Skip to main content

‘कुराक’... जगभर गाजलेल्या या सिनेमावर त्यांच्या देशात मात्र बंदी, काय आहे ‘आला काचू’ ही कुप्रथा…?

Narendra Bandbe
Today
3 min read
20 views
 ‘कुराक’... जगभर गाजलेल्या या सिनेमावर त्यांच्या देशात मात्र बंदी, काय आहे  ‘आला काचू’ ही कुप्रथा…?

नरेद्र बंडबे



  • ‘कुराक’ या किर्गिझस्थानी सिनेमाने जगभरातील अनेक प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिकं मिळवली. जगभरातून या सिनेमाबद्दल भरभरून बोललं जात आहे.


  • मात्र या ‘कुराक’ सिनेमावर आता त्याच देशात म्हणजे किर्गिझस्तानमध्ये बंदी टाकण्यात आली आहे.


  • किर्गिझस्थानमधील ‘आला काचू’ या महिलांविरुद्धच्या कुप्रथेविरुद्ध हा सिनेमा आवाज उठवतो, म्हणूनच सिनेमावर बंदी टाकली आहे.



एखादा सिनेमा जगभरातल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्‍ये गाजतो, पण स्वतःच्या देशात त्याच्यावर बंदी येते, याला काय म्हणणार? कुराक (२०२५) या किर्गिझस्थानी सिनेमाबद्दल असं घडलं आहे.


७ ते १२ जून या कालावधीत किर्गिझस्तानमध्ये चौथा बिश्केक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पार पडला. दिग्दर्शक जोडी एरके झुमाकमातोव्हा आणि एमिल आतागेल्दियेव्ह यांच्या कुराक (२०२५) सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. किर्गिझ प्रेक्षक पहिल्यांदा कुराक पाहणार होते. बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल,दक्षिण कोरीयामध्ये दोन महत्त्वाचे पुरस्‍कार, ढाका फिल्म आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल बांग्लादेशमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म आणि जगभरातल्या महत्त्वाच्या फेस्टिव्हलमध्ये लागलेली वर्णी यामुळं किर्गिझ प्रेक्षक कुराकची आतुरतेने वाट पाहत होते. ९ आणि १० जून असे सिनेमाचे दोन शो होते. ९ तारखेच्या सकाळी किर्गिझ सिनेमॅटोग्राफी डिपार्टमेंटनं कुराकला प्रदर्शनासाठी लागणारं प्रमाणपत्र नाकारलं. दोन्ही शो रद्द करण्यात आले. सिनेमावर बंदी घालण्यात आली. 


आता फक्त फिल्म फेस्टिव्हलच नव्हे तर कुराकचं किर्गिझस्थानमध्ये कधीच प्रदर्शन होणार नाही. दिग्दर्शक जोडीमधले एमिल आतागेल्दियेव्ह सध्या हयात नाहीत. दुसरी दिग्दर्शका एरके झुमाकमातोव्हा बिश्केक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या उपाध्यक्षा आहेत. असं असताना सिनेमावर आलेली बंदी अनपेक्षित होती. लोकांनी सिनेमा पाहायला गर्दी केली. पण त्यांना परत जावं लागलं. सिनेमाचा विषय पाहता देशात सामाजिक अराजकता किंवा अस्वस्थता निर्माण होईल या कारणास्तव ही बंदी घालण्यात आलीय. 


काय आहे कुराकचं कथानक…?


कुराक हा एक सुडपट आहे. शहराच्या मेयरचा मुलगा एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. मित्रांसोबत तिच्यावर सामुहिक बलात्कार करतो. तिचे नग्न फोटो काढतो आणि ते वेबसाईटवर टाकतो. बदनाम झाल्यानं ती मुलगी आत्महत्या करते. आईला न्याय मिळत नाही. मग आई मेयरच्या आरोपी मुलाला मारुन टाकते. अशी ही सरळ रेषेतली फिल्म आहे. या मुलीसोबतच तिच्या आणखी एका मैत्रिणीची गोष्टीही कथानकांत गुंफलंय. 


