Skip to main content

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

Article in Marathi
Vira Rathod
23 May 2026
14 views
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

वीरा राठोड


  • अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे...


  • अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. 


  • जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.


समाजमनाला अस्वस्थ करून हळहळायला लावणाऱ्या अनेक सत्य प्रेमकथा जगभर जन्मलेल्या आहेत. त्यातलीच एक अजिंठ्याच्या रानात, पानापानात साठलेली, वाघुरच्या कडेवरील काळ्या कातळावर कोरलेल्या गांधर्वगीतांच्या तालावर ठेका धरणाऱ्या अप्सरांच्या शिल्पाकृती रांगेत कायमची जाऊन लेणी होऊन बसलीय. अजिंठ्याच्या पारूची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. या प्रेमकथेने खऱ्या अर्थाने भारतीय समाजपरिवेषाचे सारेच बंध झुगारून देऊन देश, प्रदेश, जात, धर्म, समाज, संस्कृती, भाषा आदी साऱ्या मर्यादा लांघून समाज मनाला दाखवून दिले होते की, प्रेमाला कुठल्याही मर्यादांमध्ये बांधता येत नाही. हा संदेशच जणू अजिंठ्याच्या अजरामर कातळावर कोरून ठेवला आहे. जो येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी निस्सिम प्रेमाचे प्रतीक मानला जाईल.


भेदाच्या भारतीय समाज मानसाने या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले परंतु या कहाणीचे वास्तव मात्र झऱ्यासारखे निर्मळ. हिऱ्यासारखे झळझळीत आणि प्रार्थनेसारखे पाक आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची ही आठवण.


User Image


अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... ती अनुभवल्याशिवाय वा जाणून घेतल्याशिवाय अजिंठा पूर्णच होत नाही. शिवाय या प्रेमकथेचे वय किती तर जोपर्यंत अजिंठा असेल तोपर्यंत ही कथा नक्कीच प्रवाही राहील, एवढे सत्व या प्रेमात होते आणि राहील. यात कोणतेच दूमत नाही. एवढी ही वास्तवपूर्ण प्रेमकथा अजिंठामय झालेली आहे.


अजिंठ्याच्या कातळावर कोरलेली जिवंत प्रेमकथा


सह्याद्री पर्वताच्या सातमाळा डोंगररांगांच्या इंध्यांद्री शाखेतील मध्ययुगातल्या चित्रशिल्पांच्या रत्नखचीत रंगावलीने हजारो वर्षाच्या समाधीनंतर आपले दार उघडले. कदाचित या काळ्या पाषाणात गोठलेल्या यक्ष गांधर्वांना मुक्त कंठाने सप्तसुरांची उधळण करायची होती. अप्सरांना आपल्या नृत्य कलाविष्काराने  शृंगारसाज चढवायचा होता. दूरदेशीच्या दोन पाखरांचे मिलन घडवून आणायचे होते, अजिंठ्याच्या जगविख्यात कलासक्त निसर्गसौंदर्याच्या कुशीत.


वाघूर नदीच्या अर्धवर्तुळाकृती ‌वाभनात १८४४ ते १८५६ या उण्यापुऱ्या दहा-बारा वर्षात नावारूपास आलेली, प्रत्येक मानवी प्रेमाभिलाषीच्या चित्ताचा वेध घेणारी मेजर रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा म्हणजे, दोन दिशेच्या, दोन देशाच्या, दोन संस्कृत्यांच्या, दोन मनांच्या, दोन भाषांच्या भिन्नधर्मियांचे एकरूप होणे आणि सारे भेद दूर सारून एकजीव होऊन जगणे होय. ही मानवीय जगण्याच्या वाटेवरची एक बोधकथाच ठरावी अशी. एक पश्चिमेचा कलोपासक, मानवतेचा विचार आणि एक पूर्वेच्या अजागर निधर्मी जात, धर्म, वर्ण बाह्य कलासक्त संस्कृतीचं लेणं. अवघ्या जगण्यात मिसळून घ्यावी अशीच ही इंद्रधनुष्यी प्रेम कहाणी. अजिंठ्यात रंगवलेल्या अनेक जातक कथांपैकी एक ‘प्रेमजातक’ होऊ बसलेले रॉबर्ट आणि पारू.


