Skip to main content

एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या ट्रान्स पीडितेची कहाणी...

Shonali Samarth
Today
1 views
एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या  ट्रान्स पीडितेची कहाणी...

शोनाली समर्थ  


  •  जेफ्री एपस्टीन प्रकरणातील अनेक पीडित महिलांच्या कथा जगभर चर्चेत आल्या. त्यांना न्यायासाठी पाठिंबा मिळाला, त्यांच्या वेदनांवर चर्चा झाली आणि त्यांचे अनुभव लाखो लोकांपर्यंत पोहोचले.


  •   मात्र या प्रकरणात एवा कॉर्डेरो नावाची एक ट्रान्स महिला अशी होती, जिने अल्पवयात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली, पण तिची कथा मुख्य प्रवाहातील चर्चेत फारशी कधी आलीच नाही. 


  • एवा कॉर्डेरोच्या बालपणापासून ते जेफ्री एपस्टीनविरोधातील न्यायालयीन लढ्यापर्यंत, माध्यमांकडून झालेल्या वागणुकीपासून ते तिच्या आजच्या आयुष्यापर्यंतचा प्रवास बाईमाणूसच्या या विशेष  लेखातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 


जेफ़्री एपस्टीन प्रकरणातील, एपस्टीन फाईल्स हे नाव ऐकताच जगभरातील सामान्य माणसाच्या मनात आज धडकी भरते. एपस्टीन बेटावर असंख्य निष्पाप लहान मुलांवर आणि महिलांवर झालेलं अमानुष कृत्य ऐकूनच अनेकजण अस्वस्थ झाले, काहींचे मानसिक आरोग्यही बिघडले. मात्र, ज्यांच्यावर हे अमानवी कृत्य घडले असेल त्यांच्या मानसिक आरोग्याची तरआपण कल्पना ही करू शकत नाही. 


जेफ्री हा सॅडिस्ट प्रवृत्तीचा होता म्हणजे दुसऱ्यांचा शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ करुन त्यांच्या वेदनेतून तो आनंद मिळवायचा, खूप श्रीमंत असल्याने त्याने स्वतःच खासगी बेट खरेदी केला आणि जगातल्या सत्ताधारी आणि श्रीमंत व्यक्तींना तो तिथे अल्पवयीन मुले आणि बायकांची पुरवणी करायचा. ह्या महिला आणि लहानमुलांचा एपस्टीन बेटावर लैंगिक, मानसिक आणि शाररीक छळ व्हायचा. हे सत्ताधारी श्रीमंत व्यक्ती ही जेफ्री सारखेच सॅडिस्ट प्रवृत्तीचे होते. यामध्ये बळी पडलेल्या महिलांमध्ये अश्या ही व्यक्तीचं नाव समोर येतंय जीचा लैंगिक छळ झालेला असूनही बऱ्याच माध्यमाने तिची लैंगिक ओळख पाहता जाणूनबुजून तिच्या विषयी न लिहायच ठरवलं आणि ज्या माध्यमांनी तिच्याविषयी लिहलं ते अगदीच वेगळं.  


User Image(जेफ़्री एपस्टीन)

 

मॉडेलिंगच्या स्वप्नातून एपस्टीनच्या जाळ्यात 


एवा कॉर्डरो ही एक ट्रांसमहिला आहे, 15 नोव्हेंबर 1983 साली एका लॅटिन परिवारात तिचा जन्म झाला. बारा वर्षांची असतांना ती मुलींचे कपडे घालायची आणि तिने स्वतःसाठी “एवारेले” असे नाव ही ठेवले. परंतु तिचे शरीर जन्माने पुरुषाचे असल्याने तीचं स्त्रीत्व तिच्या घरच्यांना अमान्य होतं त्यामुळे तिला त्यांच्यापासून विभक्त व्हावं लागलं, पुढील काही वर्ष ती एका संस्थेच्या आश्रमात राहिली. 


