कोंबडा अनेक देवतांचे वाहन आहे. मग आता ते कापलं का जातं एवढं मात्र विचारू नका, इतक्या मोठ्या संस्कृतीत सगळ्याच गोष्टींची उत्तरं नाहीत. पण हा कोंबडा भारतीय संस्कृतीत स्वतःची चांगलीच ओळख टिकवून आहे. पिढ्यानपिढ्या गेल्या मात्र या कोंबड्याचं कौतिक आणि संस्कृती मधलं त्याचं विविध पद्धतीचे स्थान काही ठरलं नाही.
ते होतं तसं आजही शाबूत आहे. माझा कोंबडा कोणी मारीयला... या मराठी लोकगीतात कोंबड्याचा गहिवर सांगितला आहे. अनेक जण हा तूर्रेबाज, शिरगोळीचा कलरफुल कोंबडा अगदी घरात कुत्र्यासारखा पाळतात देखील. अर्थात पाळलेला कोंबडा शक्यतो खाल्ला जात नाही.
तो घरादारात राज्य करतो. घरातल्या मुलाबाळांसारखा वावरतो. अंगणातला कोंबडा हा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. शहरातही जिथे जिथे जागा आहे तिथे हे कोंबडे पाळले जातात. झुंज लावण्यासाठी वापरला जाणारा कोंबडा हा जरी गावठी गावरान तूर्रेबाज असला तरी त्याचा व्हर्जन थोडंसं वेगळं आहे.
तो जनरल कोंबड्याच्या जाती प्रजाती मधलाच असला तरी त्याचे लढण्याचे गुण बघून तो झुंजीत जातो. विशेषत: महाराष्ट्रातल्या अनेक सणांचं खास करून मांसाहारी सण, उत्सवांमध्ये कोंबड्याचं स्थान हे आवर्जून आलं. कोकणी संस्कृतीत तर थेट गौरी गणपतीला देखील कोंबडा कापला जातो. खरंतर गणपती हा अतिशय शिस्तीचा आणि प्रचंड पवित्र देवता आहे.
मात्र तरीही कोकणी संस्कृतीत माहेरपणाला आलेल्या गौराईला कुठल्या ना कुठल्या बहाण्याने चांगलंचुंगलं माणसाचं जेवण द्यावं या विचाराची घुसखोरी झालीच आणि चक्क बाजूला गणपती बसलेला असताना घरात कोंबडा कापला जातो. त्याला परत आणखीन एक जावई नावाची कल्पना जोडलेली आहे की आता जावई आलेला आहे तर त्याला तर कोंबडा कापावाच लागेल मग तो गौरीच्या नैवेद्याच्या नावाने बार उडवला जातो, गणपती मंडपात बसलेला असतानाही. यावरून लक्षात घ्या की, कोंबडा मराठी लोकजीवनामध्ये किती महत्त्वाचा घटक ठरलेला आहे.

गटारी आणि कोबड्याचं नात…
अर्थात गटारी अमावस्या ही अलीकडे खाण्यापिण्यासाठीच्या निमित्ताची एक राष्ट्रीय पर्वणी झाली आहे. आता घरातील गटारी फक्त महाराष्ट्रापुरती किंवा महाराष्ट्रातल्या ठराविक काही तशा पद्धतीच्या संस्कृतीसाठीची ठेव राहिलेली नाही. आता गटारी थेट दिल्लीतही साजरी होते आणि गटारी म्हटली की कोंबडा आलाच. शेकडो बकरे आणि बॉयलर चिकनसोबत किमान या दिवशी तरी गावठी कोंबडा कापायला हवा.
हा मेनू ठरलेलाच असतो आणि त्यासाठी विशेषत: तूर्रेबाज गावरान कोंबड्याची मागणी वाढते. अर्थात घरात पाळलेला खुराड्या मधल्या कोंबड्यांची संख्या ही तेवढी पुरणारी नसते. जसे हिमालयीन राज्यांमधून मध्यप्रदेश, गुजरात या गवताळ प्रदेशातून 90% बकरे महाराष्ट्रात येतात त्याच पद्धतीने हे गावरान कोंबडे देखील आजूबाजूच्या राज्यांमधूनच आयात करावे लागतात.
