
पडद्यावरचा बदलता दलित चेहरा… दयेच्या पात्रापासून कथानकाच्या नायकापर्यंत!
एकेकाळी हिंदी सिनेमातील दलित पात्र म्हणजे अन्यायग्रस्त, असहाय आणि सवर्ण नायकाच्या सहानुभूतीची वाट पाहणारी व्यक्ती, अशीच त्याची प्रतिमा होती. मात्र गेल्या दशकात ही चौकट हळूहळू मोडू लागली आहे. दहाड, कठहल, पाताल लोक आणि राख यांसारख्या निर्मितींमध्ये दलित पात्रे आता कथानकाच्या केंद्रस्थानी उभी आहेत. ती अन्यायाची बळी नसून न्यायासाठी लढणारी, निर्णय घेणारी आणि सत्तेला प्रश्न विचारणारी आहेत. हिंदी सिनेमा आणि ओटीटी विश्वात घडत असलेल्या या बदलाचा मागोवा घेणारा हा लेख.




