Skip to main content

पारलिंगी समुदायासाठी अभिमानाचा क्षण, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ४ पारलिंगींना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रण

Team BaiManus
22 Jan 2026
3 min read
21 views
 पारलिंगी समुदायासाठी अभिमानाचा क्षण, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ४ पारलिंगींना विशेष पाहुणे म्हणून  निमंत्रण

टीम बाईमाणूस

  • प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चार पारलिंगींना विशेष निमंत्रण
  • गोरखपूरच्या गरिमा गृहातील सदस्यांचा ऐतिहासिक सन्मान
  • सामाजिक स्वीकृती आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल.



२६ जानेवारीला होऊ घातलेला ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्तरप्रदेशसाठी आणि विशेषतः गोरखपूरकरांसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण असेल. सामाजिक स्वीकार आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. येथील चार पारलिंगीं नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष पाहुणे म्हणून सहभागी होतील. हे चारही गोरखपूरमधील गरिमागृह या आश्रयगृहातील आहेत. 


गोरखपूरचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीणा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे सर्वजण सरकारी प्रोटोकॉलचे पालन करतील अशी माहिती त्यांनी दिली. २४ जानेवारी रोजी दिल्लीसाठी रवाना होतील. फक्त या चार व्यक्तींसाठी नव्हे तर संपूर्ण पारलिंगी समुदायासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 


निवड झालेल्या सर्वांची कथा प्रेरणादायी

दीपिका (३४ वर्षे) - मूळची कुशीनगरची असलेली दीपिका प्रचंड मेहनती आहे. दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेमध्ये काम केल्यानंतर तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून प्रशिक्षण घेतले ज्यामुळे आता ती स्वावलंबी आहे.

हीर (२१ वर्षे) -  कुशीनगरची रहिवासी असलेली हीर हिचा प्रवास कठीण होता. लहानपणी तिला समाजाकडून भेदभाव, टोमणे आणि नैराश्य यासारख्या गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागले. या आव्हानांना तोंड देत तिने पारलिंगी व्यक्ती म्हणून आपली ओळख स्वीकारली आणि पुढचा प्रवास सुरु केला. 

User Image

लाडो (२० वर्षे) - गोरखपूर येथील लाडो २०१९ मध्ये गरिमा गृहात आली. ती तिच्या यशाचे श्रेय तिच्या गरिमा गृहातील कुटुंबाला आणि येथे मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला देते, ज्यामुळे तिला एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मदत झाली.

एकता (३८ वर्षे ) - गरिमा गृहाचे नेतृत्व करणारी एकता ही मूळची लखीमपूर खेरी येथील आहे. ती 2007 मध्ये गोरखपूरला आली आणि 2011 मध्ये तिने शेल्टर होमची स्थापना केली.


केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे जीवन सुधारू शकलो 

आपल्या भावना व्यक्त करताना एकता म्हणाली की, "केंद्र सरकारच्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या या आश्रय गृहाच्या माध्यमातून आपण पारलिंगी समुदायाचे जीवन बदलू आणि सुधारू शकलो आहोत याचा मला खूप आनंद आहे."

गरिमा गृहाच्या संस्थापक एकता माहेश्वरी यांनी देखील याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "मला ही माहिती अधिकृत ईमेलद्वारे मिळाली. हा आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे."


समाजात समानतेचा अधिकार बळकट करण्यासाठी आणि उपेक्षित समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम एक सकारात्मक संदेश आहे. हा सन्मान भेदभावाची दरी कमी करून त्यांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा देणारा ठरेल अशी आहे. 


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...