Skip to main content

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

Sameer Gaikwad
3 days ago
199 views
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

समीर गायकवाड


  • ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही.


  • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली.


  • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.


'सुमन सुगंध' हे सुमन कल्याणपूर यांचे मंगला खाडिलकर ह्यांनी लिहिलेलं चरित्र. ते वाचताना जाणवते की, त्यांच्या जीवनाचा प्रवास अत्यंत खडतर होता. आयुष्यभर सल लागून राहिल, अशी एक घटना त्यांच्या बाबतीत घडली होती आणि त्या घटनेच्या परिघात लता मंगेशकर, सी. रामचंद्र आणि पंडित नेहरू यांच्यासारखी उत्तुंग माणसं होती. 


1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत 'ऐ मेरे वतन के लोगों' हे अजरामर देशभक्तीपर गीत सादर केले जाणार होते. संगीतकार सी. रामचंद्र यांनी सुरुवातीला हे गाणे गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांची निवड केली होती व त्यांच्यासोबत या गाण्याचे तास न् तास सराव देखील पूर्ण झाले होते. 


मात्र हे गाणे लता मंगेशकर गाणार असल्याचे त्यांना अचानक सांगण्यात आले. शेवटच्या क्षणी इतकी मोठी ऐतिहासिक संधी हातातून निसटल्यामुळे सुमनजींना प्रचंड मानसिक त्रास झाला. ह्या घटनेची सल आणि संधी हिरावली गेल्याचे दुःख त्यांच्या मनात आयुष्यभर कायम राहिले. त्यांच्या जागी अन्य कुणी व्यक्ती असती तर तिने लता मंगेशकरांना याचा दोष सहज दिला असता!


मात्र चित्र वेगळेच होते. 'ऐ मेरे वतन के लोगो' या ऐतिहासिक गीताची निर्मिती, सुमनताई कल्याणपूर यांच्या कडून करवून घेण्यात आलेली संपूर्ण तयारी आणि ऐनवेळी त्यांना संगीतकारांनी दिलेला नकार, त्यावेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल, उद्विग्नता, नाराजी, त्याही परिस्थितीत लतादीदींचा कोणताही दोष नव्हता ह्या साऱ्या घटना आणि त्या बाबतीत त्यांचं म्हणणं, हे सर्व त्यांनी 'सुमन सुगंध'मध्ये अधोरेखित केलेय. रामचंद्र चितळकर ह्यांच्यामुळे हे कसे घडले ह्यावरही त्यात प्रकाश टाकलाय.   


User Image 


भारताच्या स्वातंत्र्यापासून ह्या गीतासंबंधीचा आणि लता मंगेशकर यांच्या बद्दलचा गैरसमज त्यांनी स्वतः होऊन दूर केला. सुमनताई व लतादीदी या दोन महान गायिकांमधील नसलेला परंतु दाखविण्यात येत असलेला संघर्ष यासंदर्भातील मळभ सुमनताईंनी स्वतःच दूर केलं; हा सुमन कल्याणपूर यांच्या मनाचा मनाचा मोठेपणाच म्हटला पाहिजे. 


सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात जे साम्य होते, त्याने त्यांना कामही दिले आणि दगाही दिला! सुमनताई ह्याकडे योगायोग म्हणून पाहत नाहीत. संधीचा अभाव राहिला हे त्या मान्य करतात. लता दीदींच्या तुलनेत त्यांना खूप कमी गाणी मिळाली आणि प्रसिद्धीही अगदी माफक मिळाली. अमुक एक गाजलेले गाणे त्यांचे आहे हेच मुळी श्रोत्यांना ठाऊक नसे. त्यांची सर्व गाणी लता दीदींची वाटत!


लता दीदींची गाणी सुमन कल्याणपूर यांनी गायली आहेत असं लोक कधी म्हणत नव्हते मात्र सुमन ताईंनी गायलेली गाणी मात्र लोकांना लता बाईंची वाटत! स्वतः सुमनताई याकडे तटस्थपणे आणि सकारात्मकतेने पाहतात. मात्र अनेकांना वाटते की, ह्या दोघीत रंजिश होती; मात्र सुमनताईंनी अशा दृष्टीकोनातून कधीही पाहिले नाही. आपल्यातल्या साम्यामुळेच आपल्याला काम मिळाले हे सांगताना त्यांनी काहीही लपवले नाही. हाच दाखला मोहम्मद रफी यांच्या सुनेने दिला आहे. 


