चुंबनाचा इतिहास आपल्याला रोमांचित करणारा आहे. पहिले चुंबन कोणी घेतले असावे याबाबत मानववंशशास्रज्ञ आणि तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. याबाबत वेगवेगळ्या थियरी सांगितल्या जात आहेत. एक गोष्ट मात्र खरी आहे की पहिले चुंबन एक अपघातच असावा! असा अपघात जो हवाहवासा वाटला असावा…
चिंपाझी पाहून चुंबन घेण्यास सुरूवात केली असावी...
असे म्हटले जाते की चुंबनाची सुरूवात आईने मुलाला घास भरविण्यापासून झाली असावी. आधीपासून प्राणी देखील आपल्या पिल्लांना जेवण भरवताना त्यांना घास त्यांच्या तोंडात भरवताना आपल्या तोंडाने चावलेला घास सरळ आपल्या तोंडाद्वारेच आपल्या पिल्लांना भरवायचे. याला प्रिमेस्टीकेशन फूड ट्रान्सफर म्हणतात.
मानवी उत्क्रांती किंवा ह्युमन इवॉल्युशन असेच झाले असावे. चिंपाझी प्राण्यात अशा प्रकारे जेवण भरवले जाते. चिंपाझी माता आपल्या पिल्लांचे लाड करताना चुंबनही घेते. असेही असू शकते की आपण आपल्या पूर्वजांकडून म्हणजे या चिंपाझी पाहून चुंबन घेण्यास सुरूवात केली असावी.
एकमेकांचा वास घेताना अचानक एकमेकांचे चुंबन घेतले असावे..
दुसऱ्या थिअरीनूसार चुंबन निव्वळ एक अपघातच आहे. टेक्सास ए एंड एम यूनिवर्सिटीचे मानववंश शास्रज्ञ यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या मते मानवाने एकमेकांचा वास घेताना अचानक एकमेकांचे चुंबन घेतले असावे, येथूनच सुरूवात झाली असावी चुंबनाची! या दाव्यात थोडा दम वाटतोय कारण की पूर्वीच्या काळात आपण प्राण्यांप्रमाणेच वर्तन करायाचो म्हणजे एकमेकांना भेटताना आपण कूत्र्यांसारखे एकमेकांचा वास घ्यायचो.
अनेक संस्कृती असे एकमेकांना हुंगणे म्हणजे अभिवादनाचाच एक प्रकार होता. अशाप्रकारे हुंगतानाचे एखाद्या जोडीने एकमेकांचे चुंबन घेतले असावे. हे त्यातल्या त्यात सर्वाधिक तार्किक वाटते आहे.
असे म्हटले जाते चुंबनाची सुरूवात अशाच प्रकारे आपल्याच देशातून झाली असावी. नंतर प्राचीन ग्रीक आपल्या येथे आले आणि चुंबनाची कन्सेंप्ट तिकडे त्यांच्या देशात घेऊन गेले असावेत. आता भले चुंबनाला प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर भावना म्हटले जाते. तेव्हा असे नव्हते. कमीत कमी जुन्या काळात तरी असे नव्हते.
मध्य काळात युरोप मध्ये याला ग्रीटींग वा सदिच्छा म्हणूनच पाहीले जायचे. जे कनिष्ट वर्गाचे लोक उच्च वर्गाच्या लोकांसाठी करायचे. दोन समान दर्जाचे लोक एकमेकांना भेटताना एकमेकांच्या कपाळाला किंवा ओठांना चुंबन घ्यायचे. तर केवळ कनिष्ट वर्गाचा व्यक्तीच उच्च व्यक्तीच्या हाथाचे, पायाचे किंवा कपड्याच्या कोपऱ्याचे चुंबन घ्यायचा.
ओठांवरचे चुंबन प्रेमाचे प्रतीक कधी बनले?
यानंतर चुंबनाचा प्रकार आणि रूप आणखीन खोलवर गेले. त्या अधिक आवेग आला. विशेषतः ओठांवरचे चुंबन प्रेमाचे प्रतीक बनू लागले. तसेच सध्या चुंबनाच्या खास प्रकारावर फ्रान्सने आपली मोहर उमटवली आहे तो फ्रेंच किसची सुरूवात कोणा फ्रेंच जोडप्यानेच केली असावी, यावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र फ्रान्सचाच दावा तगडा आहे.
