Skip to main content

75 वर्षे वीज नसलेल्या पालघरच्या ‘या’ गावात झाली पहिली पोलीस…

Sagar Gotpagar
Today
7 views
75 वर्षे वीज नसलेल्या पालघरच्या ‘या’ गावात झाली पहिली पोलीस…

सागर गोटपगार


  • पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दह्याले हे आदिवासीबहुल गाव अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी या गावात वीज पोहोचली. आजही रस्ते, मोबाईल नेटवर्क, आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या संधी मर्यादित आहेत. 


  • अशा परिस्थितीत वाढलेल्या बेबी सोमन हिने महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवत गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान पटकावला आहे. 


  • तिची कहाणी ही केवळ एका तरुणीच्या वैयक्तिक यशाची नाही, तर विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासी भागातील तरुणांच्या संघर्षाची आहे.


"एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, 'बेबी, तुझं नाव मेरिट लिस्टमध्ये आलंय.' तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. इतका आनंद झाला की काही क्षण काय करावं, हेच सुचत नव्हतं. सर्वप्रथम आईला ही बातमी सांगावी म्हणून फोन लावला; पण आमचं गाव दुर्गम असल्याने तिथे नेटवर्कच नव्हतं. त्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मी आई-वडिलांपर्यंत लगेच पोहोचवू शकले नाही," 


असं सांगताना बेबी सोमन आजही भावूक होते.


User Image


पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दह्याले या आदिवासीबहुल गावातील बेबी सोमन हिने संघर्षाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवलं. मात्र तिच्या यशाइतकाच तिच्या गावाचा प्रवासही संघर्षमय आहे. दह्यालेमध्ये केवळ मोबाईल नेटवर्कचीच समस्या नाही तर स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी, म्हणजे २०२२ मध्ये या गावात प्रथमच वीज पोहोचली. आजही गावातील नागरिकांना रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो.


अनुसूचित जमातींसाठी घटनात्मक आरक्षणाची तरतूद होऊन अनेक दशके उलटली असली, तरी दुर्गम आदिवासी भागातील तरुणांचे सरकारी सेवांमधील प्रतिनिधित्व आजही अत्यल्प आहे. शिक्षण, मार्गदर्शन, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही त्यामागची प्रमुख कारणे मानली जातात.


अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बेबी सोमन हिने दह्याले गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान मिळवला आहे. तिचं यश हे केवळ वैयक्तिक यश नाही; तर विकासापासून कोसो दूर राहिलेल्या आदिवासी समुदायाचं यश आहे.


या संघर्षमय प्रवासात तिला ‘जिजाऊ’ या संस्थेची साथ लाभली. पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले महागडे क्लासेस लावणं बेबीला शक्य नव्हतं. जिजाऊ संस्थेच्या मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबाबत तिला एका मैत्रिणीकडून माहिती मिळाली. इथे प्रवेश घेतल्यानंतर तिला योग्य मार्गदर्शन मिळालं, ज्याच्या जोरावर तिचा पोलीस भरतीचा प्रवास अधिक सुकर झाला.


User Image


बेबीला एका प्रयत्नातच हे यश मिळालं नाही. याआधी तिला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. "तू कधी भरती होणार?" असा प्रश्न लोक सातत्याने विचारायचे. या सगळ्याचा तिच्यावर मोठा मानसिक दबाव होता. पण जिजाऊमधील शिक्षक तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच ती मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनली. अन्यथा हे यश मिळणं कठीण होतं, असं ती सांगते.


बेबीने रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास केला. मोबाईलपासून शक्य तितकं दूर राहिली. जास्तीत जास्त वेळ अभ्यासालाच दिला. त्यामुळेच ती या यशापर्यंत पोहोचली. योग्य संधी आणि अनुकूल वातावरण मिळाल्यास आदिवासी तरुण-तरुणी आपल्या गुणवत्तेचा झेंडा उंच फडकवू शकतात, हेच तिने सिद्ध करून दाखवलं आहे. परिस्थितीपुढे हताश न होता, त्यातून मार्ग काढत बेबीने हे यश खेचून आणलं आहे. तिचं यश इतर आदिवासी तरुण-तरुणींसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.


Share this article
रुग्णवाहिका बंद पडली, आईचा जीव गेला; दोन वर्षांनी मानवी हक्क आयोगाचा दणका
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रुग्णवाहिका बंद पडली, आईचा जीव गेला; दोन वर्षांनी मानवी हक्क आयोगाचा दणका

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील गर्भवती कविता राऊत यांचा रुग्णवाहिका बंद पडल्याने मृत्यू झाला होता. दोन वर्षांनंतर राज्य मानवी हक्क आयोगाने आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढत कुटुंबाला १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत

3 min read
S
Sumitra Vasave
चंद्रपूरचा 'प्रदूषित' आरसा, गडचिरोलीसाठी धोक्याची घंटा
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

चंद्रपूरचा 'प्रदूषित' आरसा, गडचिरोलीसाठी धोक्याची घंटा

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे विकास आणि पर्यावरणाच्या संघर्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. खनिज संपत्तीच्या उत्खननासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीमुळे आदिवासी जीवन, जैवविविधता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. चंद्रपूरमधील प्रदूषण आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा अनुभव गडचिरोलीसमोर इशारा म्हणून उभा आहे. वाघांचे कॉरिडॉर खंडित होत असताना जंगलावर अवलंबून असलेल्या समुदायांचे अस्तित्वही संकटात सापडत आहे.

5 min read
B
Bandu Dhotre
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram

Comments

Comments are currently disabled or loading...