Skip to main content

सिडनी गोळीबार : हा अमानुष वेडेपणा कसा थांबवायचा?

Nilu Damle
15 Dec 2025
14 views
सिडनी गोळीबार : हा अमानुष वेडेपणा कसा थांबवायचा?

 निळू दामले          

ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. 40 जणं जखमी झाले, 15 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका कारमधे आयईडी स्फोटकं सापडली.
बाप आणि मुलगा अशी हल्लेखोरांची जोडी होती. बाप 1998 मधे ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत होऊन नागरीक झाला होता, 24 वर्षाचा त्याचा मुलगा ऑस्ट्रेलियात जन्मल्यानं जन्मजात नागरीक झाला होता. त्यांच्या घरी असलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या म्हणून 6 बंदुका त्यांच्याकडं होत्या. या बंदुका लष्करी उपयोगासाठी तयार केलेल्या प्रभावी दर्जाच्या होत्या.
 

शक्यता दाट आहे पण अजूनही गाझामधल्या युद्धाबद्दलची  चीड व्यक्त करण्यासाठी वरील हल्ला झाल्याचं सिद्ध झालेलं नाही.
या घटनेची बातमी आणि रील्स घटना घडल्यापासून चौथ्या पाचव्या मिनिटालाच जगभर पसरल्या. लगोलग पोलीस घटनास्थळी पोचले, धरपकड झाली, चौकशी सुरु झाली. एक हल्लेखोर मेला होता, एक हल्लेखोर गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती पडला होता. अजून तपास सुरु व्हायचा होता.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी आणि पोलिस प्रमुखांनी घटना जगासमोर ठेवली आणि शांततेचं आव्हान केलं, अजून पर्यंत त्यांच्याजवळ कोणतीही माहिती वा पुरावे गोळा झाले नव्हते. पण इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि अध्यक्ष हरझोग यांनी हा हल्ला दहशतवाद्यानी केला आहे असं सांगून टाकलं. तेवढ्यावर दोघे थांबले नाहीत.

ऑस्ट्रेलियामधे ज्यूविरोध (अँटीसेमिटिझम)  बोकाळला असून सरकार त्यावर प्रभावी कारवाई करत नाही असा आरोप दोघानी केला. अजून कोणतेही पुरावे नसतांना दोघांनी राजकारण करायला सुरवात केली.



ऑस्ट्रेलियातले लाखो नागरीक इस्रायलनं गाझामधे चालवलेल्या युद्धाचा निषेध करण्यासाठी अनेक वेळा रस्त्यावर आले होते. विद्यार्थी आणि तरूण इस्रायल निषेधात आघाडीवर होते. ऑस्ट्रेलियन सरकारनं इस्रायलचा निषेध केला होता; युद्ध थांबवा अशी विनंती केली होती; पॅलेस्टाईन देश स्थापन करा असा ठराव मांडला होता. युनायटेड नेशन्सनं इस्रायलच्या युद्धखोरीचा निषेध केला होता; इस्रायल व पॅलेस्टाईन अशी दोन राष्ट्रं निर्माण व्हावीत असा ठराव केला होता, ऑस्ट्रेलियानं त्या ठरावाला पाठिंबा दिला होता. नेतान्याहूंनी ऑस्ट्रेलियन सरकारवर या निर्णयाबद्दल टीका केली होती.

वेस्ट बँक या पॅलेस्टाईनच्या विभागात इस्रायल बेकायदा वसाहती बांधत आहे यावर युनायटेड नेशन्स आणि ऑस्ट्रेलियानं टीका केली होती. टीकेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल सरकारनं ऑस्ट्रेलियन राजदूतांचे व्हिसा रद्द केले होते. 
ऑस्ट्रेलियन जनता इस्रायली कारवाईवर टीका करतेय याचा फायदा घेऊन इराणी सरकारनं ऑस्ट्रेलियातल्या ज्यूं विरोधात दंगली धडवण्याचे  प्रयत्न केले होते. ऑस्ट्रेलियन सरकारनं इराणी राजदूतांचे व्हिसे रद्द केले होते. इस्रायलचं धोरण आपल्याला मंजूर नसलं तरी इस्रायली आणि ज्यू माणसं ऑस्ट्रेलियात सुरक्षित आहेत, त्यांची पुरेपूर काळजी आपण घेत आहोत असं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. गाझाच्या प्रश्नावरून इस्रायल आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तणाव होता आणि आहे. ज्यूंवर झालेल्या हल्ल्याला ही पार्श्वभू्मी आहे.

काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधल्या एके सिनेगॉगवर (ज्यूंचं मंदिर) एका माणसानं हल्ला केला होता. गाझामधे चाललेल्या युद्धाचा निषेध आपण करतो असं त्या माणसानं जाहीरपणे सांगितलं होतं. अमेरिकेतही ज्यूवर हल्ले झाले आहेत.अमेरिकेतल्या युनिव्हर्सिट्या आणि कॉलेजमधून लाखो विद्यार्थी रस्त्यावर आले, त्यांनी इस्रायलचा निषेध केला. या निषेध करणाऱ्यांमधे अनेक ज्यू विद्यार्थीही होते. अमेरिकन सरकारनं, अमेरिकन उत्पादकांनी इस्रायलला शस्त्रं व माल पुरवणं बंद करावं अशी मागणी झाली.



इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी युरोपीय देशांतही लोकांमधे इस्रायलबद्दल तीव्र चीड आहे. आखाती देशांबद्दल, मुसलमान बहुसंख्य असणाऱ्या देशांबद्दल तर बोलायलाच नको. इस्रायलनं चालवलेल्या अमानुष आणि क्रूर युद्धाबद्दल तिथली जनता अस्वस्थ आहे. आज फक्त अमेरिका इस्रायलसोबत आहे, बाकीचं सारं जग इस्रायलच्या विरोधात आहे. केवळ अमेरिकेच्या बळावर इस्रायलची मस्ती चाललीय. तरीही युरोप अमेरिकेतल्या जनतेनं संयम पाळला आहे, ज्यूंना त्रास दिलेला नाही.

इस्रायलला विरोध म्हणजे  ज्यूंना विरोध नव्हे असं जगभरच्या लोकांनी ठासून सांगितलेलं आहे. लोक अँटीसेमेटिक नाहीत, अँटी इस्रायल आहेत. हमासनं इस्रायलवर केलेला हल्ला ही भयानक चूक आहे असं सारं जग म्हणतं. पण म्हणून दोन वर्षं गाझावर लढाई लादून लाखापेक्षा जास्त माणसं मारणं, तीन चतुर्थांश गाझा जमीनदोस्त करणं बरोबर नाही असं सारं जग म्हणतंय. खुद्द इस्रायलमघले लोक म्हणत आहेत की नेतान्याहू अतिरेक करत आहेत.

 इस्रायलमधल्या कित्येकांनी उघडपणे आरोप केलाय की डळमळीत झालेल्या सत्तेवर ताबा टिकवण्यासाठी नेतान्याहूनी युद्ध उचकवलं आहे. हमास या संघटनेला धडा शिकवण्याच्या नादात लाखभर निष्पाप नागरिकांना मारणं हे अमानुष कृत्य आहे असं जग आणि इस्रायलमधले लोकही म्हणत आहेत. ओलीस इस्रायलला परत केल्यानंतर ट्रंप यांची मध्यस्थी दोन्ही बाजूनी मान्य केल्यानंतरही अजूनही इस्रायलं दररोज शेकडो माणसं मारतंय आणि शेकडो घरं जमीनदोस्त करतंय.



सिडनीत मेलेले 15 ज्यू निष्पाप होते. ते ज्यू गाझात बाँब टाकत नव्हते. त्यांना गोळ्या घालणं अगदीच चूक आहे. पण तोच न्याय इस्रायलनं गाझातल्या हज्जारो निष्पाप लोकांनाही लावायला हवा. तसं होतांना दिसत नाहीये.

नेतान्याहू राक्षसासारखे वागत आहेत.शिक्षा त्यांना, त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना व्हायला हवी, जगभर पसरलेल्या ज्यूना नाही. सत्तांध झालेली सरकारं आणि जनता यांच्यात दुही असते असं जगभर दिसतंय. इस्रायलमधेही तसंच घडतय.
ऑस्ट्रेलियात किवा कुठंही कोणीही ज्यूंचे खून करता कामा नये आणि कोणीही मुसलमानांचे खून करता कामा नये. हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.

(सौजन्य -niludamle.com)

Share this article
 पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…
कॉलम

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’च्या आवाहनात एक महत्त्वाचा प्रश्न गायब आहे तो म्हणजे भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खाद्यतेल आयातीवर का खर्च करतो? १९९० नंतरच्या धोरणांनी भारताची स्वयंपूर्ण तेलबिया अर्थव्यवस्था कशी मोडली आणि त्याची किंमत आज महाराष्ट्रातील शेतकरी कशी मोजतो आहे? सोयाबीनच्या पडत्या भावापासून ते हवामान बदलामुळे वाढलेल्या रोगराईपर्यंत, ग्रामीण भारत एका दुहेरी संकटात अडकला आहे. ‘त्याग’ नागरिकांनी करायचा, पण धोरणात्मक ‘खोडा’कडे पाहायचं नाही, हीच आजच्या अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.

4 min read
G
Girish Patil
सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…
कॉलम

सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…

गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.

4 min read
N
Nilu Damle
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
 एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?
कॉलम

एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?

सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले. या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.

5 min read
N
Nilu Damle
प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन
कॉलम

प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

- अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्रांपैकी एक असून, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासाठी ओळखले जाते. - मात्र या तेजस्वी प्रतिमेमागे व्यक्तिगत शस्त्रास्त्रांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे एक गंभीर वास्तव दडलेले आहे. - ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून, जागतिक चिंतेचा विषय बनली असून भारतासह इतर देशांसाठीही अभ्यासाचा मुद्दा ठरत आहे.

4 min read
B
Bhaga Warkhade
‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?
कॉलम

‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?

फॅक्ट-चेक युनिटच्या माध्यमातून सरकारकडून माध्यमांवर नवे नियंत्रण. सरकारच्या नव्या नियमांमुळे पत्रकारितेत वाढतेय सेन्सॉरशिपची मोठी भीती. कायद्याच्या आडून सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न.

5 min read
B
Bhaga Warkhade

Comments

Comments are currently disabled or loading...