सुमारे दशकभरापूर्वी फ्रान्सनेच चुंबनाला आपल्या डिक्शनरीत समाविष्ट करीत त्याचे नामकरण केले, गलॉश असे त्याला नाव दिले गेले. आणि असा दावाही केला की पहिल्या जागतिक महायुद्धा दरम्यान फ्रान्समध्ये राहिलेल्या अमेरीकन सैनिकांनी हे रहस्य जाणून त्याचा सगळीकडे प्रसार केला. पश्चिमेकडील अनेक देश फ्रेंच किसवर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक मानववंश शास्रज्ञ वेगवेगळे दावे करीत आहेत.
ओठांच्या चुंबनावर बंदी म्हणून गालांचे चुंबन घेण्याची पद्धत सुरू झाली
रोमन शासक टायबेरीअस याने ओठांच्या चुंबनावर बंदी घातली होती. कारण याद्वारे आजार पसरण्याचा धोका होता. त्याचे साम्राज्य खूप दूरपर्यत पसरलेले होते. इजिप्त पासून इटली- जर्मनी आणि बेल्जियम – स्वित्झलँडचा मोठा हिस्सा त्याच्या ताब्यात होता. या सर्व प्रातांत चुंबनावर बंदी होती. येथूनच मग गालांचे चुंबन घेण्याची प्रथा सुरू झाली. जे आता पाश्चात्य देशांसह आपल्या येथेही चांगलेच प्रचलित आहे. 17 व्या शतकात प्लेगने थैमान घातले होते. त्यामुळे ब्रिटनसह अनेक देशांनी चुंबनावर कायद्याने बंदी घातली. याचे पालन न करणाऱ्या जबर दंड होता.
अमेरीका जो आता खुलेपणा आणि स्वातंत्र्यासाठी ओळखला जातो त्याने सार्वजनिक ठिकाणी चुंबने घेणे हे शिष्टाचाराला धरून नसल्याचे म्हटले. पहिल्या जागतिक युद्धापूर्वीची ही बाब आहे. तत्कालिन अमेरीकन राष्ट्राध्यक्ष केल्वीन कूलीज यांनी चुंबनाला वाईट गोष्ट मानले. शिष्टाचाराच्या पुस्तकात एमिली पोस्ट यांनी याला स्थान दिले होते. साल 1925 पासून अनेक वर्षे चुंबनावर बंदीच होती.
चुंबनाचा विचार करताच अनेकांच्या मनात कोणती ना कोणती रोमॅंटीक भावना जागृत होते, परंतू ते इतके रोमांटीक नाही, जेवढे आपण मानतोय जगातील 54 टक्के लोकसंख्या तर असेच मानते. अमेरीकन मानववंश शास्रज्ञांनी जगातील वेगवेगळ्या भागातील 168 संस्कृतींचा अभ्यास केला. त्यातील 46 टक्के लोक चुंबनाला रोमान्सशी जोडतात.
विशेषत: ओठांना चुंबन घेणे त्यांना रोमान्स वाटतो. बाकीच्यांनी त्यास महत्व दिले नाही. जगातील अनेक भागात आता चुंबनाला वाईट मानले जात आहे. सोमालिया देशात यास आजार पसरवणारा प्रकार मानला जातो. बोलिवीयाचा सिरिओना जाती किसिंगपासून लांब आहेत. कदाचित एकमेकांना समजण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी या जाती आजही एकमेकांना हुंगत असतील !
चुंबन ही प्रथा वाईट असो किंवा चांगली प्रेमात मात्र चुंबनाला नक्कीच अढळ स्थान आहे. चुंबन घेणं ही प्रथा तशी थोडी विचित्रच आहे. आपण आपली लाळ दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करतो आणि कधी कधी ही क्रिया खूप वेळ चालते. शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर एका चुंबनामुळे 80 लाख बॅक्टेरिया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असतात. असं असतानाही चुंबनाला इतकं महत्त्व कसं आलं असेल? अनेक समुदायांमध्ये खरंच चुंबनाला एक आगळं महत्त्व आहे.
पाश्चिमात्य समाजातील लोकांना असं वाटतं की चुंबन हा सार्वत्रिक वर्तणुकीचा भाग आहे. तर एका नवीन अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की अर्ध्याअधिक समाजांच मत मात्र याच्या उलट आहे. तर प्राण्यांमध्ये चुंबन अतिशय दुर्मिळच आहे.
