Skip to main content

योगी सरकारला चपराक, अखलाखच्या मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसला

Article in Marathi
Apsara Aga
24 Dec 2025
3 min read
7 views
 योगी सरकारला चपराक, अखलाखच्या मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसला

ग्रेटर नोएडा येथील दादरीमध्ये 2015 साली गोहत्या केल्याच्या आरोपावरून झालेल्या मोहम्मद अखलाख हत्याकांडातील सर्व आरोपींवरील आरोप मागे घेण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला होता. राज्य सरकारने खटला मागे घेण्यासाठी तशी न्यायालयाला औपचारिक विनंती देखील केली होती. मात्र अखलाखच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला आहे. हा खटला रद्द करावा अशी याचिका उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने दाखल केलेली होती. न्यायालयाने ही याचिका साफ फेटाळून लावली. हा खटला चालूच राहील असे न्यायालयाने ठणकावून सांगितले.

ही याचिका सूरजापूरमधील जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच हे प्रकरण ‘अति महत्वाच्या’ श्रेणीतील असून यावर दररोज सुनावणी झाली पाहीजे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त न्यायाधीश सौरभ द्विवेदी यांनी हे प्रकरण अति महत्वाच्या श्रेणीतील असून या प्रकरणाची जलदगतीने तसेच दररोज सुनावणी झाली पाहीजे, प्रकरणाशी संबंधित पुरावे लवकरात लवकर न्यायालयात जमा करावेत असे निर्देश दिले आहेत. न्यायालय म्हणाले, “या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांच्या संरक्षणासाठी सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यासाठी गौतम बुद्ध नगरचे पोलीस आयुक्त तसेच ग्रेटर नोएडाचे पोलीस उपायुक्त यांना पत्र पाठवण्यात आले आहे.” दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे.

योगी सरकारला चपराक, न्यायालय म्हणाले, हे प्रकरण अति महत्वाचे

अखलाखच्या हत्येच्या खटल्यात एकूण 19 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्याचा मुलगा विशाल राणा आणि शिवम नामक अन्य एका नातेवाईकाचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर अखलाखच्या हत्येचा आरोप आहे. या खटल्याची आज सुनावणी होती. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने खटला मागे घेण्यासाठी अर्ज सादर केला. मात्र खटला मागे घेण्यासाठी कोणतेही ठोस कारण सरकारने दिलेले नाही. सरकारच्या विनंतीला कोणताही कायदेशीर आधार नाही. अत्यंत फुटकळ असा हा अर्ज आहे असे परखड निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सरकारचा अर्ज फेटाळला. त्यामुळे योगी सरकारला चांगलीच चपराक बसली.



सूरजापूर मधील जिल्हा न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारने आरोपींच्या निर्दोष मुक्ततेसाठी दाखल केलेली याचिका मंगळवारी (22 डिसेंबर) फेटाळली आहे. 15 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात अखलाकचे कुटुंबीय आरोपींची नावे अचूकपणे सांगत नाही. त्यामध्ये अनियमितता आहे. आरोपींकडून कोणतेही धारदार शस्त्र किंवा हत्यार जप्त करण्यात आलेले नाही. तसेच अखलाक व आरोपींमध्ये कोणतेही वैर नव्हते, ही कारणे उत्तर प्रदेश सरकारने दिली होती. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने सोमवारी (22 डिसेंबर) दिलेल्या वृत्तानुसार, अखलाकच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना आठ वर्षांपूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारने याचिकेत जोर दिला होता.

28 सप्टेंबर 2015… मॉब लिंचिंगची देशातील पहिलीघटना

उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील दादरीमध्ये बिसाहडा गावात 52 वर्षाचे मोहम्मद अखलाख आपल्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून राहात होते. 28 सप्टेंबर 2015 रोजी गावातील एका मंदिरात असलेल्या लाऊडस्पिकरवरून अचानक मोठमोठ्याने घोषणा होऊ लागली. ‘’मोहम्मद अखलाख यांनी एका गाईची कत्तल केली असून, ते गोमंस त्यांनी आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये ठेवले आहे.’’ अवघ्या काही क्षणात शेदोनशेचा जमाव अखलाख यांच्या घराबाहेर गोळा झाला.

जमाव प्रचंड खवळला होता, त्यांनी मोहम्मद अखलाख यांना अक्षरश: घराबाहेर खेचून बाहेर काढले आणि दगड-विटांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा दानिश याच्या कवटीला गंभीर इजा पोहोचली होती. ही घटना घडल्यानंतर अखलाख यांची पत्नी इक्रमान यांनी त्याच रात्री स्थानिक पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवला होता आणि त्यात त्यांनी अनेकांची नावे घेतली होती.

सर्व आरोपी जामीन मिळाल्यानेतुरूंगाबाहेर

21 डिसेंबर 2015 रोजी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. त्यात 15 आरोपींची नावे नोंद करण्यात आली होती. त्यात एक अल्पवयीन आरोपीदेखील होता. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी जामीन मिळाल्याने तुरूंगाबाहेर आहेत. दरम्यान, चार्जशीटमध्ये गोमांस आढळल्याचे नमूद करण्यात आले नव्हते, कारण त्यावेळी फोरेन्सिक अहवाल प्राप्त झाला नव्हता.

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...