फरीदाबादच्या तुरुंगात जेव्हा सियानंद मिश्रा त्यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला भेटायला गेले तेव्हा त्या आरोपीने सियानंद यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली… आरोपी अनिल कौशिकच्या या दर्दनाक भेटीचा वृत्तांत कथन करताना सियानंद मिश्रा म्हणाले,’’त्याला वाटलं की माझा मुलगा मुसलमान आहे आणि आता एका ब्राम्हण तरुणाची हत्या केल्याचा त्याला पश्चाताप आहे.’’
गुरुग्रामच्या बजरंग दलाचा सदस्य आणि गोरक्षक अनिल कौशिकला फरीदाबादचा मोनू ‘मानेसर’ म्हणून ओळखलं जातं. कौशिक आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना १९ वर्षाच्या आयन मिश्राच्या खुनाप्रकरणी अटक झाली आहे. सुरुवातीला पोलिसांना हा एक गँगवॉरचा प्रकार वाटला होता. मात्र अधिक खोलात शिरल्यावर मिळालेली माहिती धक्कादायक होती. कौशिक आणि त्याच्या सहकाऱ्यांना एका कारमधून गोवशं तस्करी होणार असल्याची ‘टीप’ मिळाली होती.
ही घटना 24 ऑगस्टला पहाटे 3 च्या आसपास घडली जेव्हा आर्यन मिश्रा त्याच्या मित्रांसोबत कारने जात होता. कौशिकने आर्यनच्या कारला अडवलं मात्र गाडी चालवणाऱ्या आर्यनच्या मित्राने कार न थांबवात अधिक जोरात पळवायला सुरूवात केली तेव्हा याच गाडीतून गोवंश तस्करी होत असल्याचा संश्य कौशिकला आला आणि त्यांनी कारचा पाठलाग सुरू केला. 30 किमी पाठलाग केल्यानंतर फरीदाबाद टोलनाक्याजवळ कौशिकने कारच्या दिशेने गोळ्या झाडल्या ज्यात मागच्या सीटवर बसलेला आर्यन मिश्रा ठार झाला.

‘’तु कारच्या चाकांवर गोळी मारू शकला असतास’’?
आर्यनचने वडील सियानंद मिश्रा त्यांच्या फरीदाबाद येथील फ्लॅटच्या गच्चीत खुर्चीवर बसले होते. ते म्हणाले,’’मी कौशिकला विचारलं की तु एका मुसलमानाला का मारशील? फक्त गाईच्या कारणावरून?
ते पुढे म्हणाले, ‘’तु कारच्या चाकांवर गोळ्या झाडू शकला असतास किंवा पोलिसांना बोलावून घेतलं असतसं, कायदा हातात का घेतलास? यावर कौशिककडे काहीही उत्तर नव्हतं…आमच्या तीन मिनिटांच्या भेटीत तो म्हणाला की, कारच्या काचेला काळी फिल्म लावली होती. असं म्हणून हात जोडत तो माझ्याकडे पाहात होता.’’
या घटनेनंतर बजरंग दलामध्ये हडकंप माजला. त्यांनी फरीबादच्या आपल्या सगळ्या गोरक्षक कार्यकर्त्यांना सांगितलयं की, कायदा हातात घेऊ नका. जर काहीही संशयास्पद आढळलं तर सरळ पोलिसांना खबर द्या…
‘’आम्हीच आमच्या भावाला मारून टाकलं.’’
शैलेंद्र हिंदू म्हणाला की, ‘’ही घटना आमच्यासाठी एक काळा डाग आहे. या दशकातली ही इतकी वाईट घटना आहे की आम्हीच आमच्या भावाला मारून टाकलं.’’

