जैन मुनी शांतीसागर याला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावण्यात आली आहे. एका 19 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ही शिक्षा सुरत सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराजने 2017 साली एका 19 वर्षांच्या श्राविका (महिला जैन भक्त) हिच्यावर बलात्कार केला होता. शुक्रवारी त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि आज त्याची शिक्षा जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2017 मध्ये, जैन मुनी सुरतमधील नानपूर येथील उपाश्रयात राहत होता. मध्य प्रदेशातील 19 वर्षांची मुलगी आणि तिचे कुटुंब, शांतीसागरला गुरुस्थानी मानत होते, त्यांची शांतीसागरवर खूप श्रद्धा होती. शांतीसागरने त्यांना पूजाविधीच्या बहाण्याने सुरत आश्रमात बोलावले होते.
रात्री कुटुंब आश्रयस्थानात राहिले. यावेळी, रात्री 9.30 च्या सुमारास, शांतीसागरने मुलीला पूजेचे निमित्त करून त्याच्या खोलीत बोलावले आणि कुटुंबातील सदस्यांना खोलीबाहेर उभे राहण्यास सांगितले. यावेळी, पूजेचे बहाण्याने धमकी देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला.
सुरुवातीला कुटुंब घाबरून गप्प बसले, परंतु नंतर, इतर मुलींसोबत असे घडू नये असे वाटून, कुटुंबाने घटनेच्या 13 दिवसांनी सुरतमधील अथव लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून जैन मुनी शांतीसागरलाअटक केली.
तरुणीकडून तिचे आक्षेपार्ह फोटोही मागवले
बडोद्यात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने अथवलाइन्स पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले, ती आई-वडिल व भावासोबत सुरत येथील नानपुरा टिमलियावाड येथे जैन मुनी शांतीसागर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या आई-वडिलांना व भावास एका रुममध्ये गोल चक्राकार पुजेत बसवले. जोपर्यंत शांतीसागर सांगत नाही, तोपर्यंत रुमच्या बाहेर कोणीही यायचे नाही.
असे सांगून त्याने तिला पहिल्या मजल्यावरील एका रुममध्ये नेले. तेथे शांतिसागरने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करण्याच्या आधीपासूनच आरोपी शाांतीसागर मोबाइलवरुन तिच्या संपर्कात होता. तुझ्या प्रगतीसाठी तुझे नग्न फोटो मला पाठवून दे. अशाच थापा मारुन तिच्याकडून नग्न छायाचित्रे मागवून घेतलेली होती.
बलात्काराच्या आरोपानंतर, शांतीसागरलासुरतच्या अथवलाइन्स पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो सुरतमधील लाजपोर तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपपत्र सादर झाल्यापासून सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
सुरतचे सरकारी वकील नयन सुखाडावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पक्षाने 33 साक्षीदार हजर केले. वैद्यकीय तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालासह सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून आरोप यशस्वीरित्या सिद्ध करण्यात आले. आज सुरत सत्र न्यायालयाने आरोपी जैन मुनी शांतीसागरला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि 25000 रुपये दंडही ठोठावला आहे.
हे लेख पण वाचा :
१) ‘हालेलुईया, मेरा येसू’ असं म्हणत चमत्काराचा दावा करणारा ‘पापा बजिंदर’ अखेर बलात्कार प्रकरणात दोषी…
२) भारतात रोज बलात्काराचे 87 गुन्हे, नोंदविले न जाणारे गुन्हे किती असतील?
जैन मुनी शांतिसागरला तरुणींशी मोबाइलवर गप्पा मारण्याचा शौक
शिष्येवर बलात्कार करणारा जैन मुनी शांतिसागर तरुणींशी मोबाइलवर गप्पा मारण्याचा शौकीन निघाला. तरुणींचे कोणत्या कोणत्या प्रकारे फोन क्रमांक मिळवून त्यांना विचारायचा तुझी प्रकृती कशी आहे? आरोपीच्या विरोधात अथवलाईन्स पोलसांनी दोनशे पन्नास पानाचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यात ही माहिती देण्यात आली आहे.
साधारणत: जैन मुनी मोबाइलवर बोलत नाहीत. कारण मोबाइल वापरणे त्यांना वर्ज्य आहे. तरीही शांतिसागर चार-चार मोबाइल वापरत होता. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील चारही मोबाइल जप्त केले होते. या मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले असता, शांतीसागरला तरुणीशी गप्पा मारण्याचा शौक होता, असे स्पष्ट झाले. तो तरुणींच्या प्रकृतीची विचारपूस करत असे.
शांतिसागरविराेधात एकूण 20 पुरावे पाेलिसांनी काेर्टात केले सादर
मूळ अहवाल, घटना स्थळ, मोबाइल ताब्यात घेतल्यानंतर तरुणीचे कपडे, डीव्हीआर ताब्यात घेणे, तरुणीच्या भावाचा मोबाइल, शांतीसागरवरील उपचाराचा पंचनामा, न्यायवैद्यक शाखेकडे जमा असलेल्या मुद्देमालाची पावती, गांधीनगर न्यायवैद्यक शाखेत जमा असलेल्या मुद्देमालाची पावती, तरुणीवर मानसोपचार करणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र, तरुणीवर सामान्य रुग्णालयात झालेले उपचार, आयडिया कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यास कॉलचे विवरण देण्यासंबंधीचे पत्र, शांतीसागरचे फोन काॅल डिटेल्स, शांतीसागरची वैद्यकीय चाचणी अहवाल, शांतीसागरचा डीएनए अहवाल, तरुणीचा डीएनए चाचणीसाठी रक्ताचा नमुना घेतल्याचे पेपर्स, तरुणीवर सामान्य रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचाराची प्रत, शांतीसागरची डीएनए चाचणी व पाँटंसी चाचणीसाठी लिहिलेल्या पत्राची प्रत, इतर साहित्याचे पृथक्करण केल्याचा न्यायवैद्यकचा अहवाल. इत्यादी.
अनेक मोबाइलवरून करायचा फोन
पोलिस तपासात समजले की, बहुतांश प्रकरणात शांतीसागर महाराजाचा आशीर्वाद घेण्यास येणाऱ्या तरुणींचे मोबाइल फोन क्रमांक तो मागून घेत असे. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या फोनवरून तो तरुणींशी संपर्क साधून तिला गप्पा मारत होता.