त्याकाळी अमेरिकेत “मायस्पेस” हे सोशल मीडिया प्लेटफॉर्म सर्वात जास्त वापरण्यात यायचं, ज्यावर एवा ही सक्रिय असायची. तिने आपल्या हैंडल वर एक पोस्ट केली ज्यात तिने आपलं मॉडेल होण्याचं स्वप्न व्यक्त केलं. न्यायालयीन नोंदी अनुसार ह्या पोस्ट वर शैरी ह्या चाळिशीतल्या महिलेने एवाला सांगितलं की, तिचा एक अतिश्रीमंत मित्र तिला ह्यात मदत करू शकतो.  हा अति श्रीमंत व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून जेफ्री एपस्टीन होता. सोळा वर्षांची एवा तिच्या मॉडेलिंगचा पोर्टफोलियो घेऊन जेफ्रीला त्याच्या घरी भेटली. 


व्हिक्टोरिया सीक्रेटची मॉडेल बनवायचं अमिष जेफ्री तिला दाखवत होता. 300 डॉलर्स च्या बदल्यात माझी मसाज कर असं तो तिला म्हणायचा. कुठेतरी एवाला त्या पैश्यांची गरज होतीच पण ह्याच मसाज नंतर तिचा लैंगिक छळ व्हायचा आणि जेफ्री तिच्यावर बळजबरी करायचा.  त्यावेळी जेफ्रीचं हे कृत्य जगासमोर आलेलं नसल्याने एवाला जेफ्री विषयी फारशीकल्पना नव्हती की तो नेमका कसा आहे. पुढील एक वर्षाहून अधिक त्याने एवाचा पाठलाग केला आणि तिला थायलँडला नेऊन त्याच्या “लेडिबॉईज” टोळीत भरती करण्याचा प्रयत्न ही केला. 


एवाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला तेंव्हा… 


ऑक्टोबर 2007 साली एवाने अमेरिकन न्यायालयात जेफ्री विरोधात खटला दाखल केला.  ज्यात तिने आपल्यावर लैंगिक छळ झाल्याची तक्रात केली. “मसाज साठी मी तयार होते, परंतु पुढे ह्यांनी माझ्यावर लैंगिक छळ केला” असं एवाने  खटल्यात नमूद केलं. त्या काळी अमेरिकन कायद्यानुसार लैंगिक छळ झाल्याचा सहा वर्षांच्या आत फिर्यादीने खटला दाखल केला पाहिजे असा नियम होता. फक्त जर एखादी फिर्यादी मानसिकस्वरुपाने असक्षम असेल तर तिच्यासाठी हा सहा वर्षांचा कालावधी वाढू शकतो. जेंव्हा एवाने हा खटला टाकला तेव्हा तिच्या सोबत घडलेल्या कुकृत्याला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला होता. परंतु ह्या छळामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि मी मानसिकरुपाने असक्षम असल्याने मी हा खटला उशीरा टाकतेय आणि तो मान्य करावा अशी विनंती एवानी न्यायालयात केली. 


User Image


२००२ साली, एवा विल्यम अँरोच नावाच्या एका वकिलाला भेटली, यापूर्वी एका ट्रान्स नसलेल्या (सिसजेंडर) व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या बलात्काराच्या खटल्यात अँरोच ह्यांनी एवाची वकिली केली होती. आणि या एपस्टीन खटल्यात ही अँरोच एवाचा वकील होता. या खटल्यात एवा लैंगिक छळाच्यावेळी अल्पवयीन असल्याने तिची सहमती ही ग्राह्य धरण्यात येत नसल्याने असहमतीने केलेली क्रिया छळ आहे असा युक्तिवाद करण्यात आला. कोर्टाने एवाची मानसोपचारतज्ञ डॉक्टर रॉबर्ट गोल्डस्टाइन यांच्या मार्फत मानसिक चाचणी केली. आणि समोर आलं की, खरचं एवा ही मानसिक रुपाने केस करण्यास असक्षम होती का? 


या केसच्या खोलात जातांना रॉबर्ट ह्यांनी सांगितलं मागील काही वर्षात, मानसिक समस्यांमुळे एवा बऱ्याचवेळेस रुग्णालयात ऍडमिट झालीये.  मात्र, त्याची कारणे वेगळी होती, एवा ड्रग एडिक्ट असल्याने ती हॉस्पिटल मध्ये भरती व्हायची. याचा एपस्टीन केस सोबत फार काही संबंध नव्हताच, त्यामुळे ती ही केस करण्यास तेव्हाच सक्षम होती. 