सियानंद मिश्रा यांच्या घराच्या दरवाजावर रामाचा फोटो आणि भगवा झेंडा लावण्यात आला होता. 27 ऑगस्ट रोजी मिश्रा कुटुंब आर्यनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयागराजला असताना पोलिसांचा फोन आला. पोलिसांना संशय होता की या हत्येत गोरक्षकांचा हात आहे. अयोध्याचे एख कट्टर हिंदू कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिश्रा कुटुंबियांना पोलिसांच्या या ‘थिअरी’ जराही विश्वास नव्हता. उलट पोलीस काहीतरी लपवत आहेत असेच त्यांना वाटले.
सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आर्यनच्या वडिलांनी पोलिसांना आरोपी कौशिकला एकदा भेटण्याची विनंती केली आणि कौशिकच्या माफीनाम्यानंतर त्यांना या गोष्टीवर विश्वास बसला. सियानंद म्हणाले की, कौशिकने मला सांगितलं की निर्मनुष्य रस्त्यांवर काळ्या काचा असलेल्या गाडीतून नॉर्मली गोवंश तस्करीचे प्रकार होत असतात. काळ्या काचांमुळे आत कोण बसलयं हे आम्हाला दिसलं नाही आणि आम्ही गाडीवर अंधाधुंद फायरिंग सुरु केलं…
आर्यनसोबत त्या गाडीत एकूण चार जणं होते. त्याचा मित्र हर्षित गुलाटी (23) जो गाडी चालवत होता. हर्षितचा मोठा भाऊ शँकी (26), त्याची आई सुजाता (45) आणि त्यांची मैत्रिण किर्ती (49). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका एसयूव्ही गाडीतून गोवंश तस्करी होणार असल्याची खबर कौशिकला मिळाली होती आणि आर्यनची जी गाडी होती ती डस्टर मॉडेलची एसयूव्हीच होती.
‘’माझा मुलगा गोवंश तस्कर नव्हे तर कट्टर हिंदू होता’’
सियानंद म्हणतात की, बस यासाठीच आम्ही या गोरक्षकांना स्वातंत्र्य दिलयं की लोकांवर गोळ्या चालवण्यासाठी अवैध बंदुक बाळगा… त्यांना आणखी एक चिंता सतावतेय ती म्हणजे, आता लोक म्हणतील की माझा मुलगा गोवंश तस्कर होता. माझा आर्यन गोवंश तस्कर नसून एक कट्टर हिंदू होता, असे ते सांगतात.
आर्यन मिश्राची हत्या झाल्यानंतर फरीदाबादमध्ये शोककळा पसरली आहे. आर्यन मिश्रा हा एका मध्यम वर्गीय कुटुंबाचा होतकरू मुलगा होता. आर्यनचे वडील सियानंद मिश्रा यांनी म्हटले की, इतका गोळीबार होऊनही नेमकी माझ्या मुलालाच कशी गोळी लागली. फक्त गायींची तस्करी होते या संशयावरून कुणीही कुणावर गोळ्या कशा काय झाडू शकते? मी पंडित आहे. माझे कुणाशीही वैर नाही. आम्ही पोट भरण्यासाठी फरीदाबादमध्ये आलो होतो. पण आता आम्ही आमच्या हुशार, गुणी मुलाला गमावून बसलो.

काय घडलं होतं त्यादिवशी?
23 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता आर्यन मिश्रा त्यांचा शेजारी राहणाऱ्या हर्षीतसह बाहेर फिरायला आला होता. त्यांच्यासह हर्षीतचा भाऊ शँकी, आई आणि शेजारी राहणारी किर्ती शर्माही होती. जवळच असलेल्या वर्धमान मॉलमध्ये न्युडल्स खान्यासाठी हे लोक बाहेर पडले होते. तेवढ्यात आरोपी अनिल कौशिक यांच्या संघटनेला गायींची तस्करी करणारे काही लोक डस्टर कंपनीच्या गाडीतून येणार असल्याची गूप्त माहिती मिळाली होती. योगायोगाने आर्यन आणि त्याचे मित्रही तशाच प्रकारच्या डस्टर गाडीतून प्रवास करत होते. तसेच हर्षीतचा भाऊ शँकी हा एका खूनाच्या प्रकरणातील आरोपी होता.
त्यामुळे जेव्हा आरोपी अनिल कौशिकच्या गाडीने त्यांचा पाठलाग केला, तेव्हा त्यांनी गाडी वेगाने पळवली. तब्बल 30 किमीपर्यंत हे पाठलाग नाट्य चालले. त्यानंतर अनिल कौशिकने केलेल्या गोळीबारात एक गोळी आर्यनला लागली. गोळी लागल्यानंतर गडपुरी टोल प्लाझाजवळ हर्षीतन गाडी थांबवली. त्यानंतर अनिल कौशिक आणि इतर आरोपी गाडीतून उतरले आणि त्यांनी आर्यनच्या छातीत दुसरी गोळी घातली. मात्र गाडीत त्यांनी नजर मारल्यानंतर दोन महिला दिसल्या. ज्यावरून आपण चुकीच्या व्यक्तीला गोळी झाडल्याचे त्यांचे लक्षात आले.
‘’कौशिक तर गाईंना वाचवून देवाचे काम करतो’’
एनआयटी फरीदाबादचा गजबजलेला बाजार मंगळवारी दुपारी शांत होता. महिलांचे कपडे आणि कुर्ते विकणाऱ्या दुकानाबाहेर एक छोटासा जमाव जमला होता, जिथे पुतळे नवीन डिझाइन केलेले कपडे परिधान करत होते. चर्चेचा विषय होता आर्यन मिश्राची हत्या. आरोपी अनिल कौशिकच्या अटकेवर एका दुकानदाराने निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, “कौशिक गायी वाचवून देवाचे काम करतात हे सर्वांनाच माहीत आहे. तो एका निष्पाप माणसाला का मारेल?"

इतर काहींनी संभाव्य 'वैयक्तिक वादातून' हत्या झाल्याची थिअरी मांडली. कौशिकसारखा लोकप्रिय गोरक्षक आणि त्याची टीम एका हिंदूची हत्या करू शकते यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. दुकानात जमलेले लोक एकामागून एक थिअरी मांडत होते.
दरम्यान, आर्यनच्या घरी त्याची आई उमा कपाळावर टिळा असलेला आर्यनचा फ्रेम केलेला फोटो घरात आलेल्या लोकांना दाखवत होत्या. "त्याच्या कपाळावर नेहमी टिळक असायचा.तो खूप धार्मिक होता आणि त्याला सर्व श्लोक तोंडपाठ होते" आई येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला हेच सांगत होती. गेल्या महिन्यातच आर्यन हरिद्वारला अनवाणी पायांनी कावड यात्रेला गेला होता आणि नागपुरातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. तो परत आल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या पायाला 20 दिवस मसाज केला होता.






