
ग्राउंड रिपोर्ट
विठ्ठलाच्या वाटेवरचे अदृश्य हात… लाखो वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःची भक्ती बाजूला ठेवणाऱ्या माऊल्या
आषाढी वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो विठ्ठलाचा नामघोष, टाळ-मृदुंगाचा गजर आणि लाखो वारकऱ्यांचा भक्तीचा प्रवास. मात्र या भक्तीच्या सोहळ्यामागे काही हात असे असतात, जे शांतपणे वारीची व्यवस्था उभी ठेवतात.
पहाटे अंधार असतानाच चुली पेटवणारे, शेकडो वारकऱ्यांसाठी जेवण बनवणारे, पाणी भरणारे, भांडी घासणारे आणि मुक्कामाची व्यवस्था सांभाळणारे हे हात बहुतांश वेळा महिलांचे असतात. त्या स्वतःही वारकरी आहेत; पण त्याचबरोबर वारीच्या व्यवस्थेचा अदृश्य आधार आहेत.
विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या या माऊल्या अनेकदा स्वतःचा थकवा, विश्रांती आणि वेळ बाजूला ठेवून इतर वारकऱ्यांच्या सेवेत रममाण होतात. त्यांच्या श्रमांवर उभी असलेली वारी, सेवाभाव आणि न बोलल्या गेलेल्या कष्टांची ही कहाणी...
A
Apsara Aaga / Sanjana Khandare