
Latest News
Stories shaping public discourse
Recently Updated
New reports and voices from the ground

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.
Trending Now
The Conversations capturing public attention

पंतप्रधान म्हणतात, ‘तयार रहा’... विद्यार्थी, रिक्शावाले, पेट्रोल पंपचे मालक, शेतकरी, हॉटेलवाले म्हणतात, म्हणजे उपाशी मरायचं का…?
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये इंधनासाठी लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांमध्ये भीतीपोटी साठेबाजी वाढताना दिसत आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स, मेस आणि लघुउद्योग बंद पडत असून विद्यार्थ्यांपासून रिक्षाचालकांपर्यंत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. डिझेल टंचाईचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत असून शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी इंधनासाठी रांगेत उभे असतानाच मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत.

ज्या सैनिकाने देशाची सेवा केली, त्याच्याच अंत्यसंस्कारात जातीय भेदभावाची घटना घडली…!
दलित समाजातील एका निवृत्त सैनिकाच्या अंत्यसंस्कारावेळी जातीय भेदभाव झाल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील चिन्नापूर गावात घडली आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, गावात पोहोचल्यावर त्यांना बहुतेक दुकाने आणि हॉटेल्स बंद आढळली.

हे गाव लई न्यारं… नेवाशातील ‘सौंदाळा’चा आणखी एक ऐतिहासिक निर्णय, आता हे गाव झालं ‘जातमुक्त’!
संत ज्ञानेश्वर माउलींच्या भूमीतील नेवासे तालुक्यातील सौंदाळा गावांत जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही. सर्व नागरिक समान आहेत. 'माझी जात मानव' ही भावना स्वीकारली. आंतरजातीय विवाह होतील, त्यासाठी सर्व मदत केली जाईल.

‘’डॉक्टर नाही, रुग्णालयाला टाळं, मग बाळाची प्रसूती बाण-बांबू अन् ब्लेडने होते…’’ नंदुरबारमधील धगधगीत वास्तव
नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बाळाचा जन्म अजूनही रुग्णालयात नाही, तर घरात, बाण,बांबू, ब्लेडच्या आधारावर होतो. अनेकदा ‘पुरुषदाई’ करतात गरोदर महिलांची प्रसुती… खराब रस्ते, बंद उपकेंद्रे, अपुरी आरोग्य व्यवस्था आणि ॲम्बुलन्स न पोहोचणं यामुळे घरगुती प्रसूती ही परंपरा नसून मजबुरी बनली आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दाव्यांपलीकडचं वास्तव उघड करणारा ‘बाईमाणूस’चा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट…

‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक
क्विअर व्यक्तींना पार्टनर किंवा मित्र शोधण्यासाठी घ्यावा लागतो डेटिंग अॅप्सचा आधार मात्र अशा अॅप्सच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत. क्वियर डेटींग अॅप, ग्रिंडरचा बेकायदेशीर उपयोग आणि त्यातली आव्हाने काय आहेत?

‘‘होय, मी डॉन हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव ‘हसीन’, मला मोदी आणि शहांनी न्याय मिळवून द्यावा’’
‘’होय, मी हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव हसीन हाजी मस्तान मिर्झा आणि माझ्यावर अतोनात अत्याचार झाले आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी असा कडक कायदा करावा की माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळू शकेल.’’ असे हसीन मस्तान का म्हणतेय…?

Sambhajinagar: राज्यातील सर्वात अनोखं गाव Chaundala | या गावात लागत नाही लग्न! दुमजली घरही नाही !
Sambhajinagar: राज्यातील सर्वात अनोखं गाव Chaundala | या गावात लागत नाही लग्न! दुमजली घरही नाही !

