कोमल ठोंबरे
आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात, अनेक गोष्टी उलगडल्या गेल्या आहेत, ज्या पूर्वी रहस्यमय आणि अतार्किक वाटत होत्या. तरीही, समाजात अजूनही अनेक अंधश्रद्धा आणि अतार्किक कल्पनांचं जाळं पसरलेलं आहे. भूत-प्रेत, आत्मा, जादू-टोणा अशा अनेक गोष्टींवर आजही लोक विश्वास ठेवतात, ज्यामुळे अनेकवेळा त्यांचं शोषण होतं, त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी, इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीसारख्या संस्था भारतात कार्यरत आहेत.
इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी, एक अशी संस्था आहे, जी विज्ञान आणि तर्कशुद्ध विचारांवर आधारलेली आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश लोकांना असामान्य आणि रहस्यमय घटनांमागील सत्य शोधण्यात मदत करणं आहे. अनेकवेळा लोक भूत-प्रेत किंवा अन्य अतार्किक गोष्टींचा अनुभव घेतात, ज्यामुळे ते घाबरतात आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकतात. इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी अशा लोकांना वैज्ञानिक पद्धतीनं समजावून सांगते की त्या अनुभवांचं खरं कारण काय असू शकतं. संस्थेचे सदस्य विविध वैज्ञानिक पद्धती आणि उपकरणांचा वापर करून अशा घटनांची तपासणी करतात आणि लोकांना सत्य माहिती देतात.
कोण होता गौरव तिवारी, जो आत्म्यांशी बोलायचा म्हणे?
या संस्थेची स्थापना गौरव तिवारी याने केली होती. गौरव तिवारी, एक विज्ञान लेखक आणि संशोधक होता, ज्याने अनेक वर्षं असामान्य घटनांचा अभ्यास केला आणि लोकांना त्याबद्दल जागरूक करण्याचं काम केलं. गौरव तिवारी हा एक पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर होता. गौरवने भूतांचे जग, त्यांच्या श्रद्धा मांडल्या आणि अनेक विश्वास ठेवण्यास कठीण प्रश्नांची उत्तरे शोधून दिली. उदाहरणार्थ, मृत्यूनंतर काय होते? आत्मा कुठे जातो? भूत खरोखर अस्तित्वात असतात का? गौरव तिवारीने अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्या कामातून लोकांना दाखवून दिली. अचानक एक दिवस गौरव तिवारीच्या मृत्यूची बातमी आली. 7 जुलै 2016 रोजी त्याचा रहस्यमयी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह तो राहत असलेल्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये आढळला. आज 9 वर्षांनंतरही गौरवच्या मृत्यूचे गूढ उलगडले नाही.
“भय: द गौरव तिवारी मिस्ट्री”
तर याच पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर गौरव तिवारीच्या आयुष्यावर नुकतीच ओटीटी प्लॅटफॉमवर “भय: द गौरव तिवारी मिस्ट्री” ही वेब मालिका प्रदर्शित झाली आहे. च्या रहस्यमयी आयुष्यावर ही सीरिज बनवण्यात आली आहे.’भय’मध्ये “स्पेशल ऑप्स” या सुपरहिट वेब सिरीजमध्ये रॉ एजंट फारुक अलीची शक्तिशाली भूमिका साकारणारा अभिनेता करण टॅकरने गौरवची भूमिका साकारली आहे. “भय: द गौरव तिवारी मिस्ट्री” चा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा त्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला. अवघ्या 24 तासांत हा ट्रेलर 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला. या वेब सीरिजमध्ये करण टॅकर, कल्की कोचलिन, दानिश सूद, निमेश नायर, सलोनी बत्रा, घनश्याम गर्ग आणि इतर अनेक कलाकार आहेत. ही मालिका बॉबी ग्रेवाल यांनी दिग्दर्शित केली आहे.
