टीम बाईमाणूस
- गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपनं दणदणीत विजय मिळवला असला, तरी मेहसाणातील एका उमेदवाराच्या विजयाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
- भाजपच्या पक्ष कार्यालयात तब्बल २८ वर्षे शिपाई म्हणून काम करणारे, कार्यकर्त्यांना चहा-पाणी देणारे रमेशभाई भिल आता नगरराजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत.
- तळागाळातील कार्यकर्त्याला मिळालेल्या या संधीमुळे त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून राज्यभर भाजपनं मोठा विजय नोंदवला आहे. अनेक नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक संस्थांमध्ये भाजपने वर्चस्व कायम राखत विरोधकांना मोठा धक्का दिला. मात्र या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलं ते मेहसाणातील रमेशभाई भिल यांचं नाव.
भाजपने पक्ष कार्यालयात चहा देणाऱ्याला तिकिट दिलं अन्…?
मेहसाणातील भाजपच्या ‘कमलम्’ कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या रमेशभाई भिल यांना पक्षानं प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी दिली होती. ही जागा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव होती. उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या नावाची मोठी चर्चा रंगली होती. कारण तब्बल २८ वर्षे पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था पाहणाऱ्या, बैठकींची तयारी करणाऱ्या आणि संघटनेची दैनंदिन कामं सांभाळणाऱ्या कार्यकर्त्याला थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं होतं.

पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत रमेशभाईंनी या निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या सोबतच भाजपचं संपूर्ण पॅनल विजयी झालं. एकूण ५२ प्रभागांपैकी तब्बल ४७ प्रभागांमध्ये भाजपनं विजय मिळवत मेहसाणात एकतर्फी सत्ता प्रस्थापित केली. काँग्रेसला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावं लागलं.
कोण आहेत रमेशभाई भिल?
रमेशभाई यांची ओळख केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ता अशी होती. कार्यालयात येणाऱ्या वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शांतपणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता अनेक वर्षे संघटनेसाठी काम करणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणं हे अनेकांसाठी तळागाळातील कार्यकर्त्याचा सन्मान मानलं गेलं.
विजयानंतर बोलताना रमेशभाईंनी भावना व्यक्त केल्या. “मी गेली २८ वर्षे पक्षासाठी काम करत आहे. आतापर्यंत संघटनेची सेवा केली, आता जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन,” असं त्यांनी सांगितलं. पक्ष कार्यालयात येणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना चहापाणी देणाऱ्या शिपायाला निवडणुकीचं तिकीट देण्याचा निर्णय भाजपनं घेतला. या निर्णयाची बरीच चर्चा झाली होती. कार्यकर्त्याचा सन्मान झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. रमेशभाईंना तिकीट देत भाजपनं धक्कातंत्राचा वापर केला. पक्षाच्या सगळ्या स्थानिक नेत्यांनी त्यांचा प्रचार केला.
भारतीय राजकारणात तळागाळातून वर आलेल्या नेतृत्वाच्या कथा नव्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लहानपणी रेल्वे स्थानकावर चहा विकल्याचा उल्लेख अनेकदा केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सामान्य कुटुंबातून संघर्ष करत पुढे आल्या. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांनी मर्यादित औपचारिक शिक्षण असूनही जनाधाराच्या बळावर नेतृत्व गाजवलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही साध्या सामाजिक पार्श्वभूमीतून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत मजल मारली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरही देशभर अशा अनेक कथा दिसतात. शेतकरी, शिक्षक, रिक्षाचालक, सफाई कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, छोटे व्यावसायिक अशा पार्श्वभूमीतून अनेक जण ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिकांमध्ये निवडून येतात. मात्र त्यातील काहीच कथा राष्ट्रीय चर्चेत येतात. रमेशभाई भिल यांचा विजय त्यापैकीच एक ठरला आहे. राजकारणात पैसा, घराणेशाही आणि मोठ्या चेहऱ्यांचं वर्चस्व असल्याची टीका वारंवार होते. अशा वेळी पक्ष कार्यालयात चहा देणाऱ्या कार्यकर्त्यापासून लोकप्रतिनिधी होण्यापर्यंतचा रमेशभाई भिल यांचा प्रवास भारतीय लोकशाहीचा वेगळा चेहरा समोर आणतो. सामान्य कार्यकर्त्यालाही नेतृत्वाची संधी मिळू शकते, याची ही ताजी नोंद मानली जात आहे.

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. संपूर्ण राज्यात गुजरातनं दणदणीत विजयाची नोंद केली आहे. मेहसाणातील भाजप कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षानं तिकीट दिलं होतं. तब्बल २८ वर्षे कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना चहा पाजणाऱ्या रमेश भाई भिल यांचं काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण भील यांना तिकीट मिळाल्याची बरीच चर्चा झाली होती.
मेहसाणातील भाजप कार्यालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था पाहणाऱ्या रमेश भाई भिल यांना प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत रमेश भाईंनी बाजी मारली. रमेशभाई यांच्यासोबतच भाजपचं संपूर्ण पॅनल विजयी झालं. एकूण ५२ प्रभागांपैकी ४७ प्रभागांमध्ये भाजपनं विजय मिळवला. मेहसाणात भाजपनं अनपेक्षित आणि आश्चर्यजनक निकाल नोंदवला. इथे काँग्रेसला अवघ्या ५ जागा मिळाल्या.
भाजपच्या 'कमलम्' कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या रमेशभाईंनी विजयानंतर आनंद व्यक्त केला. 'पक्षानं मला मेहसाणातून प्रभाग क्रमांक १३ मधून तिकीट दिलं होतं. ही जागा एसटीसाठी राखीव होती. मी इथे २८ वर्षांपासून काम करत आहे. आतापर्यंत पक्षाचं काम करत आलो आहे. आता जनसेवेची संधी मिळाली आहे,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
रमेशभाई गेल्या २८ वर्षांपासून पक्षाच्या मुख्यालयात काम करत आहेत. कार्यालयाचं व्यवस्थापन सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी गेली अडीच दशकांहून अधिक काळ समर्थपणे सांभाळली. कार्यालयात येणाऱ्या वरिष्ठ नेत्यांना, कार्यकर्त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था पाहिली. '२८ वर्षे पक्ष संघटनेत काम केलं. प्रामाणिकपणे काम करत राहिलो. आता जनसेवेची संधी मिळाली आहे. ती जबाबदारीदेखील तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडेन,' अशा भावना रमेशभाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर बोलून दाखवल्या होत्या.
पक्ष कार्यालयात येणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना चहापाणी देणाऱ्या शिपायाला निवडणुकीचं तिकीट देण्याचा निर्णय भाजपनं घेतला. या निर्णयाची बरीच चर्चा झाली होती. कार्यकर्त्याचा सन्मान झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. रमेशभाईंना तिकीट देत भाजपनं धक्कातंत्राचा वापर केला. पक्षाच्या सगळ्या स्थानिक नेत्यांनी त्यांचा प्रचार केला.






