Skip to main content

Latest Videos

Video stories and visual journalism

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
विषारी दारूने घेतले 18 बळी! | "महिलांचा आरोप - पोलिसांना हप्ता?"
Video content
ताज्या घडामोडी

विषारी दारूने घेतले 18 बळी! | "महिलांचा आरोप - पोलिसांना हप्ता?"

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरलं! फुगेवाडी, दापोडी, काळेपडळ आणि हडपसर भागात विषारी दारूमुळे १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. "घरून व्यवस्थित गेले, पण परत आल्यावर माशासारखे तडफडले..." स्थानिक महिलांचा हा आक्रोश काळजाला घर पाडणारा आहे. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक महिलांनी थेट पोलिसांवर "हफ्ता घेतात" असा गंभीर आरोप केला आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नक्की काय आहे संपूर्ण सत्य? पाहा 'बाईमाणूस'चा हा विशेष रिपोर्ट.

S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje
'BaiManus’चा महा इम्पॅक्ट: एका रिपोर्टने बदललं शिवरायांच्या रक्षकाच्या कुटुंबाचं नशीब
Video content
ग्राउंड रिपोर्ट

'BaiManus’चा महा इम्पॅक्ट: एका रिपोर्टने बदललं शिवरायांच्या रक्षकाच्या कुटुंबाचं नशीब

एकीकडे ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरू असताना, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीचं आयुष्य मात्र अत्यंत हालाखीत जात होतं. अंथरुणाला खिळलेले वडील, मजुरी करणारी आई आणि सलूनमध्ये काम करणारा मुलगा… ‘बाईमाणूस’ने हा उपेक्षित इतिहास महाराष्ट्रासमोर आणला आणि अवघ्या २४ तासांत संपूर्ण परिस्थिती बदलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे थेट साताऱ्यातील कोंढवली गावात पोहोचले. समाजातील संवेदनशील नागरिक आणि मुस्लिम मावळा सादिक शेख यांनीही सपकाळ कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

V
Vitthal Sable
जेव्हा फाळणीने Cricket च्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…
Video content
ताज्या घडामोडी

जेव्हा फाळणीने Cricket च्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण नेहमीच वैर, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या इतिहासामागे दडलेली आहे दोन जिवलग मित्रांची भावूक कहाणी… भारताचे पहिले कसोटी कर्णधार लाला अमरनाथ आणि पाकिस्तानचे महान गोलंदाज फजल मेहमूद — हे दोघे फाळणीपूर्वी एकत्र क्रिकेट खेळायचे, एकाच मैदानावर वाढले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. पण १९४७ च्या फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं.

A
Abhijeet Tangade
शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र! | डिझेल तुटवड्यामुळे पेरण्या ठप्प |
Video content
ग्राउंड रिपोर्ट

शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र! | डिझेल तुटवड्यामुळे पेरण्या ठप्प |

बळीराजाच्या हातातून सहसा घाम गळतो... पण जेव्हा त्या घामाची जागा रक्त घेतं, तेव्हा ती फक्त वेदना राहत नाही... तो आक्रोश बनतो! महाराष्ट्रात पेरणीचे दिवस तोंडावर आले असताना अन्नदाता डिझेलच्या भीषण टंचाईमुळे हवालदिल झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनलीये की एका संतप्त शेतकऱ्याने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून या व्यवस्थेला जाब विचारला आहे.

V
Vitthal Sable
Raja Shivaji ची 114 कोटींची कमाई | पण प्रत्यक्षात जीवा महालेंचे वंशज हलाकीच्या परिस्थितीत
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Raja Shivaji ची 114 कोटींची कमाई | पण प्रत्यक्षात जीवा महालेंचे वंशज हलाकीच्या परिस्थितीत

एकीकडे 'राजा शिवाजी' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ११४ कोटींची विक्रमी घोडदौड सुरू असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष इतिहास घडवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीच्या नशिबी मात्र अत्यंत गरिबी आणि वनवास आला आहे. वीर जिवा महालेंचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ गेल्या ११ वर्षांपासून अर्धांगवायूने खाटेवर खिळलेले आहेत. कुटुंबाची चूल पेटवण्यासाठी आणि वडिलांच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी त्यांची पत्नी शेतमजुरी करते, तर तरुण मुलगा प्रतीक अवघ्या १० वी नंतर शिक्षण सोडून सलूनमध्ये लोकांचे केस कापण्याचे काम करतोय..

V
Vitthal Sable
Chandrapur हादरलं | तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघिणीचा हल्ला
Video content
ताज्या घडामोडी

Chandrapur हादरलं | तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघिणीचा हल्ला

द्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून अतिशय हृदयद्रावक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या १३ महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. कवडूबाई मोहुर्ले, अनुबाई मोहुर्ले, संगीता चौधरी आणि सुनीता मोहुर्ले अशी या दुर्दैवी महिलांची नावे आहेत.

S
Sanjana Khandare
Pakistan: इस्लामी नावांना हिंदू नावं देण्यामागे काय आहे गुपित?
Video content
ताज्या घडामोडी

Pakistan: इस्लामी नावांना हिंदू नावं देण्यामागे काय आहे गुपित?

भारतात गेल्या काही वर्षांत अलाहाबादचं प्रयागराज, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर किंवा फैजाबादचं अयोध्या अशी अनेक शहरांची नावं बदलली गेली. यावरून देशभरात मोठा राजकीय वाद आणि आंदोलनंही झाली. इतिहास आणि संस्कृतीच्या नावाखाली झालेली ही नावाबदलाची प्रक्रिया आपण जवळून पाहिली आहे.

S
Sanjana Khandare
Netherlands Returned Chola Copper Plates to India | 1000 वर्षांचा रहस्यपूर्ण इतिहास
Video content
ताज्या घडामोडी

Netherlands Returned Chola Copper Plates to India | 1000 वर्षांचा रहस्यपूर्ण इतिहास

Netherlands ने भारताला परत दिलेल्या Chola Copper Plates मागचा इतिहास नेमका काय आहे?या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चोल साम्राज्याचा वैभवशाली इतिहास, नागपट्टिनममधील बौद्ध विहार, आणि चोल राजाने दिलेल्या ऐतिहासिक दानपत्राची कहाणी. हे ताम्रपट जवळपास 1000 वर्ष जुने असून त्यातून त्या काळातील व्यापार, धर्म आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा उलगडा होतो. Netherlands मध्ये गेलेले हे ताम्रपट पुन्हा भारतात कसे परत आले? आणि यामागचा खरा इतिहास काय आहे?

T
Team BaiManus