
ख्रिस्ती आदिवासींना आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही…? राज्य सरकारने स्थापन केली विशेष समिती
ज्यांनी ख्रिश्चन अथवा अन्य धर्म स्वीकारला आहे अशा आदिवासींना अनुसूचित जमातींच्या यादीतून बाहेर करावं, म्हणजे डिलिस्ट करावं, या मागणीनं आदिवासी पट्टा दुभंगला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने आता अनुसूचित जमातीमधील (ST) व्यक्तींनी ख्रिश्चन किंवा इतर धर्मात धर्मांतर केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलती सुरू ठेवाव्यात की रद्द कराव्यात, याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय सर्वसमावेशक समिती गठीत केली आहे.