यास्मिन खालिद रफी, ह्या मोहम्मद रफी यांच्या सूनबाई! आपल्या सासऱ्यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे; 'मोहम्मद रफी - माय अब्बा, ए मेमॉयर' ह्या चरित्रात रफी, लता आणि सुमन कल्याणपूर ह्यांच्या एका योगायोगाबद्दल लिहिलं आहे. 1960  च्या दशकाच्या सुरुवातीला एक असा टप्पा आला, जेव्हा लता मंगेशकर यांचे मोहम्मद रफी यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी त्यांच्यासोबत युगलगीत गायचे थांबवले. त्यांनी जवळपास चार वर्षे एकत्र काम केले नाही, युगल गीत गायली नाहीत. 


ह्या काळात लता दीदींनी महेंद्र कपूर यांच्यासोबत आणि तर मोहम्मद रफी ह्यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासोबत गाणी गायली," असे यास्मिन लिहितात. लताबाई   आणि रफी ह्यांनी एकत्रित गायलेल्या गाण्यांवरील रॉयल्टीच्या मुद्द्यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. लता दीदींचे म्हणणे होते की, गाण्याच्या रॉयल्टीमध्येही त्यांना काही हिस्सा मिळाला पाहिजे! त्यांनी हा मुद्दा निर्मात्यांसमोर मांडला; रफींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती.


User Image


ट्रँकबार प्रेसने प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकानुसार, लता दीदींच्या अपेक्षेच्या विपरित अशी भूमिका रफींनी घेतली. त्यांचे मत होते की, 'जेव्हा निर्मात्याने गाण्यासाठीचे मानधन गायकाला दिलेले असते तेव्हा गाण्याच्या पुढच्या कमाईत त्याचा वाटा मागण्याचा प्रश्न येत नाही.' रफींनी आपल्या भूमिकेला समर्थन दिले नाही ह्याचे लता दीदींना वाईट वाटले. आपलेच म्हणणे बरोबर आहे ह्यावर त्या ठाम होत्या, त्यांनी रफींसोबत ड्युएट्स गायला नकार दिला. 


ज्यांना रफी लता यांचे ड्युएट सॉन्ग हवे होते त्यांना लताबाईंचा पर्याय मिळाला. कोमल, मुलायम आवाजाच्या नि लता दीदींसारख्याच गोड गळ्याच्या सुमन कल्याणपूर अशांची पहिली पसंती राहिल्या. ह्या चार वर्षात त्यांना बऱ्यापैकी काम मिळालं. त्यांची गाणीही लोकप्रिय झाली मात्र ती गाणी त्यांची आहेत हे खूप कमी रसिकांना ज्ञात होतं. लता दीदींच्या जागी सुमन कल्याणपुऱ् फिट बसल्या मात्र रफींच्या जागी महेंद्र कपूर हा पर्याय काही यशस्वी ठरला नाही, कारण ह्या दोन दिग्गज गायकांच्या आवाजाचे पोत भिन्न होते!


रफी लता यांचा वाद म्युझिक इंडस्ट्रीला घातक आहे हे एव्हाना अनेकांच्या लक्षात आले होते. दिवंगत संगीत दिग्दर्शक जयकिशन यांनी अखेरीस दोघांमध्ये समेट घडवून आणला. या प्रकरणानंतर रफी आणि लता यांनी एकत्र रेकॉर्ड केलेले पहिले युगलगीत 'पलकों की छाँव में' या चित्रपटासाठी होते. हे दोघे पुन्हा एकत्र गाऊ लागले आणि सुमन कल्याणपूर यांना मिळणारी गाणी पुन्हा घटत गेली! आपला आवाज सर्वोत्कृष्ट गायिकेसारखा सेम टू सेम असणं ही बाब त्यांच्या मुळावर आली आणि त्यातच त्यांचे नुकसान झाले. 


लता बाईंच्या आधी किंवा नंतर त्यांच्या आवाजाचा कालखंड असता तर चित्र खूप खूप वेगळे दिसले असते. जग हायपोथिकल गोष्टीवर चालत नसते असं म्हणत आपण ह्यापासून सुटका करुन घेऊ शकतो मात्र वास्तव हेच होते हे नाकारू शकत नाही. यमन रागावर विलक्षण पकड असलेल्या सुमनताईंचे नाव गंमतीने यमन कल्याणपूर असेही घेतले जाई. त्यांची हिंदीतली तसेच मराठीतली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत, मात्र त्यांना संधी कमी मिळाली आणि प्रसिद्धी कमी मिळाली, हे शल्य त्या लोकप्रियतेला जोडूनच समोर येते ही बाबही कारुण्यपूर्ण आहे! 