पुढे एपस्टीनच्या वकिलाने हा ही दावा केला की, हया गेल्या काही वर्षात एवा ने अनेक शपथपत्र आणि करारपत्र ही केलेत, ज्याचा अर्थ ती लीगल गोष्टी हाताळण्यास सक्षम होती, त्यामुळे हा मानसिक असक्षमतेचा दावा अमान्य आहे. पुढे हा वकील एवाची केस अगदीच हलक्यात घेऊन त्यावर जास्त लक्ष देत नव्हता आणि सतत फक्त पैश्यांची मागणी करायचा. ह्याच कटकटीला कंटाळून एकदा एवाचा संताप अनावर झाला आणि पैश्यांच्या वादातून तिने रागाच्या भरात अँरोचला चाकू दाखवला. त्या प्रकरणात पुढील काही दिवस ती रायकर्स आयलँड कारावासात होती. लैंगिक छळाच्या सहा वर्षा नंतर खटला दाखलकेल्याने आणि कुठे ही एवा मानसिक स्वरुपाने असक्षम होती हे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला. 


माध्यमांनी एवा-जेफ्री खटल्यालाला, नकारात्मक आणि सनसनाटीचं वळणं दिलं... 


पुढे काही अमेरिकन बहुचर्चित मुख्य माध्यमांनी या खटल्याविषयी एकतर्फी आणि एवा विषयी नकारात्मक लिहण्यास सुरुवात केली. आणि तसं ही पारलिंगी व्यक्तींना जगभरातल्या मुख्य माध्यमांनी कधीच योग्य कव्हरेज दिलं नाही. शक्यतो पारलिंगी व्यक्तींविषयीच्या बातम्या मुख्य माध्यमांत येतच नाहीत आणि ज्या  येतात त्यांना नेहमीच नकारात्मक पद्धतीने दर्शवण्यात येतं. कुठे धुमाकूळ घातलेला असेल किंवा कोणत्या गुन्हेगारीत ट्रांस व्यक्तींचे नाव आले असेल तरच मीडिया त्या गोष्टी अगदी सनसनाटी बातम्या म्हणून प्रसिद्ध करतात पण तेच जेव्हा एखादी ट्रासनव्यक्ती पीडित असेल तर माध्यमं  त्यांच नाव घेण्यास ही टाळाटाळ करतात आणि एवाच्या बाबतीत ही हेच घडत होतं. 


User Image


जेफ्री विरोधात खटला दाखल केल्यावर न्यूयॉर्क पोस्ट या माध्यमाने दोन लेख प्रकाशित केले ज्यात, पीडितेविषयी सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांचा सगळा फोकस हा एवाच्या ट्रांसजेंडर होण्यावर होता, त्यांनी तिला मिसजेंडर (मुलगी असून मुलगा संबोधने) आणि डीनेम केलं म्हणजेच तिच्या प्रतिमेला ट्रांस असल्यामुळे काळीक फासणे इत्यादी बाबी केल्यात. पुढे त्यांनी एकतर्फी, फक्त जेफ्रीच्या वकिलाने एवा वर केलेले आरोप “माझा अशीलश्रीमंत आसल्याने तिने हा खटला दाखल केला असून ती फक्त त्याच्या पैश्यांच्या मागे आहे” असे आरोप ही यामध्ये प्रसिद्ध केले.


 पीडितेपासून आरोपीपर्यंत : एवा कॉर्डेरोची शोकांतिका

पुढच्या फॉलोअप लेखात त्यांनी, एवाने जेफ्री च्या आधी जेंटाईल व्यक्तिवर केलेल्या खटल्याचा संदर्भ घेत त्याला “खोटा लैंगिक अत्याचाराचा खटला" असे म्हटले. सोबतच ठळक शीर्षक देत “S(HE) HAS A HISTORY” आणि “ GENDER-BEND SHOCKER-KINKY SEX SUIT GIRL IS A MAN” म्हणजे सेक्स फेंटसी असणारा खटला दाखल करणारी व्यक्ती ही महिला नसून पुरुष आहे” असे लिहले. सोबतच एवा हिचे जेफ्री आणि जेंटाईल व्यक्तीसोबतचे छायाचित्र ही प्रकाशित केले. 