पायलटचा जॉब सोडला आणि बनला पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर
तर पुन्हा वळू या गौरव तिवारी नावाच्या अवलियाकडे…गौरव तिवारी हा एक पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर होता. पण या क्षेत्रात येण्याआधी त्याला पायलट व्हायचे होते आणि तो त्यासाठी अमेरिकेला गेला होता. तिथे त्याने एविएशन सेक्टर क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की त्याचा हा नवीन प्रवास सुरु झाला. तिथं तो ज्या घरात भाड्यानं राहत होता, तिथं त्याला चित्रविचित्र हालचाली जाणवल्या. त्याला वाटायला लागलं की, आपल्या आजूबाजूला कुणीतरी अदृश्य व्यक्ती आहे. या गोष्टीमुळं त्याची पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बद्दल उत्सुकता वाढली आणि त्यानं 2006 मध्ये आपलं पायलट ट्रेनिंग सोडलं. सलग तीन वर्ष त्यानं याबद्दल रिसर्च केला. वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या, बरीच रहस्य सोडवली.
२००९ मध्ये तो भारतात परत आला, इथं त्यानं इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली. या विषयात इंटरेस्ट असलेले आणखी लोक या सोसायटीचा हिस्सा झाले. भुताटकीसाठी फेमस असलेल्या जागांना गौरव तिथं भेट द्यायचा. त्याच दरम्यान एमटीव्हीवर Haunted Weekends with Sunny Leone हा शो सुरू झाला होता. गौरव तिवारी या शोमध्ये काम करायचा, जो सगळ्या गोष्टींचा अचूक शोध घ्यायचा. कसलंही गूढ शोधून काढायचा. हिरव्या लाईटमध्ये मशीन वगैरे घेऊन जायचा. कॅमेरा आणि इतर उपकरणं वापरुन तो लोकांच्या भितीमागचं सत्य शोधून काढायचा. विज्ञानाचा वापर करुन त्यानं कित्येक ठिकाणचा फोलपणा उघड केला होता. सोबतच त्यानं काही ठिकाणी असलेल्या पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीबद्दलही माहिती दिली होती. तो अशा भन्नाट जागांचे व्हिडिओही काढायचा आणि ते बघून शप्पथ भीती वाटायची.
गौरवची इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी नेमकी काय काम करायची?
गौरव जी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी चालवायचा, त्यांना अनेक लोकांचे फोन ईमेल यायचे. त्यानुसार हे लोक त्या ठिकाणांवर जाऊन त्यांच्या समस्या सोडवायचे. जवळपास ६ हजार जागांना गौरवनं भेट दिली होती. त्यानं एमटीव्हीचं गर्ल्स नाईट आऊट, ऑस्ट्रेलियाः हॉन्टींग अशा टीव्ही शोजमध्ये 16 डिसेंबर आणि टॅगो चार्ली अशा पिक्चरमध्येही काम केलं. गौरवने भूतांचे जग, त्यांच्या श्रद्धा मांडल्या आणि अनेक विश्वास ठेवण्यास कठीण प्रश्नांची उत्तरे शोधून दिली. उदाहरणार्थ, मृत्यूनंतर काय होते? आत्मा कुठे जातो? भूत खरोखर अस्तित्वात असतात का? गौरव तिवारीने अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्या कामातून लोकांना दाखवून दिली.
असेही म्हटले जायचे आणि सीरिजमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे तो खरोखरंच दुसऱ्या जगाशी कनेक्ट होऊ शकत होता. तो आत्म्यांशी बोलायचा, त्यांना मुक्ती न मिळण्यामागील कारणे जाणून घ्यायचा. तो त्या एनर्जीशी एकरूप व्हायचा. याचा अनेकांनी अनुभव घेतल्याचंही सांगितलं आहे. भूत-प्रेतांचा बालेकिल्ला समजला जाणारा राजस्थानमधील भानगड किल्ला नेहमीच चर्चेत राहिला आहे. येथे तंत्र-मंत्र जाणणारे (पॅरानॉर्मल सोसायटी) लोक नेहमीच फिरत असतात. त्यातील कोणी भूत पाहिल्याचा दावा करतो तर काही या फक्त अफवा असल्याचे छातीठोक सांगतात. विशेष म्हणजे भारतीय पुरातत्व विभागानेही सूर्यास्तानंतर येथे जाण्यास बंदी केली आहे. परंतु, पॅरानॉर्मल रिसर्चर गौरव तिवारी त्याच्या टीमसह येथे पोहोचला होता. त्याने एक रात्र येथे घालावली आणि भूतांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
गौरव तिवारीचा गुढ मृत्यू आणि न उलगडलेले रहस्य
मग 2016 मध्ये बातमी आली, त्याच्या मृत्यूची. मुख्य म्हणजे यातही गुढ होतंच… त्याच्या मृत्यूची बरीच चर्चा झाली आणि लोकांना अनेक प्रश्नही पडले, तो नेमकं करायचा काय ? तो या कामाकडे कसा काय वळला? पण सगळ्यात मोठा प्रश्न होता ? तो म्हणजे त्याचा मृत्यू कसा झाला ?
