दलितांना जोडे मारण्याची धमकी…

मुजफ्फरनगरमध्ये दवंडी देऊन संविधानाला खुले आव्हान

टीम बाईमाणूस / ११ मे २०२२

देशाच्या राज्यघटनेने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती घटनेच्या पानांपासून आणि अधिकारांपासून कोसो दूर आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये (muzaffarnagar) उघडकीस आला आहे.  शहरापासून अवघ्या 22 किमी अंतरावर असलेल्या पावटी खुर्द गावातील राजवीर त्यागी ने दलितांना दवंडी देऊन जोड्याने मारण्याची धमकी दिली आहे. राजवीरच्या शेताजवळ, तसेच जवळ असलेल्या हापशीवर आणि घराभोवती  जर कोणी दलित व्यक्ती दिसून आल्यास त्याला जोड्याने मारले जाईल व ५००० रुपये दंड सुद्धा आकाराला जाईल, अशी दवंडी देण्यात आली आहे.  या घटनेचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मुझफ्फरनगरच्या चारथावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कुतसेना चौकीजवळील पावटी खुर्द हे सुमारे ६-७ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे मुस्लिम समाज हिंदू समाज आणि अनुसूचित जातीचे लोक समान तीन भागात राहतात. माजी सरपंच राजवीर त्यागींच्या शेतातून काही मुलांनी कच्ची आंबे तोडून नेल्यामुळे, त्यांनी संपूर्ण दलित समाजाला दोषी ठरवीत धमकी देत अशाप्रकारची दवंडी गावामध्ये दिली आहे. वाल्मिकी समाजातील 50 वर्षीय कुंवरपाल यांनी राजवीर यांच्या सांगण्यावरून ही  दवंडी दिली आहे. राजवीर सिंग हे विकी त्यागी नावाच्या कुख्यात गुंडांचे वडील आहेत, ज्याचा २०१५ मध्ये पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. विक्की त्यागी यांची मुले अर्पित त्यागी आणि रक्षित त्यागी यांच्यावर सुद्धा दरोडा आणि खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी दोन जणांना अटक

मुझफ्फरनगरचे एसपी अभिषेक यादव यांनी सांगितले की, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. चारथावळ पोलीस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर बुद्ध यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर त्यागी आणि दवंडी देणारा कुंवरपाल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 153B, 505 आणि SC/ST कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

सौजन्य : द क्विंट हिंदी

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here