Skip to main content

ताज्या घडामोडी

Browse all articles in ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable
मोबाईलच्या नेटवर्कमध्येही आता गरीब-श्रीमंत भेदभाव… टेलकॉम कंपन्यांची मनमानी!
ताज्या घडामोडी

मोबाईलच्या नेटवर्कमध्येही आता गरीब-श्रीमंत भेदभाव… टेलकॉम कंपन्यांची मनमानी!

गर्दीच्या रेल्वे स्थानकांपासून स्टेडियमपर्यंत मोबाईल नेटवर्क जाण्याचा अनुभव सर्वसामान्य वापरकर्त्यांना नेहमी येत असतो. अशा पार्श्वभूमीवर एअरटेलने ‘प्रायोरिटी पोस्टपेड प्लॅन’ सादर करून चांगल्या नेटवर्कचा दावा केला आहे. कंपनीचा युक्तिवाद असा की, यामुळे नेटवर्क कार्यक्षमता वाढेल आणि ग्राहकांना स्थिर सेवा मिळेल. मात्र या मॉडेलमुळे इंटरनेटमध्ये ‘क्लास-बेस्ड’ विभागणी निर्माण होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा केवळ नवीन टेलिकॉम प्लॅन नसून भविष्यातील ‘डिजिटल डिव्हाईड’चा संकेत आहे का, अशी चर्चा तीव्र झाली आहे.

6 min read
S
Shekar Patil
विषारी दारूने घेतले 18 बळी! | "महिलांचा आरोप - पोलिसांना हप्ता?"
Video content
ताज्या घडामोडी

विषारी दारूने घेतले 18 बळी! | "महिलांचा आरोप - पोलिसांना हप्ता?"

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरलं! फुगेवाडी, दापोडी, काळेपडळ आणि हडपसर भागात विषारी दारूमुळे १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. "घरून व्यवस्थित गेले, पण परत आल्यावर माशासारखे तडफडले..." स्थानिक महिलांचा हा आक्रोश काळजाला घर पाडणारा आहे. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक महिलांनी थेट पोलिसांवर "हफ्ता घेतात" असा गंभीर आरोप केला आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नक्की काय आहे संपूर्ण सत्य? पाहा 'बाईमाणूस'चा हा विशेष रिपोर्ट.

S
Sanjana Khandare
 ‘लाल सलाम’च्या धमकीपत्रापासून जमीन आंदोलनापर्यंत… गडचिरोलीत नेमकं सुरूय काय?
ताज्या घडामोडी

‘लाल सलाम’च्या धमकीपत्रापासून जमीन आंदोलनापर्यंत… गडचिरोलीत नेमकं सुरूय काय?

एटापल्लीच्या वटेली परिसरात ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देणारं कथित ‘लाल सलाम’ पत्र समोर आल्यानंतर गडचिरोलीत खळबळ माजली आहे. दुसरीकडे चामोर्शी तालुक्यातील १४ गावांतील सुमारे ९ हजार एकर सुपीक जमीन अधिग्रहित करण्याच्या हालचालींविरोधात संताप वाढला असून सिंचनाखालील आणि बारमाही पीक देणाऱ्या जमिनी उद्योगांसाठी का घेतल्या जात आहेत, असा स्थानिकांचा सवाल आहे.

4 min read
S
Suraj Patke
 “हाथरस अजून संपलेलं नाही…” सहा वर्षांपूर्वी मध्यरात्री जाळलेली चिता अजून धगधगतेय!
ताज्या घडामोडी

“हाथरस अजून संपलेलं नाही…” सहा वर्षांपूर्वी मध्यरात्री जाळलेली चिता अजून धगधगतेय!

त्या रात्री हाथरसमध्ये फक्त एका दलित मुलीची चिता पेटलेली नव्हती; भारतीय समाजाच्या विवेकालाच जणू आग लागली होती. पोलिसांच्या घेरावात, कुटुंबाच्या आक्रोशावर मात करत मध्यरात्री गुपचूप पार्थिव जाळलं जात असताना, देशभरातील लाखो लोक मोबाईलच्या स्क्रीनवरून लोकशाहीचा एक भयावह चेहरा पाहत होते. सहा वर्षांनंतर ‘हाथरस : 16 डेज’ हा माहितीपट त्या राखेत अजूनही धगधगत असलेल्या प्रश्नांकडे पुन्हा पाहायला भाग पाडतो . जात अजून किती जिवंत आहे? स्त्रीच्या शरीरावरच समाजाची नैतिकता का उभी केली जाते? आणि न्यायाच्या नावाने आपण नेमकं कोणाला वाचवत असतो?

4 min read
S
Shantanu Khuje
बीड : १३ वर्षीय पीडितेची न्यायासाठी २४ तास फरफट; रात्रभर पोलीस स्टेशन, दिवसभर रुग्णालयात ताटकळत ठेवलं...
ताज्या घडामोडी

बीड : १३ वर्षीय पीडितेची न्यायासाठी २४ तास फरफट; रात्रभर पोलीस स्टेशन, दिवसभर रुग्णालयात ताटकळत ठेवलं...

बीड जिल्ह्यातील केज येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या गंभीर घटनेनंतर प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचा धक्कादायक चेहरा समोर आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये आणि वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल दहा तास रुग्णालयात थांबवण्यात आलं. -“पीडितेला संवेदनशीलतेने वागवण्याऐवजी प्रशासनाने मानसिक छळ केला,” असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी बीडमधील केज येथे घडलेल्या प्रकरणानंतर केला आहे. पीडितेला वेळेवर मदत न मिळाल्याने आणि तिला तणावात ठेवण्यात आल्याने सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

5 min read
S
Sukeshani Naikwade
जेव्हा फाळणीने Cricket च्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…
Video content
ताज्या घडामोडी

जेव्हा फाळणीने Cricket च्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण नेहमीच वैर, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या इतिहासामागे दडलेली आहे दोन जिवलग मित्रांची भावूक कहाणी… भारताचे पहिले कसोटी कर्णधार लाला अमरनाथ आणि पाकिस्तानचे महान गोलंदाज फजल मेहमूद — हे दोघे फाळणीपूर्वी एकत्र क्रिकेट खेळायचे, एकाच मैदानावर वाढले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. पण १९४७ च्या फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं.

A
Abhijeet Tangade