'फर्स्टपोस्ट'नं दिलेल्या माहितीनुसार, एका पॅरानॉर्मल साईटची तपासणी करुन गौरव घरी आला होता. तो दिल्लीतील द्वारका येथील सेक्टर 19 मध्ये त्याच्या कुटुंबासह राहत होता. त्यानंतर त्यानं आपल्या लॅपटॉपवर काही ईमेलही चेक केले आणि नंतर झोपला. सकाळी पुन्हा लॅपटॉप वर काम केलं आणि काही वेळानं बाथरुममध्ये गेला. थोड्या वेळानंतर त्याच्या घरच्यांना काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी दार तोडून पाहिलं, तेव्हा त्यांना गौरव अस्वस्थ अवस्थेत पडल्याचं दिसतं आणि त्यांनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र त्याचे प्राण वाचले नाहीत.
गौरवच्या मृत्यूचं गूढ वाढण्याचं कारण होतं, ते म्हणजे त्यानं त्याच्या वडिलांशी साधलेला संवाद. इतर वेळी तो आपल्या कामाबद्दल कुणाशी चर्चा करायचा नाही, मात्र मृत्यूच्या काही दिवस आधीच तो वडिलांना म्हणालेला की, 'एक अदृश्य शक्ती सतत माझ्या बरोबर असल्याचा भास होतो, कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी मला खेचून घेतीये असं वाटतं.'
त्यात चौकशी दरम्यान त्याच्या बायकोनं खुलासा केला की, 'गौरवनं मला सांगितलेलं की काही निगेटिव्ह एनर्जी त्याला मरण्यासाठी मजबूर करतायत.'
गौरवचा पॅरानॉर्मल ठिकाणचा वावर, स्मशानासारख्या ठिकाणी सतत जाणं यामुळे अनेकांनी त्याचा मृत्यू अशाच कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जीमुळे झाला असावा असा अंदाज वर्तवला. त्यात त्याच्या गळ्ळ्यावर काळी खून असल्याची बातमी पसरली आणि अफवांना अधिकच पेव फुटलं. त्यामुळं सगळ्याचं ठोस उत्तर पोलिसांच्या तपासातूनच मिळणार होतं....
गुढ मृत्यू नसून आत्महत्याच…
पोलिसांचा प्राथमिक तपास आणि पोस्टमार्टम रिपोर्टवरुन असं समोर आलं की, गौरवनं आत्महत्या केली. त्यानं बाथरूममध्ये ओढणीनं गळफास घेतला आणि त्याचीच खूण त्याच्या गळ्यावर उमटली. या आत्महत्येचं कारण पोलिसांनी, 'घरगुती भांडणं आणि तणाव' असल्याचं सांगितलं.(photo credit: DNA)
मात्र गौरवच्या घरच्यांचं म्हणणं होतं की, 'त्याच्यावर तणाव असण्याचं काही कारणच नव्हतं. त्याच्यात जबरदस्त हिंमत होती. उपकरणं आली, तरीही त्याची टीम फक्त गौरवच्या अनुभवावर वेगवेगळ्या ठिकाणी जायची. त्यामुळे तो असं काही करणं शक्यच नाही.'
पोलिसांकडून कारण सांगितलं जात होतं आणि गौरवच्या घरचे मात्र तो असं काही करणार नाही यावर ठाम होते, या सगळ्यात लोकांमधल्या अफवांना पेव फुटलं ते गौरवनं बायकोला सांगितलेल्या निगेटिव्ह एनर्जीमुळं. साहजिकच ठोस कारण पुढं आलं नाही आणि हजारो ठिकाणांचं गूढ उलगडणाऱ्या गौरव तिवारीच्या मृत्यूचं गूढ कायम राहिलं.






