Skip to main content

कलेक्टर टीना डाबी यांना सध्या ‘टार्गेट’ का करण्यात येतयं…?

Sayali meshram
26 Dec 2025
84 views
कलेक्टर टीना डाबी यांना सध्या ‘टार्गेट’ का करण्यात येतयं…?

सायली मेश्राम

सध्या देशभरात एक गंभीर आणि चिंताजनक विषय चर्चेत आहे. 2015 च्या UPSC परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या IAS अधिकारी टीना डाबी यांच्या विरोधात सुरू असलेला विषारी प्रचार आणि बदनामी मोहीम. टीना डाबी या दलित (SC) पार्श्वभूमीतील अधिकारी आहेत. त्यांच्या यशापासूनच त्या सातत्याने ट्रोलिंग, टीका आणि बदनामीचा सामना करत आहेत. अलीकडे राजस्थान मधील बाड़मेर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित वादाने पुन्हा एकदा हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे.

IAS अधिकारी टीना डाबी यांची बदनामी का केली जातेय?

टीना डाबी यांच्यासोबत राजस्थान येथे घडलेल्या या प्रकरणातील घटनाक्रम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 22 डिसेंबर 2025 रोजी बाड़मेर येथील महाराणा भूपाल कॉलेज अर्थात मुल्तानमल भीखचंद छाजेड महिला महाविद्यालयात परीक्षा शुल्कात तब्बल तीनपट वाढ केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ही शुल्कवाढ राजस्थान विद्यापीठाने केली होती. विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट होती, वाढीव शुल्क मागे घ्यावे.

या आंदोलनात सहभागी विद्यार्थी प्रामुख्याने ABVP या आरएसएस संबंधित विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी टीना डाबी यांची भेट घेण्याची मागणी केली. त्या वेळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने चर्चा करताना म्हटले की, टीना डाबी तुमच्यासाठी रोल मॉडेल आहेत.



यावर एका विद्यार्थी नेत्याने उत्तर दिले, “त्या रोल मॉडेल नाहीत, त्या रील स्टार आहेत.” हा उल्लेख त्यांच्या सोशल मीडिया वरील सक्रियतेकडे होता, जिथे त्या प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करतात.

“त्या रोल मॉडेल नाहीत, त्या रील स्टार आहेत.”

खरंतर या घटनेबद्दल टीना डाबी यांना काहीच कल्पना नव्हती,पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली. या घटनेनंतर पोलिसांनी चार विद्यार्थी नेत्यांना ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांचा आरोप असा होता की, “रील स्टार” हा शब्द वापरल्यामुळेच ही कारवाई झाली. पोलिसांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी रस्ता अडवल्यामुळे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. कोणत्याही अपमानास्पद वक्तव्यामुळे अटक करण्यात आलेली नव्हती.

मात्र याचा राजकीय आणि जातीय फायदा घेण्यासाठी या घटनेनंतर महिला विद्यार्थिनींनी कोतवाली पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले. परिस्थिती गंभीर बनत असल्याचे लक्षात येताच बाड़मेरचे पोलीस अधीक्षक स्वतः तेथे पोहोचले. पोलीस प्रशासनाने कारवाई चुकीची होती, असे मान्य करत कोणतीही FIR न नोंदवता विद्यार्थ्यांना सोडण्यात आले.





‘’हा मुद्दा मुद्दाम उकरून काढून व्हायरल केला गेला’’ - टीना डाबी

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना टीना डाबी यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा मुद्दा मुद्दाम उकरून काढून व्हायरल केला गेला. आपण विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकल्या असून शुल्कवाढीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही सर्व तथ्ये विश्वासार्ह राष्ट्रीय वृत्तस्रोतांमध्येही प्रसिद्ध झालेली आहेत.कोणत्याही मिडिया रिपोर्टमध्ये कुठेही विद्यार्थ्यांचा अपमान, नागरिकांवर अन्याय किंवा सूडबुद्धीने केलेली कारवाई असा आरोप सिद्ध होत नाही. तरीही सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये हे प्रकरण “टीना डाबी यांनी विद्यार्थ्यांना अटक केली” अशा स्वरूपात चुकीचे नॅरेटीव्ह पसरवले जात आहे.