मात्र कलरफुल तुऱ्यावाले दिसणारे सगळेच कोंबडे हे गावरान कोंबडे नाहीत बरं! गेल्या 50-60 वर्षात या कोंबड्यांवरती देखील खूप ताकदीचं विश्लेषण, संशोधन झाले. कोंबडा हा केंद्रस्थानी ठेवून त्याच्यावरती रिसर्च संशोधन, प्रबंध अगदी पीएचडी होऊ शकते हे कालपर्यंत डोक्यातही आलं नसेल. मात्र अलीकडच्या काळात उभ्या भारतात अनेक कंपन्या, अनेक व्यावसायिक, कृषी विभाग एवढेच काय की शहरी भागातल्या सुद्धा काही जाणत्या हुशार मुलांनी त्यावर संशोधन केले, पीएचडीही मिळवलेली आहे.
ठाण्यातले संघ परिवारातील ज्येष्ठ नेते डॉक्टर सुधीर रानडे यांची मुलगी आश्लेषा हीचे त्यात विशेष नाव घ्यावे लागेल. तिने मांडलेल्या अनेक महत्त्वाच्या संशोधनांपैकी कडकनाथ कोंबडा त्याच्यापासून त्याच्या मांसल मांसापासून बनणारे लोणचं म्हणजे कोंबड्याच्या मटणाचेही लोणचं बनवू शकतं, त्याचबरोबर अंडी देणाऱ्या कोंबड्या आणि अंडी देता-देता खुडुक झालेल्या कोंबड्या यांच्या संदर्भातलं असा अनेक प्रकारचे संशोधन या मंडळींनी केलेला आहे.
मात्र सर्वसामान्यांना नजरेत भरलेला आणि माहीत असलेला कुकुचकु करत भल्या पहाटे आरवणारा, तोऱ्यात चालणारा, आपली टेरिटेरी सांभाळणारा, शेजारच्या कोंबड्यावर धावून जाणारा, झुंजी मध्ये स्वतः जखमी होणारा किंवा समोरच्याला अगदी जीवे मारून टाकेल इतके प्रहार करणारा झोंबीबाज कोंबडा इतर कोंबड्यांच्या जातीपेक्षा त्याचं चालणं, त्याचं उडणं, त्याचा आवाज, त्याच्या आरवणं सारं काही वेगळं.
अशी ही बनवाबनवी…
मात्र तरीही फसगत काही टळत नाही. काय भुललासी वरलिया रंगा अशी ओवी आहे ती बिलकुल लागू पडते. हा गावरान कोंबडा जरी कलरफुल दिसला, तोऱ्यात चालला, तुरा मिरवला तरी सर्व कोंबडे दिसतात तसे नसतात, म्हणजे ते गावरान नसतात, विशेषत: कोईमत्तुरी कोंबडा हा दिसायला भयंकर कलरफुल आणि तूर्रेबाज देखणा, मात्र तो रीतसर बॉयलरचीच व्हर्जन आहे.
तर गावठी गावरान कोंबडा म्हणून सर्रासपणे विकला जाणारा शहरी बाजारपेठा मधला थोडासा तांबूस कलरचा कोंबडा किंवा कोंबडी ही संकरित RR जातीतली आहे. आणि तिचं प्रमाण शंभरात नव्वद टक्के आहे. त्यामुळे इथे कस लागतो की आपण घेतलेला गावरान कोंबडा हा गावरान आहे, हायब्रीड संकरित आहे की त्याच्यासारखाच बनवलेली एक व्यापारी जात आहे. पण शक्यतो आजही महाराष्ट्रात गावरान कोंबडा ओळखणारी मोठ्या प्रमाणावरती लोक आहेत.

या गावरान कोंबड्याचं देखील संशोधन फार इंटरेस्टिंग आहे. कोम्बो हा आपल्या देशातही पाहुणा आहे. तसं जंगलातल्या हजारो पक्षांच्या जातीप्रमाणेच कोंबडा ही पक्षातली एक जात आहे. जसा घोडा, हत्ती माणसळला, माणसाने तो स्वतःच्या सेवेसाठी जुंपला, कोंबड्याचाही तसंच आहे.