 

यावर न्यूयॉर्क पोस्ट, जेफ्री विरोधात तिने परत अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. पुढे 2008 मध्ये ही केस जेफ्री यांनी कोर्टाच्या मार्फत 28,000 डॉलर्स मध्ये एवा सोबत सेटल केली.  एवा वर वेगवेगळे आरोप करत, तिला तुरुंगात डांबवण्यात आलं.  2014 साली घरफोडी च्या आरोपात एवाला सात महिने तुरुंगात डांबण्यात आलं. 


२ मार्च २०१७ रोजी न्यूयॉर्क डेली न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, मॅनहॅटनमधील व्हिक्टोरियाज सीक्रेटच्या एका दुकानाचा काचेचा दरवाजा फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी एवा कॉर्डेरोला सुमारे १,००० डॉलर्स किमतीच्या पुश-अप ब्रा, जी-स्ट्रिंग्स, थॉन्ग्स आणि सौंदर्यप्रसाधने चोरताना ताब्यात घेतल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले होते. या घटनेत एक विरोधाभासी बाब होती. जेफ्री एपस्टीनने अनेक वर्षे व्हिक्टोरियाज सीक्रेटचे संस्थापक लेस वेक्सनर यांचा आर्थिक व्यवस्थापक आणि निकटचा सहकारी म्हणून काम केले होते. त्यामुळे त्या ब्रँडशी त्याचे अतिशय जवळचे संबंध होते. विशेष म्हणजे, याच व्हिक्टोरियाज सीक्रेट ब्रँडचे नाव एकेकाळी कॉर्डेरोसमोर आकर्षक आमिष म्हणून ठेवण्यात आले होते.


कॉर्डेरोच्या आधीच्या गुन्हेगारी नोंदी लक्षात घेता, या प्रकरणानंतर तिला पुन्हा तुरुंगवासाला सामोरे जावे लागले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. एकूणच पाहता, जेफ्री एपस्टीनची भेट झाल्यानंतर तिचे आयुष्य सतत अधिकच अस्थिर होत गेले. तिच्या म्हणण्यानुसार, पुढील काळात इतर पुरुषांकडूनही तिचे शोषण आणि अत्याचार झाले. मात्र तिला न्यायालयीन व्यवस्थेकडून अपेक्षित न्याय मिळाला नाही, असा तिचा आरोप होता. कॉर्डेरोच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही तिच्या गोष्टींकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी अनेकदा तिच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे वृत्तांकन केले. परिणामी, एपस्टीन प्रकरणातील इतर पीडितांच्या तुलनेत तिची गोष्ट फारशी चर्चेत आली नाही.


MeToo चळवळीतील अनेकजण कॉर्डेरोला विसरले, तर एपस्टीनच्या इतर पीडित महिलांना पाठिंबा दिला, ज्यांनी पुढे येऊन सार्वजनिकपणे त्यांच्या शोषणाविषयी साक्ष दिली. आपण त्यांना वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी साक्ष देताना, त्यांच्या प्रसिद्ध वकिलांसह उभे असताना पहिले. आणि त्या पीडितांना एपस्टीनच्या संपत्तीमधून  तसेच त्याच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या इतरांकडून मिळणाऱ्या लाखो डॉलर्सच्या नुकसानभरपाईचा पूर्ण अधिकार आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही. परंतु कॉर्डेरोला तिच्या तडजोडीच्या करारातून मिळालेल्या २८,००० डॉलर्सशिवाय दुसरे काहीच मिळाले नाही.


User Image


सध्या एवा कुठे आहे? 