या संदर्भात ‘जागल्या भारत’चे संपादक मिलिंद धुमाळे म्हणतात की, या बदनामीमागे एक गंभीर सामाजिक मुद्दा दडलेला आहे. मनुवादी विचारसरणी दलित महिलांना सत्तास्थानी पाहू शकत नाहीत. टीना डाबी दलित समाजातून आलेल्या महिला अधिकारी आहेत. UPSC मध्ये टॉप केल्यानंतरही त्यांना “आरक्षणामुळे यश” मिळाल्याचे आरोप सहन करावे लागले. नंतर मुस्लिम IAS अधिकाऱ्याशी विवाह केल्यामुळे इस्लामोफोबिक आणि जातीय ट्रोलिंग झाले. आता सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे त्यांना “रील स्टार” म्हणून कमी लेखले जात आहे. प्रत्यक्षात हा विरोध त्यांच्या कामगिरीला नाही, तर त्यांच्या सामाजिक ओळखीला आहे, असे स्पष्टपणे दिसते.



टीना डाबी सुरुवातीपासूनच ट्रोलिंगच्या बळी

ऑनलाइन चर्चांमध्ये असे आरोप करण्यात येत आहेत की, या आंदोलनाचा वापर टीना डाबी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी केला जात आहे, जेणेकरून त्यांच्या जागी उच्च जातीतला अधिकारी नेमला जावा. काही पोस्ट्समध्ये व्यंगात्मक पद्धतीने विचारले जाते, “दलित IAS अधिकाऱ्यांवर टीका करण्याची हिंमत कशी झाली?” हे वाक्य विनोद वाटत असले, तरी त्यामागील मानसिकता गंभीर आहे. मनुवादी विचारसरणी दलित महिलांना सत्तास्थानी पाहू शकत नाही. त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, वर्तनावर आणि ओळखीवर हल्ला केला जातो.





सोशल मीडियावर पसरवले जाणारे ट्रोलिंग व्हिडिओ, टीकात्मक पोस्ट्स आणि अफवा या संघटित ट्रोल आर्मीचा भाग असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रियाही चर्चेत आहेत. त्यांच्या पोस्ट्समधून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी त्याचा फटका थेट एका दलित महिला अधिकाऱ्याला बसत आहे. तहसीन पूनावाला भाजपचा नेता आहे. त्यांनी तर टीना डाबी यांनाच दोष देत माफी मागण्याचे आवाहन केले आहे. यामुळे समाजात जातीय द्वेष, अविश्वास आणि विष पसरवले जात आहे.यात कारण नसताना आरक्षण मुद्दाही आणला गेला. अनुराधा तिवारी नामक महिला कायम आरक्षण विरोधी ट्विट करताना दिसते, यावेळीही तिने कारण नसताना आरक्षण मुद्दा आणला.

टीना डाबी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दोन कोटींचा पुरस्कार

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतो, दलित महिला अधिकारी सत्तेत असणे आजही काहींना असह्य का वाटते? नुकतेच टीना डाबी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. टीना डाबी यांनी जलसंधारण आणि जनभागीदारी या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे. ‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत वर्षा जल संग्रहण आणि जनसहभाग वाढवण्यासाठी जिल्ह्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी टीना डाबी यांना प्रथम जल संचय जनभागीदारी पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कारासोबत जिल्ह्याला दोन कोटी रुपयांची रक्कमही देण्यात आली आहे.यामुळे जातीयवादी समाजाचे पित्त खवळणे साहजिक आहे, असाही आरोप मिलिंद धुमाळे यांनी केला आहे.

(संदर्भ - जागल्या भारत)

Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...