“हा रस्ता माझा आहे आणि मी यावर भरारी घेणार आहे!”

दिल्ली परिवहन मंडळात नुकत्याच रुजू झालेल्या महिला चालकांची गोष्ट

  • टीम बाईमाणूस

दिल्लीच्या रस्त्यावर डीटीसी बसचे स्टेअरिंग एकेकाळी फक्त पुरुषांच्या हातात दिसत होते, पण आज शबनम आणि योगिता या दोन महिला चालक ही परंपरा मोडून बसेस चालवत आहेत. मात्र, या महिला चालकांचे पुरुष सहकारी चांगलेच संतापले असून शबनम आणि योगिता यांनी गाडी चालवण्यात यश मिळवू नये, अशी अनेकांची इच्छा आहे.

गजबजलेल्या दिल्लीच्या रस्त्यावर महिला बस चालवू शकतात यावर त्यांचा विश्वास बसत नाही. पण, दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (DTC) च्या नवीन महिला ड्रायव्हर प्रत्येक आव्हानासाठी सज्ज आहेत, पुरुषांचा हा समज मोडून काढण्यासाठी या महिलांनी आता कंबर कसली आहे. शबनम आणि योगिता या 13 महिला चालकांपैकी आहेत ज्यांना दिल्ली परिवहन महामंडळाने गेल्या शुक्रवारी नियुक्ती पत्र दिले होते, परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण 15,000 पेक्षा जास्त चालक आहेत त्यापैकी महिला चालकांची संख्या आता 34 वर पोहोचली आहे. तथापि, अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीत अवजड मोटार वाहने (MHMVs) चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या “मिशन परिवर्तन” अंतर्गत 31 जानेवारीपर्यंत ही संख्या 100 पर्यंत नेण्याचे DTC (Delhi Transport Corporation) चे उद्दिष्ट आहे.

सध्या असणाऱ्या माहीला चालकांपैकी एका महिला चालकाकडे दुहेरी पदव्युत्तर (दोन विषयांत एमए) पदवी आहे. इतर कुस्तीत चॅम्पियन आहेत. काहींना लहानपणापासूनच रस्त्यावर वाहने चालवण्याची आवड होती. “बस चालवताना असे वाटते की रस्ता माझा आहे आणि मी उडत आहे”, असे 38 वर्षीय योगिता ने माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

योगिताने ने दिल्ली विद्यापीठातून (DU) बीकॉम पदवी प्राप्त केली आहे, तिने वयाच्या 12 व्या वर्षी ऑटो चालविण्यास सुरुवात केली. ती म्हणते, बस चालवल्यामुळे मला जी शांतता मिळते ती खूप अद्भुत आहे.

संबंधित वृत्त :

महिला चालक - baimanus
चालक योगिता पुरिल \ फोटो क्रेडिट : द प्रिंट

पुरुषांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डीटीसीमध्ये योगिताची स्टाईल तिला हजारोंच्या गर्दीत वेगळी बनवते. योगिताला लहानपणापासूनच बाईक आणि कार चालवण्याची आवड आहे आणि ती तिच्या नवीन नोकरीमुळे खूप खूश आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर, 26 वर्षीय मार्शल म्हणाले, “गाडी चालवण्यासाठी एखाद्याचे खांदे मजबूत असावेत आणि शिव्या शिकाव्या लागतात. या महिला महिला शिव्या देऊ शकतील का?” मात्र एकही अपशब्द न वापरता हा दृष्टिकोन बदलण्याचा या महिला चालक प्रयत्न करीत आहेत.

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत म्हणाले होते की, या महिला चालक इतर महिलांसाठी आदर्श आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने महिला कोणत्याही देशात सार्वजनिक वाहने चालवत नाहीत.

