Skip to main content

Lancet Report : एक अब्जापेक्षा अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार

Komal Thombre
18 Dec 2025
18 views
Lancet Report : एक अब्जापेक्षा अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार

- कोमल ठोंबरे

लैंगिक अत्याचाराबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ‘द लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अंदाजानुसार 2023 पर्यंत जगभरातील 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या तब्बल एक अब्जांहून अधिक मुली आणि महिलांचे बालपणीच लैंगिक शोषण झाले आहे. याशिवाय तब्बल 60.8 कोटी महिलांवर जोडीदाराकडून अत्याचार होत आहे. भारतामध्ये 15 ते 49 वयोगटातील प्रत्येक 5 महिलांपैकी एका महिलेवर जोडीदाराकडून अत्याचार केला जातो. 

‘द लॅन्सेट’ च्या या अभ्यासातून बालकांवरील लैंगिक हिंसा आणि जोडीदाराकडून होणारी हिंसा यांचा यापूर्वी ओळखल्या गेलेल्या मर्यादेपेक्षा अधिक व्यापक आरोग्य परिणामांशी संबंध असल्याचे नवे पुरावे समोर आले आहेत. यामुळे आरोग्यहानी आणि अपंगत्वाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे आढळले आहे. हिंसाचारामुळे होणारा आरोग्यावरील भार कमी करण्यासाठी कायदेशीर चौकटी मजबूत करणे तसेच पीडितांसाठी सहाय्य सेवा विस्तारण्यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांची तातडीची गरज असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये लैंगिक हिंसेचे सर्वाधिक प्रमाण

जोडीदाराकडील हिंसा आणि लैंगिक हिंसेचे सर्वाधिक प्रमाण आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये आढळून आले. या भागांमध्ये एचआयव्ही आणि इतर दीर्घकालीन आजारांचे प्रमाण जास्त असल्याने हिंसाचाराचे आरोग्यावर होणारे परिणाम अधिक तीव्र असल्याचे संशोधकांनी नमूद केले. भारतामध्ये 15 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये जोडीदाराकडील हिंसाचाराचे प्रमाण सुमारे 23 टक्के असल्याचा अंदाज आहे. तसेच 15 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या 30 टक्क्यांहून अधिक महिलांनी आणि 13 टक्के पुरुषांनी बालपणी लैंगिक हिंसाचाराचा अनुभव घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



संशोधकांनी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (जीबीडी) स्टडी 2023 मधील आकडेवारीचे विश्लेषण केले. हा अभ्यास ‘ठिकाणे आणि काळानुसार आरोग्यहानी मोजण्यासाठी करण्यात आलेला सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक प्रयत्न’ मानला जातो. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठ या जीबीडी अभ्यासाचे समन्वयन करते.

‘जागतिक स्तरावर 2023 मध्ये आम्ही असा अंदाज लावला की 15 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या 608 दशलक्ष महिलांनी कधी ना कधी जोडीदाराकडील हिंसाचाराचा अनुभव घेतला होता तर 1.01 अब्ज व्यक्तींनी बालपणी लैंगिक हिंसाचार सहन केला होता,’ असे लेखकांनी नमूद केले. या अभ्यासातून बालकांवरील लैंगिक हिंसा आणि जोडीदाराकडील हिंसा यांचा यापूर्वी ओळखल्या गेलेल्या तुलनेत अधिक व्यापक आरोग्य परिणामांशी संबंध असल्याचे नवे पुरावे मिळाले असून, त्यामुळे आरोग्यहानी आणि अपंगत्वाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते असेही त्यांनी सांगितले.

चिंता विकार आणि तीव्र नैराश्य ही कारणे

चिंता विकार आणि तीव्र नैराश्य (मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर) हे जोडीदाराकडील हिंसाचारामुळे उद्भवणाऱ्या अपंगत्वाच्या आठ प्रमुख कारणांपैकी होते. तर बालपणी लैंगिक हिंसाचाराचा अनुभव घेणे हे मानसिक आरोग्य विकार, व्यसनाधीनता तसेच दीर्घकालीन आजारांसह एकूण 14 आरोग्य समस्यांशी संबंधित असल्याचे आढळले. जोडीदाराकडील हिंसाचाराचा संबंध जगभरात एक लाख 45 हजार मृत्यूंशी आढळून आला असून, यामध्ये प्रामुख्याने खून, आत्महत्या आणि एचआयव्ही/एड्समुळे झालेले मृत्यू समाविष्ट आहेत. 2023 मध्ये सुमारे 30 हजार महिलांची त्यांच्या जोडीदारांकडून हत्या झाल्याचा अंदाजही संशोधकांनी व्यक्त केला.

बालपणी लैंगिक हिंसाचाराचा अनुभव घेण्याचा संबंध 2023 मध्ये जगभरात दोन लाख 90 हजार मृत्यूंशी आढळून आला असून यामध्ये मुख्यतः आत्महत्या, एचआयव्ही/एड्स आणि टाइप-2 मधुमेहामुळे झालेले मृत्यू समाविष्ट आहेत. विशेषतः दक्षिण आशियामध्ये, बालपणी लैंगिक हिंसाचारामुळे पुरुषांमध्ये स्वतःला इजा करणे आणि स्किझोफ्रेनिया ही अपंगत्वाची प्रमुख कारणे आढळली तर महिलांमध्ये चिंता विकार हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले.



महिला आणि बालकांवरील हिंसाचाराला आळा घालणे हे केवळ मानवी हक्कांचेच नव्हे तर एक अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य प्राधान्य आहे, जे लाखो जीव वाचवू शकते, मानसिक आरोग्य सुधारू शकते आणि सक्षम समुदाय निर्माण करू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. हे निष्कर्ष बालकांवरील लैंगिक हिंसा आणि जोडीदाराकडील हिंसा या केवळ सामाजिक किंवा फौजदारी न्यायव्यवस्थेच्या समस्या असल्याच्या दीर्घकालीन समजुतीला मूलभूत आव्हान देतात आणि त्यांना प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून अधोरेखित करतात, असे प्रमुख लेखिका लुईसा सोरिओ फ्लोर, वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन येथील सहाय्यक प्राध्यापक, यांनी सांगितले.

या निष्कर्षांमधून कायदेशीर चौकटी मजबूत करणे, लैंगिक समानतेला चालना देणे आणि पीडितांसाठी सहाय्य सेवा वाढवणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांची तातडीची गरज अधोरेखित होते असेही संशोधकांनी नमूद केले.जागतिक आरोग्य संघटनेने नोव्हेंबरमध्ये प्रकाशित केलेल्या जागतिक अहवालानुसार भारतातील 15 ते 49 वयोगटातील पाचपैकी एकाहून अधिक महिला 2023 मध्ये जोडीदाराकडील हिंसाचाराला सामोऱ्या गेल्या तर जवळपास 30 टक्के महिलांनी आयुष्यभरात कधीतरी अशा हिंसाचाराचा अनुभव घेतला आहे.जागतिक स्तरावर, जवळपास तीनपैकी एक म्हणजेच 840 दशलक्ष लोकांनी, आयुष्यभरात कधीतरी जोडीदाराकडील किंवा लैंगिक हिंसाचार सहन केला आहे.

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...