर अनिता कुमारी या त्या मुली… ही सर्व नावं झारखंडच्या ग्रामीण भागातील असून यातील बहुतांश मुली आदिवासी समाजाच्या आहेत. पण तरीही अनिता कुमारीच्या संघर्षाची कहाणी खास आहे.

गरीब कुटुंबातील पाच मुलींपैकी एक

पाच बहिणींपैकी एक असलेल्या अनिता कुमारीचे वडील पूरण महतो यांच्याकडे ना शेती आहे ना कोणताही रोजगार. अनिताची आई आशा देवी यांनी सांगितल्यानुसार, एकापाठोपाठ पाच मुलींना जन्म दिल्यामुळे तिचा 50 वर्षीय पती पहिल्या मुलीच्या जन्मापासूनच संतापलेला असायचा. या रागातूनच त्याला दारूचे व्यसन जडले. आशा देवी सांगतात की, “मुलींच्या जन्मानंतर माझे पती नाराज होऊन आईसोबत राहू लागले. अंमली पदार्थांचे व्यसन पूर्वीपासूनच होते, जे कालांतराने वाढतच गेले. त्यांना खूप समजावले की मुलगा आणि मुलगी सर्व समान आहेत,पण तो कुटुंबापासून दूर गेला.”
त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आशादेवींच्या खांद्यावर आली. त्यांनी सुरुवातीला वीटभट्टीवर काम केले. मात्र उत्पन्न कमी असल्याने ती मजूर बनली. या कामासाठी त्यांना दररोज 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. रोजंदारी म्हणून त्यांना आता अडीचशे रुपये मिळतात. या रकमेपैकी 50 रुपये दररोज कामावर जाण्यासाठी ऑटो किंवा ट्रेकर भाडे म्हणून खर्च केले जातात. मात्र त्यांना दररोज कामही मिळत नाही.

कुटुंबाकडे रेशनकार्डही नाही

रांचीच्या कानके ब्लॉकमधील ‘चारी हुजीर’ गावात राहणाऱ्या आशा देवी यांच्या घराच्या भिंती मातीच्या आहेत. त्यांच्या घराच्या छताचा अर्धा भाग टाइलचा आणि अर्धा भाग एस्बेस्टोसचा आहे. त्यांच्या घरात नाममात्र भांडी आहेत. या घरात राहून स्वत: पाच मुलींचे संगोपन करणाऱ्या आशा देवी म्हणाल्या, “एका आठवड्यापूर्वी अनिताची मोठी बहीण जी बीए पास आहे, तिचे लग्न पार पडले. तीन मुलींच्या लग्नाची जबाबदारी पार पाडल्यानंतर 4 लाख रुपयांचे कर्ज झाले. चौथी मुलगी अनिता भारतीय महिला फुटबॉल संघाचा भाग असून रांची महिला महाविद्यालयातून शिक्षण घेत आहे. पाचवी मुलगी सुनीता फुटबॉल खेळण्यासोबतच शिक्षण घेत आहे. बीबीसीशी संवाद साधताना आशा देवी यांनी सांगितले की, आजही त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. सासू-सासऱ्यांच्या रेशनकार्डवर मिळणाऱ्या धान्याचा थोडासा भाग त्यांना मिळतो.
आशा देवी सांगतात, “सासूने दिलेल्या पाच किलो तांदूळाने घर कसं चालणार. रेशनकार्ड बनवून देण्यासाठी मी गावातल्या मूखियाला अनेकदा विनंती केली, पण फक्त आश्वासनं मिळाली.”

पाच मुली झाल्यामुळे आईला मिळाले टोमणे

पाच मुली झाल्याचा टोमणा ऐकून आशा देवी यांचे आयुष्य कष्टमय झाले होते. पण अनिताच्या यशाने त्यांच्या जखमांवर उपचार करण्याचे काम केले आहे. ती म्हणते, “माझी मुलगी अनिता ही मुलगी नसून मुलगा आहे. अनिताने आमच्या गावासह झारखंडचा नावलौकिक मिळवला आहे.” आशा देवी सांगतात की, मुलीने मजबुरीने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. “आमच्याकडे शेत असेल तर माझ्या मुली शेतावर काम करतील, जेव्हा तिला काम नसतं तेव्हा ती फुटबॉल खेळू लागली.

“सुरुवातीला अनिताला खेळताना पाहून गावातील लोक म्हणायचे की, तुमची मुलगी पुरुषासारखी हाफ पँट घालून फुटबॉल खेळते. तिला शिकवा, गुंडागिरी शिकवू नका. पण आता तिचे यश पाहून टीकाकार म्हणू लागले की गरीबाची मुलगी पुढे गेली आहे.”

फक्त माड-भात खात असतानाचा व्हिडियो व्हायरल

अनिताच्या घरची आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की तिला फक्त माड-भात खाऊनच दिवस ढकलावा लागायचा. अनिताचा एक व्हिडियो मध्यंतरी भलताच व्हायरल झाला ज्यात ती माड-भात खाऊन आपलं पोट भरत आहे आणि फुटबॉल सराव करत आहे.

गावकरी फुटबॉल मैदानात काचेचे तुकडे फेकायचे

गावात अनिताचे प्रशिक्षक असलेले आनंद प्रसाद गोपे म्हणतात की, सुमारे ४०० घरे असलेल्या या चेरी-हुजीर गावात बालविवाह सर्रास होतात, मुली गावाबाहेर पाय ठेवू शकत नाहीत. 2013 मध्ये जेव्हा मी अनितासह 15 मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित केले. मात्र गावातील लोकांनी सुरुवातीला विरोध केला. त्यांच्या निषेधाची अट अशी होती की, मुलींनी फुटबॉल खेळू नये म्हणून ते फुटबॉलच्या मैदानात काचेचे तुकडे फेकायचे. पण अनिता खेळत राहिली.”
प्रशिक्षक सांगतात की ,अनिताने 2018 मध्ये झारखंड संघात निवडीसाठी चाचणीत तिला झारखंड संघात स्थान मिळाले. त्यानंतर अनिताने पुण्यातील अंडर-14 शालेय राष्ट्रीय स्पर्धेत जे यश मिळवले, तेच तिच्या विश्वचषक संघात निवड झाल्याने कायम आहे.”

टीकाकारांना अभिमान आहे

FIFA U-17 विश्वचषक स्पर्धेसाठी जमशेदपूर येथे सुरू असलेल्या भारतीय संघाच्या शिबिराचा भाग बनलेल्या अनिता कुमारीने झारखंडकडून खेळताना आतापर्यंत 15 गोल केले आहेत. आशा देवी म्हणतात, ‘खेड्यात आमच्यावर टीका करणाऱ्यांना आज अनिताच्या कामगिरीचा अभिमान वाटतोय’. अनिता सांगते की तिच्या घरी टीव्ही नाही, पण जेव्हा ती खेळायला जाते तेव्हा तिची आई टीव्हीवर सामना पाहण्यासाठी तिच्या नातेवाईकाच्या घरी जाते.

अंडर-17 फिफा कप खेळल्यानंतर तुमची पुढील वाटचाल काय असेल? या प्रश्नाच्या उत्तरात अनिता म्हणाली की, मला अंडर 17 मध्ये चांगली कामगिरी करताना भारताच्या वरिष्ठ संघाचा भाग व्हायचे आहे. भविष्यात मला वंचित कुटुंबातील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण द्यायचे आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here