‘एका फोन कॉलने माझे आयुष्य बदलले’

दिल्ली परिवहन मंडळाच्या ताफ्यात सामील होण्यापूर्वी, 34 वर्षीय शबनमने नोएडामधील एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून आपला प्रवास सुरू केला, त्यानंतर तिने दिल्लीत शाळेतील शिक्षिका म्हणून काम केले. “एक दिवस मला बुरारी येथील अशोक लेलँड ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून फोन आला आणि माझे आयुष्य पूर्णपणे बदलले.” शबनमने सांगितले की, तिला कळले की मिशन परिवर्तन अंतर्गत, महिला अवजड वाहने चालविण्याच्या परवान्यासाठी विनामूल्य अर्ज करू शकतात, ज्याची किंमत साधारणपणे 15,000 -16,000 रुपये असते आणि पैशांच्या कमतरतेमुळे ती पूर्ण करू शकली नाही. त्यांनी सांगितले की, यापूर्वी कामावर घेतलेल्या 11 महिला चालकांना त्यांचे परवाने यापूर्वीच मिळाले होते.

शबनम म्हणते, “आम्हाला बुरारी येथील केंद्राकडून खूप प्रोत्साहन मिळाले आणि आम्हाला आमच्या इच्छेनुसार वर्गाच्या वेळा देण्यात आल्या.” दीड महिन्यापासून शबनम गाझीपूर येथील तिच्या घरातून दररोज पहाटे 5 वाजता बुरारीच्या संस्थेत जात असे. ती आणि योगिता दोघीही बुरारी इन्स्टिट्यूटमधून ‘प्रशिक्षित’ झालेल्या पहिल्या बॅचमधील आहेत, जिथे सध्या सुमारे 160 महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. जरी, हे प्रशिक्षण या महिलांना नोकरीची हमी देत ​​​​नसले तरीही ते त्यांना परिवहन महामंडळासारख्या इतर ठिकाणी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास तयार करते.

महिला चालक - baimanus
चालक शबनम \ फोटो क्रेडिट : द प्रिंट

भेदभाव आणि असमानता

महिला चालकांना दररोज त्यांच्या लिंगाची आठवण करून दिली जाते. महिला बस चालवण्याच्या कल्पनेवर एक पुरुष प्रवासी हसला – “अब तो अपना विमा करवाना पडेगा.” पुरुष मार्शल म्हणाले, “मी ते लेखी देऊ शकतो… सहा महिन्यांत हे संपूर्ण महिला मंडळ घरी बसेल”. राजघाट बस डेपोमधील अधिकृत शेड्युलिंग ड्युटी करणारा एक अधिकारी दीपक कुमार यांनी या निर्णयाचे स्वागत केले, परंतु महिलांना घरी “अ‍ॅडजस्टमेंट” करावे लागेल असा आग्रह धरला. तो म्हणाला, “गाडी तर चालणार… घरची पण काळजी घ्यावी लागेल. तुमचे जे कर्तव्य आहे ते करा आणि घरी जा. तुम्ही ही आनंदी आणि आम्ही देखील आनंदी”.

मात्र, दिल्ली वाहतूक पोलीस अधिकारी तलवार सिंग यांनी पूर्व दिल्लीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये बस चालवणाऱ्या महिला चालकांवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, तिथे लोक अनेकदा ड्रायव्हिंगचे नियम मोडतात. “त्यांना फक्त मोकळ्या रस्त्यावर सोडले जाईल जिथे ते मुक्तपणे उडू शकतील.” 46 वर्षीय कायमस्वरूपी चालक दलबीर म्हणाला की दिल्लीत बस कशी चालवायची हे कोणालाही माहिती नाही. हातातल्या पाण्याच्या बाटलीकडे बोट दाखवत तो म्हणाला, “मी पाण्याची शपथ घेतो. केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही गाडी कशी चालवायची हे माहित नाही. आगारातील स्वच्छता आणि महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन या मूलभूत गरजांसाठी आम्ही आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

सौजन्य : द प्रिंट

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here