Skip to main content

हे गाव लई न्यारं… नेवाशातील ‘सौंदाळा’चा आणखी एक ऐतिहासिक निर्णय, आता हे गाव झालं ‘जातमुक्त’!

Komal Thombre
07 Feb 2026
5 min read
165 views
हे गाव लई न्यारं… नेवाशातील ‘सौंदाळा’चा आणखी एक ऐतिहासिक निर्णय, आता हे गाव झालं ‘जातमुक्त’!

कोमल ठोंबरे


  • संत ज्ञानेश्वर माउलींच्या भूमीतील नेवासे तालुक्यातील सौंदाळा गावांत जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही.


  • सर्व नागरिक समान आहेत. 'माझी जात मानव' ही भावना स्वीकारली.


  • आंतरजातीय विवाह होतील, त्यासाठी सर्व मदत केली जाईल.


महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायती त्यांच्या ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयामुळे चर्चेत राहील्या आहेत. जे निर्णय सरकारला ही घेता आले नाही असे निर्णय राज्यातल्या ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. असा एक निर्णय आता अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा या ग्रामपंचायतीने घेतला आहे. हे गाव नेसासे तालुक्यात येते. जगाला पसायदान देणाऱ्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या भूमीतील नेवासे तालुक्यातील सौंदाळा येथील ग्रामस्थांनी आपले गाव जातमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. यासंबंधीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला असून, असा निर्णय घेणारे सौंदाळा हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीनं आता पुन्हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.


सध्या जात-धर्मावरून सतत वादंग होत आहेत. त्याचा परिणाम समाजावर, गावांवर होत आहे. त्यामुळे आपल्या गावांपासून जातमुक्तीची सुरुवात करण्यासाठी सौंदाळा ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावात स्वातंत्र्य, समता, बंधुता अंगीकारण्यासाठी जातमुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील वेगवेगळ्या पंधरा लोकांनी रक्तदान करून एकोपा दाखवला. त्यानंतर त्यानंतर सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्याग्रामसभेत गाव 'जातमुक्त' झाल्याची घोषणा केली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसभेला गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी; तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर ठराव करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला.

User Image


या ठरावाने काय होणार ?


  • गावांत जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही.
  • सर्व नागरिक समान आहेत. 'माझी जात मानव' ही भावना स्वीकारली.
  • आंतरजातीय विवाह होतील, त्यासाठी सर्व मदत केली जाईल.
  • सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सवात जातिभेद बंद.
  • कोणतीही जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा/ग्रामपंचायत त्यावर तत्काळ कारवाई होईल.
  • सौंदळा गाव 'जातमुक्त गाव' म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसे फलक लावण्यात येतील.
  • सोशल मीडियावर जाती भेदभावबाबत संदेश करणार नाही. कुणाला करूही देणार नाही.
  • शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.


सौंदाळा ग्रामपंचायतीचे यापूर्वीचे ऐतिहासिक निर्णय…


आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात हे गाव आहे. 2011 च्या जनगणने नुसार या गावाची लोकसंख्या ही 1800 आहे. हे गाव तंटामुक्त गाव आहे. तसा पुरस्कारही या गावाला मिळाला आहे. यागावाने नेहमीच समाजाचा आणि गावाचा विकास पाहिला आहे. त्या दृष्टीने चांगले निर्णयही केले आहेत. गावाची ही ग्रामपंचायतीला चांगली साथ लाभली आहे. त्यामुळे आतापर्यंत चांगले निर्णय झाले आहेत. त्याचे कौतूक ही संपूर्ण राज्यात झाले आहे.


User Image


शिव्या द्याल तर 500 रूपये दंड


सौंदाळा ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार गावात जर का कोणी शिवी दिली तर त्याला 500 रूपयांचा दंड केला जाईल. अनेक वेळा भांडणं झाल्यानंतर कारण नसताना आई बहिणींवरून शिव्या दिल्या जातात. त्यात आई बहीणींची चुकी नसताना असे अपशब्द वापरले जातात. हे टाळले जावे यासाठी ग्रामसभेना हा निर्णय घेतला आहे.


शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल देण्यास बंदी


सौंदाळा ग्रामपंचायतीनं आजपर्यंत समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले आहेत. गावातील महिला आणि पुरुषांनी तसंच बाहेरून आलेल्या लोकांनी शिवीगाळ केल्यास 500 रुपयांचा दंड सक्तीनं आकारण्यात येतो. त्याचबरोबर राज्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडं मोबाईल देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मोबाईल दिसल्यास त्या कुटुंबीयांना 500 रुपयांचा दंड असा ठराव करण्यात आला असून अनेकांकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. तसंच बालकामगारमुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा, एक हजार रुपये मिळवा असं आवाहनही करण्यात आलं होतं.


हुंडा घेणारा कळवा, 5 हजार रुपये मिळवा


मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. कर्जाचा बोजा आणि अपुरी मदत यामुळं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं होतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवरील शैक्षणिक खर्चाचा भार हलका करण्यासाठी सौंदाळा ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला होता. सौंदाळा गावातील प्रत्येक मुलीचं पालकत्व ग्रामपंचायतीने स्वीकारलं होतं. त्याचबरोबर गावात हुंडा घेणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत हुंडा घेणारा कळवा, 5 हजार रुपये मिळवा असा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामुळं केवळ हुंडा प्रथा थांबवण्याबरोबरच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठीही मदत होणार असल्याचं ग्रामपंचायतचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितलं.


User Image


सकाळी ठीक 10 वाजता भोंग्यावर वाजणार राष्ट्रगीत


गावातील शाळांमध्येही राष्ट्रगीताच्यावेळी उभे राहून सन्मान करण्याचं आवाहन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलं आहे. या निर्णयाचं गावातील नागरिकांनी स्वागत केलं असून हा निर्णय देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असं मत व्यक्त केलं आहे. या उपक्रमामुळं देशातील जातीयवाद संपून देश अखंड राहील आणि सर्व नागरिकांमध्ये एकता आणि समता निर्माण होईल, असं ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सांगितलं.


ग्रामपंचायतीच्यावतीनं गावात लावण्यात आलेल्या भोंग्यावर सकाळी ठीक 10 वाजता राष्ट्रगीत लागल्यानंतर शेतात काम करणारे तसंच रस्त्याने जाणारे नागरिकांच्या कानावर राष्ट्रगीत ऐकू येताच जिथे असतील तिथेच थांबून राष्ट्रगीताचा सन्मान करतात. ग्रामपंचायतीच्यावतीनं आजपासून राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आल्यानं याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हा उपक्रम राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी राबवावा असं आवाहनही सरपंच शरद आरगडे यांनी केलं आहे.














Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...