आमच्या विषयी

बाईमाणूसची गरज का आहे?

महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात खास करून दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लाखो नागरिकांपर्यंत अजूनही माध्यमे पोहोचली नाहीत हे वास्तव आहे. विशेषतः दलित, आदिवासी, भटके विमुक्त आणि ग्रामीण भागातील लाखो शेतकरी-शेतमजूर असे अनेक समाजातील घटक सांगता येतील. याशिवाय अस्तित्वात असणाऱ्या बहुतांश माध्यमांचा सगळा व्यवहार हा पुरुषी आणि अभिजन असल्यासारखा आहे. पुरुषी चेहरा असलेल्या या माध्यमात विशिष्ट वर्गाच्या, जातीच्या आणि लिंगाच्याचं बातम्यांना स्थान दिलेले असते. नेहमीच बहुसंख्यांचा विचार करून बातम्यांची रचना केली जाते. यामुळेच पत्रकारांची प्रस्थापित असणारी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या संवाद-माध्यमांच्या मदतीने राज्यातील सर्व घटकांतील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांच्या रोजच्या जगण्यापासून ते त्यांच्या आजूबाजूचा पूर्ण अवकाश त्यांच्या भाषेत व्यक्त करता यावा यासाठी वरिष्ठ पत्रकार प्रशांत पवार आणि एमजीएम विद्यापिठाचे वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाने बाईमाणूस या डिजिटल मीडिया हाऊसची निर्मित केली. कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.

संपादकीय

प्रशांत पवार

संचालक आणि संपादक, बाईमाणूस

बाईमाणूस' या मराठी वेबपोर्टलवर आणि इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपले मनापासून स्वागत. 'बाईमाणूस' हे व्यासपीठ आवाज नसलेल्या समूहांचा माध्यमांमधील आवाज वाढवण्यासाठीचा या महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे. शहरीकरणासोबतच ग्रामीण भागाकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे. यासाठीच 'बाईमाणूस' हे व्यासपीठ आकारास आले आहे. 'सोशल नेटवर्क' या शब्दाची ताकद आताशा जाणवू लागली आहे. आपले हे नवे माध्यम ख-या अर्थानं जनतेचे व्यासपीठ व्हावे, सामान्य शेतकरी आणि शोषण व्यवस्थेच्या विरोधातील संघर्षाचे माध्यम व्हावे, अशी आमची इच्छा आहे. 'बाईमाणूस' हे असे 'नवे स्वप्नं' बघणा-या माध्यमांमध्ये वेगळी वाट धुंडाळणाऱ्या माणसांचे मोहोळ आहे. 'बाईमाणूस' ही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींची ऑनलाइन आणि 'ग्रासरूट' चळवळ आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामीण आणि शहरी नागरिकाने सहभागी व्हावे. प्रशांत पवार यांनी दैनिक लोकसत्ता मध्ये सहाय्यक संपादक म्हणून सोळा वर्षे काम केले आहे त्याचबरोबर दैनिक दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीचे संपाद्क म्हणून १० वर्षे काम केले आहे.महाराष्ट्रातील वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या , महाराष्ट्राची परिघाबाहेरील सांस्कृतिक , साहित्यिक , सामाजिक चळवळीला रुजविणाऱ्या पत्रकारांपैकी प्रशांत पवार हे एक आहेत.

आमचे रिपोर्टर्स

भाग्यश्री लेखामी (गडचिरोली)

[object Object]namee
  • नक्षलग्रस्त भागातील तडफदार तरूण महिला सरपंच..

अप्सरा आग (पुणे)

[object Object]namee
  • बेठबिगारी, कचरा वेचक आणि सफाई कामगार महिलांच्या समता, समानता आणि न्यायासाठी झटणारा आवाज

सुमित्रा वसावे (नंदुरबार)

[object Object]namee
  • अंधश्रद्धा आणि लिंगभेदा विरुद्ध लढणारी सशक्त आदिवासी नारी

वर्षा कोडपे (चंद्रपूर)

[object Object]namee
  • फिनिक्स प्रमाणे राखेतून झेप घेऊ पाहणारी

सुकेशिनी नाइकवडे (बीड)

[object Object]namee
  • मराठवाड्यातील महिलांचा बुलंद आवाज

शमीभा पाटील (जळगाव)

[object Object]namee
  • तृतीयपंथीयांसाठी लढणारा आश्वासक आवाज

पूनम चौरे (डहाणू)

[object Object]namee
  • वारली आदिवासींचे वास्तव मांडणारी.

संजना खंडारे (छत्रपती संभाजीनगर)

[object Object]namee
  • वेगळ्या धाडसी वाटा आजमावत माध्यमांमध्ये स्थान बनवू पाहणारी.

टीम बाईमाणूस

सुरज पटके

सुरज पटके

प्रोजेक्ट मॅनेजर

ऋषिकेश मोरे

ऋषिकेश मोरे

सिनियर प्रोड्युसर

अभिजीत तांगडे

अभिजीत तांगडे

सोशल मीडिया हॅन्डलर

पार्टनर्स

असर सोशल इम्पॅक्ट ऍडव्हाइजर (प्रोजेक्ट पार्टनर)

असर सोशल इम्पॅक्ट ऍडव्हाइजर (प्रोजेक्ट पार्टनर)

एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय (नॉलेज पार्टनर)

एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय (नॉलेज पार्टनर)

एमजीएम विद्यापीठ (सपोर्टिंग पार्टनर)

एमजीएम विद्यापीठ (सपोर्टिंग पार्टनर)

मनीष फार्मा (प्रोजेक्ट पार्टनर)

मनीष फार्मा (प्रोजेक्ट पार्टनर)