User Image

२०२० ला बिश्केक शहरात महिलांच्या हक्कांसाठी मोठं आंदोलन झालं. तिथं काही लोक गर्दीत घुसले आणि पोलिसांसमोर आंदोलक महिलांना मारहाण करण्यात आली. पोलीस बघे बनले, हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी जखमी आंदोलक महिलांना अटक केली. त्यातल्या अनेक महिला या ६ ते ८ महिने जेलमध्ये होत्या. काहींना तर २ वर्षे जामिन मिळाला नव्हता. हे सर्व मीडियात कुठेच येत नव्हतं. कुराक सिनेमाची सुरुवात याच महिला आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या ओरिजिनल फुटेजने होते.


शिवाय कुराक सिनेमा किर्गिझस्थान, कझाकिस्थान आदी मध्य आशियातल्या ‘आला काचू’ या प्रथेवर थेट भाष्य करतो. बंदीचं खरं कारण ‘आला काचू वर’ होणारी टीका आणि त्याविरोधात सतत होणारी महिला संघटनांची आंदोलनं हा देशांतर्गत मोठा कळीचा मुद्दा आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी बदनामी असं दुहेरी कात्रीत सापडलेल्या किर्गिझ रिपब्लिक सरकारच्या सिनेमॅटोग्राफी डिपार्टमेन्टने कुराकवर बंदी घातलेय. 


काय आहे ही वादग्रस्त ‘आला काचू’ प्रथा…?


किर्गिझस्थानमध्ये महिलांवर अतोनात अत्याचार होतात. घरगुती भांडणं नेहमीचीच आहेत. पण इथे आला काचू ही भयंकर प्रथा पिढ्यानंपिढ्या सुरु आहे. आला काचू म्हणजे तरुण मुलीचं अपहरण करुन आधी तिच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर तिला जबरदस्ती लग्न करायला भाग पाडायचं. किर्गिझस्तान आणि कझाकीस्थानमध्ये आला काचू जास्त प्रचलित आहे.


User Image

बरं हे अपहरण आणि बलात्कार करणारे पुरुष पिडित महिलेचे नातेवाईकच असतात. म्हणजे हा नराधम ओळखीचा असतो. ग्रामीण भागात आला काचूची स्थिती अतिशय भयंकर आहे. तिथं दर ३ पैकी १ लग्न हे आला काचू मुळेच होतं. या विरोधात महिलांनी आता आवाज उठवायला सुरुवात केलीय. 


कसा विरोध करतायत महिला…?


आला काचू प्रथा आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बिश्केक फेमिनिस्ट इनिशिएटिव्ह (BFI) ची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली. यात फक्त महिलांचे नव्हे तर LGBTQ+ यांचाही समावेश करण्यात आलाय. ही तळागाळातल्या पिडीतांसाठी काम करणारी संघटना आहे. २०१६ पासून BFI आंतरराष्ट्रीय महिला दिनाला आंदोलन करतं. मध्य आशियात होणार हे अश्या प्रकारचं पहिलं आंदोलन आहे. 


‘बीर ड्युनो किर्गिझस्थान’ ही मानवी हक्कांसाठी काम करणारी संघटना आहे. ही संघटना महिलांना सामाजिक आणि राजकिय स्थान मिळवून देण्यासाठी काम करते. या संघटनेतर्फे महिलांच्या हक्क आणि अधिकारांबद्दल फिल्म फेस्टिव्हल आयोजित करते. ‘अल्गा’ ही किर्गिझस्थानातल्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी काम करणारी संघटना आहे. शिवाय युनायटेड टू एंड व्हायलन्स अगेन्स्ट वुमन एंड गर्ल्स ही संघटना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे इथं महिलांच्या सुरक्षा आणि हक्कांसाठी काम करत आहे. 


हे असं असतानाही कायद्याचा धाक नाही. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण फारच नगण्य आहे. २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षी झालेल्या महिला हक्काच्या आंदोलनांमध्ये घुसखोर घुसले आणि त्यांनी महिलांना मारहाण केली आणि पळून गेले. या महिलांवर दाखल झालेले गुन्हे अजूनपर्यंत मागे घैण्यात आलेले नाहीत. 


