Skip to main content

कला / साहित्य / सिनेमा

Browse all articles in कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod
प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!
कला / साहित्य / सिनेमा

प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!

चहा हे असं पेय आहे, जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत सर्वच पितात. म्हणून तर मी चहाला समाजवादी पेय म्हणतो. चहा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ‘चहातरी घेऊन जा’ असं घरी आलेल्या माणसाला आपण किमान सांगतो तरी (ह्यात अस्सल सदाशिव पेठी घरं धरलेली नाहीत.) सध्या ‘रात्री सातनंतर चहा घेत नाही’ असं म्हणण्याचा जरी जमाना आलेला असला, तरी सकाळी उठल्यावर पहिली आठवण अजूनही चहाची येते. म्हणूनच आजच्या ‘आंतरराष्ट्रीय चहा दिना’निमित्त हे आपल्या जीवाभावाच्या मित्राला पत्र...

7 min read
D
Dwarkanath Sanjhgiri
भारत शहरांची ‘इस्लामी’ नावं बदलतोय; पाकिस्तान मात्र परत आणतोय ‘हिंदू’ ओळख… लाहोरमध्ये आता ‘लक्ष्मी चौक’, ‘राम गल्ली’ आणि ‘कृष्ण नगर’
कला / साहित्य / सिनेमा

भारत शहरांची ‘इस्लामी’ नावं बदलतोय; पाकिस्तान मात्र परत आणतोय ‘हिंदू’ ओळख… लाहोरमध्ये आता ‘लक्ष्मी चौक’, ‘राम गल्ली’ आणि ‘कृष्ण नगर’

भारतात अलाहाबादचं प्रयागराज, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर अशा इस्लामी नावांच्या बदलांवरून मोठे राजकीय वाद झाले; पण पाकिस्तानमध्ये सध्या याच्या अगदी उलट प्रक्रिया सुरू आहे. लाहोरमधील ‘बाबरी मशीद चौक’ पुन्हा ‘जैन मंदिर चौक’, ‘इस्लामपुरा’ पुन्हा ‘कृष्ण नगर’ आणि ‘सुन्नत नगर’ पुन्हा ‘संत नगर’ होत आहे. पाकिस्तानच्या पंजाब सरकारने हिंदू, शीख, जैन आणि ब्रिटिशकालीन ऐतिहासिक नावं पुन्हा अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून, या बदलांविरोधात अद्याप मोठा कट्टर विरोधही दिसलेला नाही. फाळणीनंतर पुसण्याचा प्रयत्न झालेल्या लाहोरच्या सांस्कृतिक स्मृती आजही स्थानिकांच्या बोलण्यात जिवंत राहिल्या, आणि अखेर सरकारलाही तीच नावं मान्य करावी लागली. पाकिस्तानात सुरू झालेल्या या ऐतिहासिक नामांतर मोहिमेमागे नेमकं काय राजकारण, सांस्कृतिक वास्तव आणि लोकमानस दडलं आहे, याचा घेतलेला हा सविस्तर वेध.

11 min read
R
Ritesh Shisode
स्टँड-अप कॉमेडीची सुरूवात कोणी केली माहितीये…? आपल्या ‘काळू-बाळू’ या तमासगिरांनी…!
कला / साहित्य / सिनेमा

स्टँड-अप कॉमेडीची सुरूवात कोणी केली माहितीये…? आपल्या ‘काळू-बाळू’ या तमासगिरांनी…!

तमाशा क्षेत्रातील महान वगसम्राट काळू-बाळू यांची आज जयंती… उपजत असलेली विनोद बुद्धी, निसर्गाने दिलेली जुळ्या भावंडांची किमया याचा योग्य वापर करत संपूर्ण महाराष्ट्राला काळू-बाळूंनी भारावून टाकले होते. आजघडीला जवळपास सगळे तमाशा फड मालक कर्जबाजारी असताना काळू-बाळू यांच्या तमाशाचा फड कधीही कर्जाच्या विळख्यात सापडला नाही हे विशेष. याचे कारण म्हणजे इतर तमाशा फडांप्रमाणे त्यांनी कधीही बडेजाव केला नाही. दादा कोंडके हे काळू-बाळू यांचे मोठे ‘फॅन’ होते. मुंबईला काळृ-बाळूंचा प्रयोग असला की दादा कोंडके दररोज तिकीट काढून त्यांच्या प्रयोगाला जाऊन बसायचे.

