तृतियपंथीयांच्या आयुष्यावर कशिश चित्रपट महोत्सव

सात वर्षांपूर्वी मुंबईत अतिशय थोड्या लोकांच्या उपस्थितीत श्रीधर रंगायन यांनी हा उपक्रम सुरू केला. यात समलिंगी मित्रांनी एकत्र जमणे, एकमेकांना समजून घेणे, विचारांची देवाणघेवाण असा स्वच्छ हेतू होता. त्याला निमित्त म्हणून चित्रपट एकत्र बघणे असा प्रस्ताव समोर आला.

टीम बाईमाणूस / ४ जून २०२२

समलिंगी समुदाय, त्यांचे नातेसंबंध, संघर्ष, जीवनशैली आणि करिअर अशा विषयांना वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी या उद्देशाने मुंबईत कशिश आंतरराष्ट्रीय क्विअर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या ५ जून पर्यंत या महोत्सवातील १८४ हून अधिक चित्रपट, लघुपट ऑनलाईन आणि प्रत्यक्ष स्वरुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जगभरातील समलैंगिकांच्या विश्वावर प्रकाश टाकणारा अशियातील सर्वात मोठा समलैंगिक चित्रपट महोत्सव म्हणून कशिश महोत्सवाची ओळख आहे.

या महोत्सवासाठी ५३ देशांतील ८०० पैकी १८४ हून अधिक चित्रपट निवडण्यात आले असून त्यात ३० भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. तृतियपंथीयांना देण्यात येणारी भेदभावाची वागणूक, त्यांच्यावर होणारा अन्याय यावर अनेक चित्रपटांतून प्रकाश टाकण्यात येतो, असे चित्रपट कशिश महोत्सवात दाखविण्यात येत असल्याचे महोत्सवाचे संचालक श्रीधर रंगायन यांनी सांगितले. प्रेक्षकांची अभिरुचीही बदलली आहे, सगळ्यांना जागतिक चित्रपट पाहायचे असतात. त्यामुळे प्रेक्षक आता अशाप्रकारचे चित्रपटही पाहू लागले आहेत, असेही ते म्हणाले. लिंगबदल (ट्रान्सजेंडर) केलेल्या कलाकारांना चित्रपटात संधी देण्याचा प्रयत्नही या महोत्सवातून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

कशिश आंतरराष्ट्रीय क्विअर चित्रपट महोत्सवाचे नुकतेच मुंबईच्या लिबर्टी चित्रपटगृहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिग्दर्शिका अरुणाराजे पाटील आणि अभिनेत्री दिव्या दत्त उपस्थित होते. चित्रपट पाहण्यासाठी कशिश चित्रपट महोत्सवाच्या वेबसाईटवर नोंदणी करता येऊ शकेल.

या महोत्सवाचा उद्देश केवळ चित्रपट दाखविणे इतका मर्यादित नाही. या निमित्ताने देशभरातील समलिंगी एकत्र जमा होतात. खरेतरे या समलिंगींना समदु:खी असंही म्हटलं पाहिजे कारण अजूनही कायद्याने भारतात या संबंधांना मान्यता नाही. परिणामी एक सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांना धडपडावं लागतं. कुटूंब, समाज, मित्र कुणीच त्यांना फारसे समजून घेत नाही हे या लोकांचे दु:ख आहे. त्यामुळे समलिंगी-म्हणजे समदु:खी असे समिकरण सध्या भारतात होवून बसले आहे.

सात वर्षांपूर्वी मुंबईत अतिशय थोड्या लोकांच्या उपस्थितीत श्रीधर रंगायन यांनी हा उपक्रम सुरू केला. यात समलिंगी मित्रांनी एकत्र जमणे, एकमेकांना समजून घेणे, विचारांची देवाणघेवाण असा स्वच्छ हेतू होता. त्याला निमित्त म्हणून चित्रपट एकत्र बघणे असा प्रस्ताव समोर आला. हे चित्रपट एरव्ही चित्रपटगृहात लागत नाहीत. आता इंटरनेटच्या माध्यमाने हे चित्रपट पाहण्याची चांगली सोय केली आहे. अगदी नुकताच भारतात प्रदर्शित झालेला ‘अलिगढ’ हा गे संबंधांवरील चित्रपट प्रत्यक्ष अलिगढ या गावात प्रदर्शित होवू शकला नाही.

या चित्रपट महोत्सवाला श्याम बेनेगल सारख्या चित्रपट महर्षींने पाठिंबा दिला. सेलिना जेटली सारख्या सेलिब्रिटी नायिकेने याचा पुरस्कार केला. यामुळे समलिंगी लोकांसाठी काम करणार्‍या संस्थांना नैतिक बळ मिळाले. समलिंगींसाठी काम करणार्‍या ‘हमसफर’ संस्थेनेही या महोत्सवाचे सह-आयोजकत्व स्विकारले होते. अशोक रावकवी जे की सातत्याने या प्रश्नावर भारतात आवाज उठवत आहेत ते यात सक्रिय सहभागी होते.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here