कुराक आणि किर्गिझ महिलेचा संघर्ष 


कुराक म्हणजे चट्याचट्ट्यांची पॅचवर्क असलेली गोधडी. ही गोधडी घरातल्या महिला तयार करतात. तिचा वापर भिंतीवर आणि जमिनीवर करण्यात येतो. दिसायला आकर्षक असणारी ही पॅचवर्क गोधडी किर्गिझ महिलांच्या विखुरलेल्या आयुष्याला ठिगळ लावण्याचा प्रयत्न आहे असं प्रतिकात्मकपणे कुराक सिनेमात आलंय. 


User Image

कुराक हा को-प्रोडक्शन सिनेमा आहे. फ्रान्स - किर्गिझस्थान या दोन देशांसोबत स्वित्झर्लंड, सर्विया, लक्षमबर्ग, इटली आणि नेदरलँड आदी देशांनी कुराकची निर्मिती केलीय. अशी आंतरराष्ट्रीय निर्मिती असलेला हा अलिकडचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमामुळं किर्गिझ सिनेमाला जागतिक पातळीवर ओळख मिळाली. किर्गिझस्थान सरकारने वेगवेगळ्या देशात आणि फिल्म फेस्टिव्हल दरम्यान लावलेल्या फिल्म स्टॉलमध्ये कुराकचं पोष्टर लावण्यात आला. पण जेव्हा देशात सिनेमा  दाखवण्याची पाळी आली तेव्हा सिनेमॅटोग्राफी डिपार्टमेंटने त्याला लाल सिग्नल दाखवला. आता कुराकचं भवितव्य लालफितीत अडकलंय. त्यातून त्याची कधी लुटका होईल याचा अंदाज नाही. 


जोवर फिल्म रिलीज होणार नाही तोवर लढत राहणार असा ठाम इरादा दिग्दर्शिका एरके झुमाकमातोव्हा यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावलेय.


Share this article
 'मैं वापस आऊंगा', पण अशा प्रकारे नाही...
कला / साहित्य / सिनेमा

'मैं वापस आऊंगा', पण अशा प्रकारे नाही...

इम्तियाज अली यांचा 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट फाळणीला पार्श्वभूमी म्हणून वापरत एक सुंदर प्रेमकथा पडद्यावर उभी करतो. द्वेषाच्या या ‘धुरंधर’ काळात 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटातील हा प्रेमाचा धागा जणू प्रचंड उकाड्यात पडलेल्या थंडगार पर्जन्यसरीसारखा वाटतो.

4 min read
M
Manish Azad
अस्सी: 'पुरुषी' भावविश्व उलगडणारा सिनेमा…
कला / साहित्य / सिनेमा

अस्सी: 'पुरुषी' भावविश्व उलगडणारा सिनेमा…

बलात्काराच्या एका प्रकरणाभोवती फिरणारा अनुभव सिन्हांचा 'अस्सी' हा चित्रपट प्रथमदर्शनी स्त्रियांवरील हिंसेची कथा वाटतो. मात्र कथानक जसजसं उलगडत जातं, तसतसा हा चित्रपट हिंसेच्या मुळाशी असलेल्या पुरुषी भावविश्वाचा शोध घेऊ लागतो. आरोपींपासून ते पीडितेच्या पतीपर्यंत, न्यायव्यवस्थेपासून ते पोलीस यंत्रणेपर्यंत आणि एका सहा वर्षांच्या मुलापासून ते गुप्तहेरापर्यंत विविध पुरुष व्यक्तिरेखा या चित्रपटात समोर येतात. त्यांच्यामधून पुरुषत्वाची अनेक परस्परविरोधी रूपं उलगडत जातात. स्त्रियांवरील अत्याचार हा केवळ स्त्रियांचा प्रश्न नसून पुरुषत्वाची घडण, सत्ता, हिंसा, काळजी, जबाबदारी आणि न्याय यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांशी जोडलेला सामाजिक प्रश्न आहे, हे 'अस्सी' ठामपणे अधोरेखित करतो.

