
The Odyssey : ‘हेलन ऑफ ट्रॉय’च्या काळ्या की गोऱ्या रंगावरून जग पुन्हा का विभागलं?
ख्रिस्तोफर नोलन यांच्या The Odyssey या चित्रपटात ‘हेलन ऑफ ट्रॉय’ च्या भूमिकेसाठी कृष्णवर्णीय अभिनेत्री लुपिता न्यॉन्ग'ओची निवड होताच जगभरात वादाला तोंड फुटलं. काहींनी तो इतिहासाचा अपमान असल्याचं म्हटलं, तर काहींनी त्याला कलात्मक स्वातंत्र्याची अभिव्यक्ती मानली. पण हा वाद केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित नाही. तो दोन हजार वर्षांपासून आपण जपलेल्या सौंदर्याच्या कल्पनांवर, वर्णभेदाच्या अदृश्य भिंतींवर आणि इतिहासाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित करतो. हेलनचा रंग नेमका कोणता होता, याचे उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही; पण तिच्या रंगावरून सुरू झालेली ही चर्चा आपल्या समाजाबद्दल बरेच काही सांगून जाते.










