बलात्काराची तक्रार करण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पोलीस अधिकाऱ्यानेच केला बलात्कार !

या चौघांनी मुलीला 26 एप्रिल रोजी पोलिस स्टेशनमध्ये सोडले, त्यानंतर पोलिसांनी तिला या प्रकरणातील महिला आरोपीकडे सोपवले. तक्रारीत असे म्हटले आहे की एका दिवसानंतर, पोलिसांनी मुलीला तिचे म्हणणे नोंदवून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले - आणि संध्याकाळी, ही महिला पीडित मुलीला पोलीस अधिकारी तिलकधारी सरोज यांच्या खोलीत घेऊन गेली जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

टीम बाईमाणूस/ ५ मे २०२२
आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यास पोलीस स्टेशन मध्ये गेलेल्या १३ वर्षाच्या एका अल्पवयीन दलित मुलीवर पोलीस अधिकाऱ्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात घडली आहे.
याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी संबंधित अधिकारी तिलकधारी सरोज आणि मुलीच्या एका महिला नातेवाईकासह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जेव्हा मुलीने चाइल्ड हेल्पलाइनच्या सदस्यांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली तेव्हा ही घृणास्पद घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने मंगळवारी दाखल केलेल्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आणि काल प्रयागराज येथून अटकसुद्धा करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारने सराईत गुन्हेगारांच्या मालमत्तांवर केलेल्या बुलडोझर कारवाईचा संदर्भ देत कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा “बुलडोझरच्या नादात दडपल्या” जात आहेत या अर्थाचे ट्विट करून टीका केली.

समाजवादी पक्षाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आणि म्हटले की त्यांचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि “त्यांना सर्व मदत करण्याचे आश्वासन” दिले आहे.

या घटनेवरील मीडिया रिपोर्ट्सची स्वतःहून दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावून चार आठवड्यांत या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.

पीडित मुलगी शाळकरी असून तिचे वडील शेतकरी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पीडित मुलगी बालकल्याण समितीच्या ताब्यात असून या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ज्या चार आरोपींनी पीडितेवर आधी बलात्कार केला आणि या प्रकरणातील मुलीची महिला नातेवाईक हे पाचही जण मुलीचे शेजारी असल्याची माहिती आहे.

ललितपूरचे पोलीस अधीक्षक निखिल पाठक यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढून त्यांना राखीव पोलीस दलामध्ये जोडले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासावर कोणीही प्रभाव टाकू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

आईच्या तक्रारीनुसार, चौघांनी 22 एप्रिल रोजी तिच्या मुलीचे अपहरण केले आणि तिला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे नेले. तक्रारीनुसार भोपाळमध्येच तीन दिवस या पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला.

तक्रारीनुसार, या चौघांनी मुलीला 26 एप्रिल रोजी पोलिस स्टेशनमध्ये सोडले, त्यानंतर पोलिसांनी तिला या प्रकरणातील महिला आरोपीकडे सोपवले. तक्रारीत असे म्हटले आहे की एका दिवसानंतर, पोलिसांनी मुलीला तिचे म्हणणे नोंदवून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले – आणि संध्याकाळी, ही महिला पीडित मुलीला पोलीस अधिकारी तिलकधारी सरोज यांच्या खोलीत घेऊन गेली जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार “पुन्हा एकदा, मुलीला तिच्या नातेवाईकाकडे परत देण्यात आले आणि तिच्या पालकांना या प्रकरणाबाबत पूर्ण अंधारात ठेवण्यात आले. 30 एप्रिल रोजी, पोलिसांनी मुलीला समुपदेशनासाठी बालकल्याण समितीच्या टीमकडे सोपवले असता मुलीने तिची आपबिती त्यांना सांगितली.”

यानंतर मंगळवारी मुलीने आणि तिच्या पालकांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. बलात्कार, गुन्हेगारी कट आणि अपहरणाच्या आरोपाखाली आणि POCSO कायदा आणि SC/ST कायद्यांतर्गत कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“मुलीच्या आईने दिलेल्या घटनाक्रमावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही सर्व तपशील पडताळत आहोत. ”असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस अधिक्षक निखिल पाठक म्हणाले की, “पीडित मुलगी जेंव्हा पहिल्यांदा म्हणजेच 26 एप्रिलला पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा बलात्काराचा गुन्हा का दाखल केला गेला नाही हे शोधणे हा आमच्या तपासाचा एक भाग आहे.”

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here