Skip to main content

नववीत शिकणाऱ्या दोन मुलींची विहिरीत ढकलून हत्या, भुसावळमधील संतापजनक प्रकार

Team BaiManus
28 Jan 2026
3 min read
58 views
नववीत शिकणाऱ्या दोन मुलींची विहिरीत ढकलून हत्या, भुसावळमधील संतापजनक प्रकार


टीम बाईमाणूस 



  • जळगावच्या भुसावळमधील संतापजनक घटना 
  • दोन अल्पवयीन मुलींची विहिरीत ढकलून हत्या 
  • ग्रामस्थांकडून कठोर कारवाईची मागणी 


जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. साकरी गावाजवळ एका माथेफिरू तरुणाने इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना बळजबरीने विहिरीत ढकलून दिल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकरी गावातील या दोन्ही मुली नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडल्या होत्या. त्या दोघी गावातीलच एका खासगी शिकवणीला जात होत्या. गावाबाहेरील एका शेतात रोहन चौधरी हा तरुण आधीच लपलेला  होता. या मुली रस्त्याने जात असताना त्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मुलींना काहीही समजण्याच्या आतच त्याने दोन्ही मुलींना बळजबरीने ओढत नेऊन जवळच असलेल्या एका खोल विहिरीत निर्दयीपणे ढकलून दिले.

मुलींना विहिरीत ढकलल्यानंतर आरोपीने तिथून लगेचच पळ काढला. यानंतर घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून शेतात काम करणारे मजूर आणि जवळून जाणारे ग्रामस्थ तातडीने विहिरीकडे धावले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी साकरी गावात पसरली आणि काही वेळातच विहिरीवर मोठी गर्दी जमली. ग्रामस्थांनी तातडीने दोरखंडाच्या मदतीने विहिरीत उतरून मुलींना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि मुलींना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला.


User Image

काही वेळाने दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. आपल्या मुलींचे मृतदेह पाहून पालकांनी केलेला आक्रोश उपस्थित सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तत्काळ साकरी गावात धाव घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी संशयित आरोपी रोहन चौधरी याला शोधून काढून ताब्यात घेतले आहे.


ग्रामस्थांकडून कठोर कारवाईची मागणी 

प्राथमिक तपासात आरोपी हा माथेफिरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याने इतक्या लहान मुलींच्या बाबतीत असे टोकाचे आणि क्रूर पाऊल का उचलले, याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे साकरी गावासह भुसावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...