त्याच्या पहिल्या खुणा या थायलंड मधल्या आहेत. थायलंडमध्ये अनेक वर्षांपूर्वी या कोंबड्यांचं संकरण करण्यात आलं. त्याला मोठ्या प्रमाणावरती पहिली पसंती अर्थातच नवनवे प्रयोग करणाऱ्या आणि वाटेल ते खाणाऱ्या चीनमध्ये झाली. चीनमध्ये सर्वाधिक या गावरान कोंबड्यावरती क्रिया प्रक्रिया, हायब्रीडीकरण, संकरण या साऱ्या गोष्टी पार झाल्या.
कडकनाथच्याही अगोदर गिरीनाथ, वननाथ या कोंबड्यांना पसंती
ब्रह्मपुत्रेच्या तीरावरून जी एक मोठी आदिम संस्कृती जगभरात पोहचली या संस्कृतीत बराच काळ हा गावरान कोंबडा विकसित झाला. आता त्याचे वेगवेगळे व्हर्जन, वेगवेगळ्या हायब्रीड जाती आता देशभर मिळतात. त्यातल्या त्यात दक्षिणेकडचा या गटातला कोंबडा आणि महाराष्ट्रात, तमिळनाडू, आंध्र, कर्नाटका येथील निबिड अरण्यामधले प्रचलित असलेले कोंबडे यांचे वर्गवारी उंच दर्जाची आहे.
महाराष्ट्रात कडकनाथची चर्चा आता काही वर्षाची आहे, मात्र त्यापूर्वी गिरीनाथ, वननाथ या दोन जंगलातल्या कोंबड्यांच्या जाती अनेक वर्ष प्रसिद्धीत आहेत. हे दोन्ही कोंबडे अतिशय चपळ आणि चवीला रुचकर आहेत. कारण ते अनुवंशिकरित्या पिढ्यानपिढ्या कीड मुंगी खाऊनच जंगली आदिवासीत मोठे झालेले असतात. त्यानंतर आलेला कडकनाथ हा त्याच्या काही वेगळ्या पद्धती मुळे जास्त चर्चेत आला.
काळ मटण त्याला शक्यतो कुठला व्हायरस लागत नाही आणि सणसणीत प्रजातीमुळे त्याच्यातले फॅट्स आणि त्याच्या साईड इफेक्ट ची अगदी शून्य शक्यता यामुळे कडकनाथ महाराष्ट्रातल्या बाजारपेठेवरती हुकूमत गाजवून आहे. अनेक ढाब्यांवरती एकेकाळी लोक शौकीन मंडळी ल्हावऱ्याचा आवर्जून बेत करत असत. आता मध्यमवर्गीय फॅमिलीवाली मंडळी सुद्धा ढाब्यांवरती कडकनाथ ची मेजवानी झोडतात.

बॉयलर चिकनने होणारे नुकसान
सत्तरच्या दशकात खऱ्या अर्थाने या देशाला अंडी आणि बॉयलर चिकन दररोज किती प्रमाणात लागतं याचा अंदाज आला आणि भले भले आकडे थक्क झाले. एक प्रचंड मोठी बाजारपेठ या दोन पदार्थांची होऊ शकते, हे लक्षात आल्यावर महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी कुक्कुटपालनाचे घरगुती नव्हे तर टोटली प्रोफेशनरी कारखानदारी पद्धतीचे केंद्र सुरू झाली. आजही भारतीय बाजारपेठात बॉयलर चिकनला पर्याय नाही.
त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच चालली आहे. अनेकदा मागणी एवढा पुरवठाही होत नाही. मग त्यातून बाजारपेठांमधली एक आणखीन हलकट नीती कामाला लागते. गाई म्हशींना टॉक्सन ची इंजेक्शन देऊन त्यांचं दूध ज्या पद्धतीने वाढवलं जातं त्याहीपेक्षा घातक इंजेक्शन देऊन पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांचं वजन आठवडाभरात दुप्पट केलं जातं आणि त्याचे मानवी शरीरावरती फार भयंकर परिणाम होतात.