अँनी अरबौर हया ट्रांस पत्रकाराने “Pride source” हया माध्यमावर लिहलेल्या एका लेखात लिहलं, "मला एवा कॉर्डेरो हिला शोधण्यासाठी बराच वेळ लागला, पण अखेर मी तिला शोधून काढले. ती सध्या अशा एका आश्रय केंद्रात राहत होती, जे बेघर असलेल्या आणि एचआयव्हीसह जगणाऱ्या किंवा व्यसनाच्या समस्यांशी झुंज देणाऱ्या लोकांना राहण्याची सोय उपलब्ध करून देतात. मी त्या आश्रय केंद्रात फोन केला आणि सुरक्षा विभागाशी संपर्क साधला. मी स्वतःची ओळख पत्रकार म्हणून करून दिली आणि मला तिच्याशी बोलू द्यावे यासाठी त्यांना समजावून सांगितले. अखेर त्यांनी फोनवर माझा आणि तिचा संपर्क जोडला.

फोनच्या दुसऱ्या टोकाला तिने हळू आवाजाने प्रतिसाद दिला. मी स्वतःची ओळख करून दिली. मी तिला सांगू इच्छित होते की, माझा उद्देश एपस्टीन प्रकरणाबद्दल चर्चा करण्याचा नाहीतर फक्त तिला हे सांगण्याचा होता की लोकं तिला पूर्णपणे विसरलेले नाही. पण मी माझे बोलणे पूर्ण करण्याआधीच तिने मला थांबवले.


“मला माफ करा, पण मी नाही बोलू शकणार.”


आणि एवढे बोलून तिने फोन ठेवून दिला. माझ्या सद्हेतूने सुरू केलेल्या या शोधाचा हा काहीसा निराशाजनक शेवट होता. माध्यमांच्या पूर्वीच्या कव्हरेजमुळे तिने खूप काही सहन केले होते. आणि जरी मी तिला सांगितले होते की मी एक ट्रान्स पत्रकार आहे, तरीही मीसुद्धा तिचा गैरफायदा घेणार नाही, यावर विश्वास ठेवण्याचे तिच्याकडे कोणतेही कारण नव्हते.


अश्याच पद्धतीने जगभरातल्या माध्यमांच्या चुकीच्या कव्हरेज मुळे, समाजात ट्रांस व्यक्तींविषयी पूर्वग्रह आणि गैरसमज वाढत गेले. खरं तर या माध्यमांमध्ये  काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना ट्रांस समुदायाविषयी सखोल माहिती नसते त्यामुळे त्यांच्याविषयी असलेल्या पूर्वग्रहांना गृहितक धरून ते त्यांच्याविषयी त्यांना जे योग्य वाटेल ते लिहतात, परंतु त्याने अनेक ट्रान्सव्यक्तींचे आयुष्य पूर्णपणे बरबाद होते. भविष्यात अश्या परिणामांची जवाबदारी हे मीडिया आऊटलेट्स घेणार का? 


Source: 


https://pridesource.com/article/ava-cordero

https://law.justia.com/cases/new-york/other-courts/2008/2008-28391.htm




Share this article
‘ट्रान्स’ समुदायामध्येही शिरला जातीयवाद… दलित पारलिंगी महिलेवर जातीय हल्ला
LGBTQIA+

‘ट्रान्स’ समुदायामध्येही शिरला जातीयवाद… दलित पारलिंगी महिलेवर जातीय हल्ला

३१ मार्च २०२६ रोजी म्हणजेच ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिनाच्या दिवशी केंद्र सरकारने ट्रान्सजेंडर समुदायासाठी एक नवीन कायदा लागू केला. याच कायद्याला विरोध करण्यासाठी पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने ३ एप्रिल २०२६ रोजी एका राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण याच बैठकीत दिल्लीतील बैठकीत कार्यकर्त्या ग्रेस बानू यांच्यावर जातीयवादी हल्ला करण्यात आला.

