बीड जिल्ह्यातील ‘परस’जत्रेची अनोखी परंपरा!

पोटावर चक्क तलवारीचे वार करून जपली जाते परंपरा.

सुकेशनी नाईकवाडे(बीड):-

बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्यामध्ये विडा या गावची परंपरा पाहिली तर दर धुळवडीला या गावात गावच्या जावयाची गाढवावरून धिंड काढली जाते तशीच एक परंपरा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा गावात आहे. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरेचे नाव आहे ‘परस’. काय आहे ही आगळीवेळी परंपरा पाहूयात.

‘परस’ यात्रा नेमकी कधी सुरू झाली?

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात चिंचोली गाव आहे आणि या गावात ही परंपरा अनेक वर्षां पासून चालू असल्याचे गावकरी सांगतात. या परंपरेत दरवर्षी गुरुपौर्णिमेला या गावातून ‘परस‘ नावाची मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक एका बाजूला लाकडी काठी तर दुसऱ्या बाजूला एक जण तलवार घेऊन हा ‘परस’ नावाचा खेळ खेळतात.
यामध्ये चक्क तलवार घेऊन जो व्यक्ती परस खेळतो तो ही तलवार नाचवत असतांना स्वतःच्या अंगावर, पोटावर ही तलवार मारतो आणि या मिरवणुकीमध्ये अनेकवेळा या तलवारीचे घाव पोटावर घेतलेल्या माणसाच्या अंगात कपडे घातलेले नसतात. मात्र त्यांच्या पूर्वजांनी चालवत आणलेली ही परंपरा आजही मोठ्या थाटात गुरुपौर्णिमेला साजरी केली जाते या ‘परस’ साठी सगळं गाव एकत्र येतं.
याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे धारदार तलवार पोटावर मारून देखील कसल्याही पद्धतीची इजा त्या व्यक्तीला होत नसल्याचं या गावातील गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि हा सगळा प्रकार पाहण्यासाठी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ‘परस’ यात्रेला येतात.

https://youtube.com/shorts/jsvTUxLMJR4

विठ्ठल बिरूदेव यांची ‘परस’ मिरवणूक!

बीड जिल्ह्यात अशा कित्येक अनोख्या परंपरा अनेक दशकांपासून चालू आहेत. परस बद्दल पूर्वीची लोकं सांगतात या मिरवणुकीत विठ्ठल आणि बिरुदेव यांची भव्य दिव्य मिरवणूक काढली जाते आणि यावेळी तलवार बाजी चा खेळ केला जातो. या पलीकडे मोठ्या प्रमाणात भंडारा उधळून या मिरवणुकीमध्ये भाविक या यात्रेचा आनंद घेतात ही यात्रा एक दिवसाची असल्याने यात्रेत हजारो भाविक सहभागी झाल्याचे देखील पाहायला मिळते.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here