चुंबनाचा इतिहास नेमका किती जुना ?
चुंबन ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे. त्यामुळेच सृष्टीच्या प्रारंभापासून ते अस्तित्त्वात असणारच, म्हणूनच ते कोणत्याही एका संस्कृतीची मक्तेदारी असू शकत नाही. असे असले तरी चुंबनाचा वस्तुनिष्ठ पुरावा मानवी उत्क्रांतीतील ‘निएंडरथल्’ व मानवाच्या इतर पूर्वजांनी तब्बल एक लाख वर्षांपूर्वी घेतलेल्या चुंबनाचा सापडतो, हे या नव्या संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध करण्यात आले आहे. दस्तावेजीय पुराव्यांनुसार भारतात चुंबनाचा सर्वात प्राचीन पुरावा असल्याचे मानले जात होते.
टेक्सास विद्यापीठाचे मानववंशशास्त्रज्ञ व प्राध्यापक दिवंगत वॉन ब्रायंटन यांनी केलेल्या संशोधनाचा दाखला अनेकदा या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी दिला जातो. ब्रायंटन यांच्या म्हणण्यानुसार इसवीसन पूर्व 1500 वर्षांपूर्वी वैदिक वाङ् मयात अधरावर स्पर्श करून करण्यात येणाऱ्या चुंबनाचे पुरावे आहेत. त्यांच्याच मतानुसार अलेक्झांडर द ग्रेटने भारतीय चुंबनाचा प्रसार युरोपात केला. ब्रायंटन यांनी नमूद केल्याप्रमाणे जगात इतरत्र कुठेही प्रणय अधर चुंबनाचे इतके प्राचीन पुरावे सापडत नाही, ते केवळ भारतात वेदांमध्येच सापडतात.
प्रेमिकांमध्ये एकमेकांवर नाक घासण्याचे संदर्भ भारतात सापडतात. हे प्रेमिकांमधील स्नेहाचे लक्षण आहे. …हाच तो क्षण, पुढे चुंबन स्वरूपात अस्तित्त्वात आला, असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. वैदिक साहित्यानंतर महाभारत, कामसूत्र अशा अनेक ग्रंथांमध्ये ‘अधर प्रणया’चे संदर्भ सापडतात. परंतु नवीन संशोधनाने भारतात चुंबन विकसित झाले या संशोधनाला आव्हान दिले आहे.
वैदिक वाङ् मयात येणारे चुंबनाचे- शृंगाराचे संदर्भ
भारतीय संस्कृतीत चार पुरुषार्थ महत्त्वाचे मानले जातात, त्यात अर्थ, धर्म, काम, मोक्ष यांचा समावेश होतो. म्हणजेच भारतीय संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानवी आयुष्यातील महत्त्वाचा घटक समाजाला जातो. काम हे वेदांमध्ये उत्पादक बीज मानले गेले आहे. ऋग्वेदातील पुरुरवा – उर्वशी तसेच यम – यमी यांच्या संवादात कामवासनेचे व प्रेमाचे वर्णन आले आहे.
वैदिक वाङ् मयातील कथा- प्रसंगावरून सामान्य माणसाच्या आयुष्यात कामजीवनाचे असलेले महत्त्व विशद होते. अथर्ववेदात काम किंवा इच्छा ही वैश्विक शक्ती मानलेली आहे. किंबहुना सर्व देवतांमध्ये या शक्तीला उच्च स्थान प्रधान केलेले आहे. याच वैश्विक शक्तीलाच अथर्ववेदामध्ये अग्नी असे संबोधले आहे.
ब्राह्मण ग्रंथात वर्णिलेल्या फलउत्पादक विधींमध्ये शृंगारचेष्टांना स्थान दिलेले आहे. ऋग्वेदाच्या विवाह सुक्तात समागमनाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात यज्ञ वेदीला स्त्री तर अग्नीला तिचा पती म्हणून संबोधले आहे. उपनिषदात समागम प्रक्रियेचे प्रतिकात्मक विवेचन आलेले आहे. वात्सायनाचे कामसूत्र हा कामशास्त्रावर आधारित पहिलाच ग्रंथ नाही, तर भारतीय संस्कृतीत या विषयावर संशोधनाची मोठी परंपरा आहे.





