
‘मिशन MBBS’पासून सीबीआय चौकशीपर्यंत; ‘लातूर पॅटर्न’च्या साम्राज्याचं गूढ
महाराष्ट्राच्या शिक्षण नकाशावर 'यशाची राजधानी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'लातूर पॅटर्न'ला नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. एकेकाळी गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या या भूमीत कोचिंग संस्कृतीचे व्यापारीकरण, 'रिझल्टची जीवघेणी स्पर्धा' आणि अविनाश चव्हाण हत्याकांडासारख्या गुन्हेगारी वळणांचा सविस्तर वेध घेणारा 'बाईमाणूस'चा विशेष रिपोर्ट.