6 min read
A
Abhijeet Tangade
वामनदादा कर्डक : हा लोकांचा आवाज आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे
कला / साहित्य / सिनेमा

वामनदादा कर्डक : हा लोकांचा आवाज आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे

महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या भीमगीतांमधून आंबेडकरी चळवळीला लोकांचा आवाज दिला. त्यांच्या गीतांत संघर्ष, वेदना, स्वाभिमान आणि सामाजिक क्रांतीचा प्रखर हुंकार आहे. बाबासाहेबांवरील निस्सीम श्रद्धा, दलित समाजाची वेदना आणि परिवर्तनाची आस त्यांच्या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त होते.

7 min read
S
Sameer Gaikwad
साडी, कपाळावर कुंकू आणि भरतनाट्यम नृत्यांगना… कोण आहे ही पाकिस्तानची ७१ वर्षीय ‘शीमा किरमानी’, जिला आजही सरकार घाबरतं…?
कला / साहित्य / सिनेमा

साडी, कपाळावर कुंकू आणि भरतनाट्यम नृत्यांगना… कोण आहे ही पाकिस्तानची ७१ वर्षीय ‘शीमा किरमानी’, जिला आजही सरकार घाबरतं…?

जगप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि पाकिस्तानातील महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या ७१ वर्षांच्या शीमा किरमानी यांना पाकिस्तानी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जगभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानमध्ये सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सांस्कृतिक हक्क आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असते. त्यातूनच कट्टर इस्लामी संघटनांच्या निशाण्यावर शीमा किरमानी या कायम राहिल्या आहेत. लोकांच्या हृदयापर्यंत आपले विचार पोहचण्यासाठी कला हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे, हे जाणून नृत्य, चित्र आणि कवितांमधून समानतेचे, न्यायाचे संदेश देणाऱ्या शीमा किरमानी यांच्या संघर्षाची कथा खास ‘बाईमाणूस’च्या वाचकांसाठी…

4 min read
M
Mahesh Kumar Munjale
'शेरलॉक होम्स’इतकं प्रेम मिळूनही झुंजार, काळा पहाड, धनंजयचे लेखक बाबूराव अर्नाळकर कायम उपेक्षीत का राहिले…?
कला / साहित्य / सिनेमा

'शेरलॉक होम्स’इतकं प्रेम मिळूनही झुंजार, काळा पहाड, धनंजयचे लेखक बाबूराव अर्नाळकर कायम उपेक्षीत का राहिले…?

गिनीज बुकने ज्या रहस्यकथाकाराची दखल घेतली ते बाबूराव अर्नाळकर आजच्या पिढीला माहीत असणे जरी कठीण असले तरी झुंजार, काळा पहाड, धनंजय, गोलंदाज, तिरंदाज, फू मांच्यू यांसारख्या हिरोंची नावं मात्र नक्कीच आठवत असतील. या लेखकाचं नाव होतं, चंद्रकांत सखाराम चव्हाण…पण, या नावानं त्यांना कोणीच ओळखत नाही. त्यांना ओळखलं जाते ते रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर या नावाने.किती रहस्य कादंबऱ्या लिहिल्या असतील बाबूरावांनी? तब्बल एक हजार चारशे ऐंशी. हा विश्वविक्रमच. आज इतक्या वर्षांनी बाबूराव अर्नाळकरांची आठवण काढण्याचे निमित्त म्हणजे Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली त्यांच्याच एका पात्रावर आधारीत डिटेक्टिव्ह धनंजय- रहस्यकथा ही वेबमालिका…

9 min read
S
Suraj Patke