पक्षांमध्ये अलीकडच्या काळामध्ये विशेषत: कोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यू मोठ्या प्रमाणावर ती संचारला. कोरोना काळात लाखो कोंबडी जमिनीमध्ये गाडलेली बघायला मिळाली. उत्तरोत्तर कोंबड्यांवरचा हा रोग अलीकडच्या काळात भयंकर वाढला जातोय. मात्र याच कुकुटपालनानं आता एका कारखानदारीचा एका बाजारपेठेचा रंग धारण केला आहे.
अतिशय कमी भांडवलात छोट्याशा जागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कोंबडे पाळले जाऊ शकतात. विशेषतः बॉयलरच्या दुप्पट किमतीमध्ये मिळणारा गावरान कोंबड्याचं वाण बाहेरच्या जगात अगदी युरोप खंडातही मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय म्हणून पाळले जातात.
गावरान कोंबडी पोल्ट्री फार्म तयार करण्याची महाराष्ट्रात संख्या फारच कमी आहे. आज गटारीच्या निमित्ताने खाद्याची आठवण होणं जसं स्वाभाविक आहे तसेच त्याच्या उत्तरोत्तर वाढीसाठी व्यवसायासाठी त्याचे चिंतनही होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे कोंबड आख्यान केलंय, इतकंच!!
ग्लोबल वार्मिंगचे विचित्र बदल
आता जगातल्या छोट्या-मोठ्या गरीब देशांनाही ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, याचा अंदाज येऊ लागला आहे. कोंबड्यांवरती देखील त्याचे सूक्ष्म निरीक्षण आणि विचित्र बदल घडत असल्याची संशोधनं नोंदवली गेली आहेत. त्यातला ठळक विचार करण्यासारखा बदल म्हणजे कोंबड्यांच्या अनेक जाती अलीकडे रात्री बारा वाजताच आरवण्यास सुरुवात करतात. हा बदल अनेक अर्थाने चिंतेचा आहे. मात्र त्यामागे ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याच्या साईड इफेक्ट्स चं कारण सांगितलं गेलंय.

कोकणात अगदी अनेक पिढ्यांमध्ये चुकून कधी कोंबडा त्याच्याही काही भाव विश्वातल्या बदलांमुळे, घाबरल्यामुळे किंवा जमिनीतल्या काही हालचाली कळल्यामुळे जर आरवला तर त्याचा अर्थ हा अतिशय घातक पद्धतीने घेतला जायचा.
कोंबडा मध्यरात्री आरवला म्हणजे काही अरिष्ट आहे म्हणून त्यालाच अगोदर मारून टाकण्यात येई. तो आरवल्यापासून पाच मिनिटात त्याला कापलं जाई, त्यांने अरिष्ट दूर होतं का किंवा त्याने काही इशारा दिला का या श्रद्धा अंधश्रद्धांच्या गर्दीत या विषयाचं उत्तर मात्र सायंटिफिकली शोधलं गेलं नाही.
आता मात्र या ग्लोबल बदलामध्ये कोंबड्यांच्या अनेक जाती या रात्रभर कधीही ओरडतात, अशी निरीक्षण नोंद केली आहेत. त्यातही कडकनाथ कोंबड्यांमधल्या वयस्कर कोंबड्यांचं आरवणे हे बेसुमार आहे. रात्री बारा, कधी कधी अकरा वाजताच त्यांचा आरवने सुरू होतं आणि एका वेळेची बांग दहा ते अठरा अठरा वेळा झाल्याचे पाहण्यात आले.
साधारणतः पहाटेच्या पहिल्या प्रहारात साडेतीन आणि चार च्या मध्यावर सूर्यास्त होण्याआधीच पहाटेची पहिली बांग कोंबडा देतो. हे चक्र पिढ्यानपिढ्यांचे आहे. मात्र अलीकडे कोंबड्यांचं हे अवेळी भविष्यातल्या श्रद्धा अंधश्रद्धा बाजूला ठेवून एका वैश्विक संकटाची चाहूल देत आहे आणि तिचा फार जवळचा संबंध ग्लोबल वार्मिंगची आहे, असं म्हटलं जातं.