12 min read
V
Viraj Rajshri
ज्या गुन्ह्याने दिल्लीची ओळख बदलली… रंगा-बिल्ला प्रकरणाचा काळाकुट्ट इतिहास!
कला / साहित्य / सिनेमा

ज्या गुन्ह्याने दिल्लीची ओळख बदलली… रंगा-बिल्ला प्रकरणाचा काळाकुट्ट इतिहास!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राख’ या वेब सिरीजमुळे १९७८ मधील कुप्रसिद्ध रंगा-बिल्ला प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या या गुन्ह्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांच्या गीता आणि संजय या किशोरवयीन मुलांचे अपहरण, गीतेवरील लैंगिक अत्याचार आणि दोघांची निर्घृण हत्या यामुळे दिल्लीच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या प्रकरणाविरोधात जनक्षोभ इतका तीव्र होता की जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींपर्यंत सर्व स्तरांवर फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. अवघ्या चार वर्षांत रंगा आणि बिल्लाला फाशी देण्यात आली. आजही भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात भीषण आणि चर्चित प्रकरणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या घटनेने दिल्लीच्या सामाजिक मानसावर खोल परिणाम केला. ‘राख’च्या निमित्ताने पुन्हा एकदा या काळ्याकुट्ट इतिहासाचा मागोवा.

8 min read
T
Team BaiManus
आणीबाणीपासून युट्यूबपर्यंत… पराभूत न झालेला कॅमेरा आणि ‘डॉक्युमेंट्रीकार’ आनंद पटवर्धनांची लढाई!
कला / साहित्य / सिनेमा

आणीबाणीपासून युट्यूबपर्यंत… पराभूत न झालेला कॅमेरा आणि ‘डॉक्युमेंट्रीकार’ आनंद पटवर्धनांची लढाई!

आणीबाणीच्या काळात गुपचूप देशाबाहेर पाठवावी लागलेली चित्रपटाची रिळे, न्यायालयात लढलेल्या सेन्सॉरशिपविरोधी लढाया आणि आता युट्यूबवरून हटवला गेलेला ‘फादर, सन अँड होली वॉर’ हा माहितीपट... गेली पाच दशकं भारतीय समाजातील अस्वस्थ सत्यांची नोंद घेणाऱ्या आनंद पटवर्धन यांचा प्रवास हा केवळ एका माहितीपट दिग्दर्शकाचा प्रवास नाही; तो भारतीय लोकशाहीच्या विवेकाचा इतिहास आहे. भारतीय माहितीपट परंपरेत अनेक महत्त्वाचे दिग्दर्शक झाले. पण अन्यायाच्या प्रत्येक नव्या रूपासमोर कॅमेरा घेऊन उभे राहण्याचे सातत्य फार थोड्यांनी दाखवले. आनंद पटवर्धन हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे नाव आहे…

11 min read
S
Shantanu Khuje
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ : टीआरपीच्या नावाखाली इतिहासाची गळचेपी?
कला / साहित्य / सिनेमा

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ : टीआरपीच्या नावाखाली इतिहासाची गळचेपी?

स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या १५२ भागांनंतर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ही मालिका केवळ मनोरंजन नव्हती, तर इतिहास, स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची कथा घराघरांत पोहोचवणारे माध्यम होती. दरम्यान, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केवळ टीआरपी हा अशा मालिकांचे भवितव्य ठरवण्याचा निकष असू शकत नाही, असे मत व्यक्त करत फुले दाम्पत्याची कथा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

3 min read
S
Sanjana Khandare
‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : एका चिमुकल्या मृत्यूचा जिवंत दस्तऐवज
कला / साहित्य / सिनेमा

‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : एका चिमुकल्या मृत्यूचा जिवंत दस्तऐवज

ट्युनिशियन दिग्दर्शिका काओथर बेन हानिया यांचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ हा चित्रपट गाझातील पाच वर्षांच्या हिंद रजबच्या मृत्यूची हृदयद्रावक कथा मांडतो. युद्ध, भीती, मानवी असहाय्यता आणि प्रशासकीय हिंसेचे भयावह वास्तव प्रेक्षकांसमोर उभे करणारा हा सिनेमा केवळ कलाकृती न राहता मानवतेच्या जखमेचा जिवंत दस्तऐवज ठरतो.

5 min read
H
Harun Sheikh

Comments

Comments are currently disabled or loading...