बाई पुरुषावर बलात्कार करू शकते का? कायदा काय सांगतो?
पुणे शहरात महिलेकडून पुरुषावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणानं संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली आहे. सामान्यतः अत्याचाराच्या तक्रारी महिलांकडून येतात, मात्र या वेळी चित्र पूर्ण उलट आहे. विवाहित दोन मुलींचा बाप असलेल्या पुरुषाने धैर्य एकवटून पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमुळे पीडित फक्त स्त्रीच असते, हा समाजातील एकतर्फी समज ढासळू लागल्याचं दिसत आहे. या केसमधून पुरुषांवरील लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलिंगचं वास्तवही पुढे येत असल्याचं जाणवत आहे.

Manusmruti Dahan : मनूच्या पुतळ्याला काळं फासणाऱ्या 'त्या दोन' भीमकन्यांची थरारक कहाणी | Baimanus
8 ऑक्टोबर 2018. मातीकाम करणाऱ्या शिलाताईंना सोबत घेऊन कांताबाईंनं जयपूर गाठलं.. जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेल्या मनूच्या पुतळ्याला काळं फासणाऱ्या ह्याच त्या दोघी... या कृत्यामुळे जयपूरच्या पोलीस कस्टडीत आठ दिवस आणि 18 दिवस जेल मध्ये काढून जामिनावर पुन्हा संभाजीनगरला येणाऱ्या कांता अहिरे आणि शिलाताई पवार यांची ही धाडसी कथा..
0Tumbbad: where humans scare the ghost
The film 'Tumbbad,' released in 2018, broke the parameters of the Indian cinema. The film, initially, didn't perform well at the box office but it was highly appreciated by the connoisseurs. Nowadays, films are being re-released in theatre and so is 'Tumbbad'
Latest Videos
Video stories and visual journalism

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

विषारी दारूने घेतले 18 बळी! | "महिलांचा आरोप - पोलिसांना हप्ता?"
पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरलं! फुगेवाडी, दापोडी, काळेपडळ आणि हडपसर भागात विषारी दारूमुळे १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. "घरून व्यवस्थित गेले, पण परत आल्यावर माशासारखे तडफडले..." स्थानिक महिलांचा हा आक्रोश काळजाला घर पाडणारा आहे. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक महिलांनी थेट पोलिसांवर "हफ्ता घेतात" असा गंभीर आरोप केला आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नक्की काय आहे संपूर्ण सत्य? पाहा 'बाईमाणूस'चा हा विशेष रिपोर्ट.

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

'BaiManus’चा महा इम्पॅक्ट: एका रिपोर्टने बदललं शिवरायांच्या रक्षकाच्या कुटुंबाचं नशीब
एकीकडे ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरू असताना, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीचं आयुष्य मात्र अत्यंत हालाखीत जात होतं. अंथरुणाला खिळलेले वडील, मजुरी करणारी आई आणि सलूनमध्ये काम करणारा मुलगा… ‘बाईमाणूस’ने हा उपेक्षित इतिहास महाराष्ट्रासमोर आणला आणि अवघ्या २४ तासांत संपूर्ण परिस्थिती बदलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे थेट साताऱ्यातील कोंढवली गावात पोहोचले. समाजातील संवेदनशील नागरिक आणि मुस्लिम मावळा सादिक शेख यांनीही सपकाळ कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
Photo Gallery
Visual stories capturing voices from the ground

Indore Water Tragedy: Systemic Neglect Leads to Fatal Outbreak
A catastrophic failure of civic infrastructure in Bhagirathpura has left at least 10 dead and thousands ill. Despite years of warnings and dozens of formal complaints about "acid-like" drinking water, administrative delays allowed a preventable sewage leak to turn into a deadly epidemic.

Saving the Aravallis: A Fight to Protect an Ancient Lifeline
31 Hills Vanished: The Visual Evidence Excerpt: Official records confirm the unthinkable: 31 out of 128 hills in the Aravalli range have physically vanished due to illegal mining. With groundwater levels sinking and the new "100-meter" rule leaving the foothills vulnerable, the ecological collapse is no longer a prediction—it is happening. Explore the timeline of destruction and the movement demanding justice.

Who is this Sadu Mata, where men wearing vermilion and wearing sarees play Garba?

One should experience 'Vari'!

"How many Supreme Court judges are Dalit-Tribals?"