5 min read
S
Shonali Samarth
ऑलिम्पिकमध्ये यापुढे ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंना बंदी… निर्णयामागे डोनाल्ड ट्रम्पचा हात
LGBTQIA+

ऑलिम्पिकमध्ये यापुढे ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंना बंदी… निर्णयामागे डोनाल्ड ट्रम्पचा हात

अगोदर क्रिकेट, मग अॅथलेटिक्स, हळूहळू बॉक्सिंग, जलतरण, फुटबॉल अस करता करता अखेर जगातील सर्वोच्च क्रीडा स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिकमधूनही ट्रान्सजेंडर खेळाडूंना हद्दपार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) गुरुवारी जाहीर केलेल्या नवीन पात्रता निकषानुसार पारलिंगी (ट्रान्सजेंडर) महिला खेळाडूंना आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. हा निकष २०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकपासून लागू होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धास्तीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

5 min read
S
Shonali Samarth
Transgender Rights Amendment Bill : ‘’आता कुठे सन्मानाने जगायला सुरूवात करत होतो, सरकारने पुन्हा काही दशके मागे लोटले’’...देशभरात संतापाची लाट
LGBTQIA+

Transgender Rights Amendment Bill : ‘’आता कुठे सन्मानाने जगायला सुरूवात करत होतो, सरकारने पुन्हा काही दशके मागे लोटले’’...देशभरात संतापाची लाट

केंद्र सरकारने नुकतेच लोकसभेत ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्क संरक्षण) दुरुस्ती विधेयक २०२६ कोणत्याही चर्चेविना सादर केले. हे विधेयक ट्रान्सजेंडर व्यक्तींचा सन्मान, स्वायत्तता आणि घटनात्मक संरक्षणावर आघात करणारे असल्याने ट्रान्स समूहामध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारचे हे विधेयक मागे घेण्यासाठी देशभरातून तीव्र मोहीम सुरू करण्यात आली आहे.

7 min read
S
Shonali Samarth
 No Means No… पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष रक्तदान करु शकत नाहीत, केंद्र सरकार भूमिकेवार ठाम!
LGBTQIA+

No Means No… पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष रक्तदान करु शकत नाहीत, केंद्र सरकार भूमिकेवार ठाम!

केंद्र सरकारने संभाव्य रक्तदात्यांच्या यादीमधून पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष आणि देहविक्रीच्या व्यवसायात असलेल्या महिलांना वगळ्याच्या निर्णयाचं ठामपणे समर्थन केलं आहे. सदर निर्णय भेदभाव करणारा नसून आरोग्यविषयक अभ्यासातील निष्कर्षांवर अवलंबून असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेत ट्रान्सजेंडर व्यक्ती, एमएसएम आणि देहविक्रेत्या महिलांना रक्तदात्या होण्यापासून वगळण्यात आले होते आणि न्यायालयाला ते असंवैधानिक म्हणून रद्द करण्याची विनंती केली होती.

4 min read
K
Komal Thombre
खरचं हिजडे लहान मुलं पळवतात? खरंच ते खलनायक आणि विकृत असतात? मग सिनेमा-मालिकांमध्ये तसं का दाखवलं जातं…?
LGBTQIA+

खरचं हिजडे लहान मुलं पळवतात? खरंच ते खलनायक आणि विकृत असतात? मग सिनेमा-मालिकांमध्ये तसं का दाखवलं जातं…?

चित्रपट आणि वेब सिरीजमधील पारलिंगी पात्रांचं सादरीकरण समाजात कसे गैरसमज, भीती आणि नकारात्मक प्रतिमा निर्माण करतं, याचा सखोल वेध घेणारा हा लेख आहे. योग्य प्रतिनिधित्व, वास्तव अनुभव आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून LGBTQIA समुदायाकडे पाहण्याची गरज तो ठळकपणे अधोरेखित करतो.

6 min read
S
shonali
‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अ‍ॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक
LGBTQIA+

‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अ‍ॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक

क्विअर व्यक्तींना पार्टनर किंवा मित्र शोधण्यासाठी घ्यावा लागतो डेटिंग अ‍ॅप्सचा आधार मात्र अशा अ‍ॅप्सच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत. क्वियर डेटींग अ‍ॅप, ग्रिंडरचा बेकायदेशीर उपयोग आणि त्यातली आव्हाने काय आहेत?

8 min read
S
shonali

Comments

Comments are currently disabled or loading...