- सुकेशनी नाईकवाडे
आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. असं कोणतेही क्षेत्र नाही कि ज्या ठिकाणी महिलांनी शिखर गाठण्याचा बाकी ठेवलं आहे. आता प्रशासकीय क्षेत्रातही बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिली महिला जिल्हाधिकारी पदाचे सूत्र दिपा मुधोळ यांच्या हाती आली आहेत.
याच धर्तीवर बीड जिल्ह्याचा कारभार एक सक्षम महिला जिल्हाधिकारी चांगल्या प्रकारे चालू शकेलं याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दिपा मुधोळ-मुंडे या परळी येथील कन्हेरवाडीच्या सून असून, त्यांचे पती विश्वास मुंडे कोल्हापूरचे आयकर विभागात आयुक्त आहेत. दिपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा नुकताच पदभार राधाबिनोद शर्मा यांच्याकडून स्विकारला आहे. जिल्ह्याच्या इतिहासात आतापर्यंत साधारण 40 जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत प्रथमच दिपा मुधोळ-मुंडे या महिला आहेत. यापूर्वी प्रेरणा देशभ्रतार यांची जिल्हाधिकारी म्हणून झालेली नियुक्ती शासनानेच रद्द केली होती. त्यामुळे आता जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हाती सुत्रे आली आहेत.
जिल्ह्यातील समस्यांचे प्रमाण कमी होणार का?
बीड जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती पाहता गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे समोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, घरगुती हिंसा, अवैध गर्भपात, बालविवाह, यासह अनेक प्रकारच्या घटना जिल्ह्यात सर्रास पाहवयास मिळत आहेत या सर्व प्रकारावर अंकुश बसणार का? असा प्रश्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. तर या सर्व संवेदनशील विषयास जिल्हाधिकारी कसे हाताळणात याकडे ही सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्याच्या राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम मुधोळांच्या कामावर होणार का?
बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता जिल्ह्यात राजकीय लोकप्रतिनिधींचे वर्चस्व जास्त असल्याचे आढळून येते. अश्या परिस्थितीत बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी आपल्या अधिकारांचा पाहिजे तेवढा वापर न केल्याने जिल्ह्यातील सामान्य जनतेची नाराजी दिसून येतेय. मात्र सद्य स्थितीत बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच एक महिला जिल्हाधिकारी म्हणून आल्याने त्यांच्याकडे जिल्हावासियांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ आपल्या अधिकाराचा परिपूर्ण वापर करत जिल्ह्यात महिला शक्तीची ताकद दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
संबंधित वृत्त :
जिल्ह्यातील वाढत्या अवैध कामांना लगाम बसणार का?
शासनाला सर्वाधिक विश्वास महसूलवरच असून, रिझल्ट देणारा हा एकमेव विभाग आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अशा कुठल्याही कामांना महसूल विभाग पुढे असतो. मात्र जिल्ह्यातील वाढते अवैध धंदे हे दिवसेंदिवस बोकाळत चालले आहेत आणि या धंद्यांना लगाम कसण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांवरही जबाबदाऱ्या टाकल्या जाणार का? तसेच प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत अवैध वाळू उपसा, अवैध वीटभट्या, अवैध राखेची तस्करी, तसेच भूमाफिया यांचा चालणारा मनमानी कारभार थांबण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या कोणती भूमिका निभावणार? यासह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना राबवणार यासह अनेक विषयांकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्याचे दिसून येत आहे.
खूपच चांगल्याप्रकारे माहिती आहे , खूप खूप धन्यवाद, मला पण support kra Latest posts