
सातबाऱ्यापासून हजारो कोटींपर्यंत; महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे काळे जाळे
महाराष्ट्राच्या प्रशासनाचा कणा मानला जाणारा महसूल विभाग आज लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकल्याचे विदारक चित्र आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेमुळे २४१ कोटींच्या कथित भूसंपादन घोटाळ्याचे हिमनगाचे टोक समोर आले आहे. डिजिटल प्रणाली येऊनही दलालशाही, अधिकारांचे केंद्रीकरण आणि राजकीय वरदहस्तामुळे तलाठी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कशी घट्ट झाली आहे,