User Image


काही वर्षांपूर्वी दारिद्र्य अवस्थेतील राणू मंडल ह्यांना सिग्नलजवळ गाताना एकाने शूट केले आणि त्या सोशल मीडिया अटेन्शन झाल्या. देशभरात त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावेळी लता दीदी हयात होत्या. त्यांनी राणू मंडल यांच्या गायकीबद्दल प्रतिक्रिया दिली होती - 'माझं नाव आणि माझ्या कामामुळं कुणाचं भलं होत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजते. पण मला वाटतं की कुणाचं अनुकरण करून मिळालेलं यश फार काळ टिकत नाही. किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि मुकेश यांची गाणी गाऊन सध्याचे गायक लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. पण ते कायम राहत नाही' ह्या विधानानंतर अनेकांनी लता बाईंवर टीका केली होती मात्र आज राणू मंडल यांची अवस्था पाहून ते भाष्य परखड असले तरी वास्तववादी होते हे लक्षात येते. 


हेच विधान आपण काळाच्या कसोटीवर अन्यायकारक अशा दृष्टीकोनातून सुमन कल्याणपूर ह्यांच्या बाबतीत लावून अभ्यासले तर लक्षात येईल की, सुमनताई कॉपी नव्हत्या! तो त्यांचा नैसर्गिक स्वर होता. ती त्यांची स्वतःची शैली होती मात्र त्या स्वरात नि शैलीत साम्य होते, मात्र ते इतके अत्युच्च दर्जाचे होते की त्यांना कधी कुणी हिणवले नाही की कमी लेखले नाही! हे साम्य, हेच त्यांचे दुर्भाग्य ठरले अन्यथा त्यांचे नावही यशाच्या शिखरावर असले असते. त्यांच्याविषयी बोलताना लिहिताना अनेकजण त्यांच्यात आणि लताबाईंच्यात रायव्हलरी असल्यासारखं भासवतात मात्र खुद्द सुमनताईंनी मात्र असं कधीही कुठेही म्हटलेले नाही, त्यांच्या चरित्रात देखील तसा उल्लेख नाही. 


सुमन कल्याणपूर ह्यांची गायकी श्रेष्ठ आणि दर्जेदार होती. त्यांच्या गाण्यातली विविधता आणि रागदारीचे बारकावे ह्याची साक्ष देतात. मराठी संगीतप्रेमी रसिकांचे त्यांच्यावर अंमळ जास्तीचे प्रेम होते कारण ज्या काळात रेडिओचे वर्चस्व होते, ज्या काळात भावगीतांचा वरचष्मा होता त्या काळात सुमन कल्याणपूर ह्यांनी मराठी संगीतसृष्टीच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य केलं! 


सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांच्यातले साम्य किती भयंकर होते, ह्याचा एक दाखला देऊन थांबतो. 1964 मधल्या 'फरियाद' सिनेमात  'हाल-ए-दिल उनको सुनाना था सुना ना गया, सुनाया ना गया' हे केदार शर्मा ह्यांचे नितांत सुंदर गाणं आहे. सुमनताईंनी ते गायलं आहे. 1964 मधल्याच 'जहां आरा' चित्रपटातलं 'हाल-ए-दिल यूं उन्हे सुना गया' हे लता बाईंनी गायलेलं गाणं तुम्ही ऐका! मग तुम्ही आश्चर्यचकित होऊन स्तब्ध व्हाल आणि मला खात्री आहे की तुम्हीही म्हणाल की, 'होय, सुमन कल्याणपूर ह्यांच्यावर अन्याय झालाय!' एका गुणी गायिकेची कदर होऊ शकली नाही हे वास्तव आहे!


अलविदा सुमनजी.. 



Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod
प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!
कला / साहित्य / सिनेमा

प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!

चहा हे असं पेय आहे, जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत सर्वच पितात. म्हणून तर मी चहाला समाजवादी पेय म्हणतो. चहा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ‘चहातरी घेऊन जा’ असं घरी आलेल्या माणसाला आपण किमान सांगतो तरी (ह्यात अस्सल सदाशिव पेठी घरं धरलेली नाहीत.) सध्या ‘रात्री सातनंतर चहा घेत नाही’ असं म्हणण्याचा जरी जमाना आलेला असला, तरी सकाळी उठल्यावर पहिली आठवण अजूनही चहाची येते. म्हणूनच आजच्या ‘आंतरराष्ट्रीय चहा दिना’निमित्त हे आपल्या जीवाभावाच्या मित्राला पत्र...

7 min read
D
Dwarkanath Sanjhgiri

Comments

Comments are currently disabled or loading...