अजिंठ्याचा शोध आणि प्रेमाची सुरुवात


लेण्यांतील रंगशिल्पाविष्कार बघून थक्क झालेल्या मेजर रॉबर्ट गिलने चित्रांसोबतच १७-१८ वर्षाच्या आदिवासी लमाण पारूत स्वत:ला कधी गुंतवून घेतले कळलेच नाही. आणि त्याचा कुंचला प्रेमाचे रंग रंगवू लागला. पारू प्रचंड देखणी, उंचीपुरी, कलानिष्णांत, उत्सवप्रीय, गीत, नृत्यात रंग बसवण्यात कुशल होती. नृत्य, गीत आदी कलांच्या रंगसंगाचा वारसा जोपासणाऱ्या आदिवासी लमाण तांड्यातली लेण्यांवर राबणाऱ्या मजुरांपैकी एक. रॉबर्ट गिल पारूच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे अनेक दाखले मिळतात. अचानक या कथेने शोकांत वळण घेतले. पारूचा  २३ मे १८५६ ला प्लेगच्या आजाराने मृत्यू झाला. पूर्णपणे एकाकी झालेल्या गिलने अजिंठा गावात पारूची स्मृती उभारली ज्यावर लिहिलेय “To the Memory of My beloved paroo.’


User Image


तब्बल सव्वाशे वर्षानंतर या सत्यकथेवर अनेक लेखक, कवी, कलावंतांची नजर पडली. काहींनी शोध घेऊन, काहींनी ऐकीव-सांगीव माहितीवर तर काहींनी काल्पनिक तर्कावर आधारित मांडणी करण्याचे प्रयत्न केले. यातून पारूची ओळख स्पष्ट होण्याऐवजी धूसर आणि विपर्यस्तच अधिक झाली. त्याचबरोबर आपल्या समाजात इतिहासाचे वा इतिहास घटितांचे कलेमध्ये माध्यमांतर होत असताना पाश्चात्यांप्रमाणे फार गांभीर्याने घेतले जात नाही. अशा वेळी इतिहासाचे खोबरे होताना आपण अनेकदा पाहिले आहे.


“To the Memory of My beloved paroo.’


रॉबर्ट गिल हा जागतिक दर्जाचा चित्रकार असल्याने त्यावर अनेकांनी संशोधने, लेखन केलेय, पण केवळ एक प्रेयसी याच्या पलीकडे जाऊन पारूच्या मनोभूमिकेचा वा इतिहास भूगोलचा शोध मात्र दुर्देवाने कुणीही घेतलेला दिसत नाही. Madras Native Infantry च्या ब्रिटिश नोंदींमध्ये व रॉबर्ट गिलचा मुलगा विल्यम्स गिलच्या ‘A Colorful Father’ या लेखात आणि गिलच्या खापर पणतूंच्या नोंदीमध्ये Indian Mistress, tribal Girl paroo एवढाच उल्लेख सापडतो. त्या पलीकडे सारे सापडले ते अजिंठ्याच्या पंचक्रोशीत. अस्तित्वात असलेल्या काही अवशेषांवरून, मातीत गाडलेल्या संदर्भांवरून, मौखिक परंपरेने शेकडो वर्ष जतन केलेल्या लोकसाहित्यात. 


हे कधी ना कधी तरी प्रमाण मानावे लागणार. कारण पारूची ओळख स्पष्ट असणे हे भारतीय समाजपरिवेषाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. परंतु पारूचा सामाजिक परिवेष पाहता ती वंचित दुर्लक्षित घटकातली आणि त्यातल्या त्यात ती अजूनही स्त्री म्हणजेच दुर्लक्षिताहून दुर्लक्षित आणि तत्कालीन परिस्थितीत तिने टाकलेले पाऊल म्हणजे दुष्कृत्यच होते. कुणी तिला अमूक जातीची म्हणून दुर्लक्षित तर जातीचा अभिनिवेश बाळगणाऱ्यांसाठी तर तिने नाकच कापले होते. ब्रिटिशांच्या वर्चस्ववादी इतिहासाने तिला Mistress रखेलीच्या पलीकडे स्थान दिले नाही. भारतीय जात, धर्म, वंश श्रेष्ठत्वावर आधारलेल्या पुरुषी वर्चस्वाच्या इतिहास दृष्टीने जिथे स्त्री कर्तृत्वालाच नाकारले आहे. तिथे या आदिवासी लमाण पोरीचा इतिहास कोण नोंदवणार जिथे वंचितांच्या इतिहासात भ्रम निर्माण केल्या जातात तिथे प्रस्थापित समाजात कला, इतिहास आणि साहित्यात पारूही सर्वार्थाने उपेक्षितच राहिली आहे. 


एका प्रेमकथेचा शोकांत शेवट


शिवाय तिच्या दुर्देवाने निर्मात्यानेही तिला मातृत्वाच्या दृष्टीने उपेक्षितच ठेवले. नसता गडमल माळींच्या ‘कल्पद्रुमाची डाहळी’तील वाटाड्याप्रमाणे तिचे वारस तिची हकीकत तरी सांगत राहिले असते. परंतु इतिहासात बाईच्या व्यथेची विण बाईच्याच ओठांनी जिवंत ठेवलेली आहे. अशाच लमाण स्त्री-गीतांनी पारूला जिवंत आणि तरुण ठेवलेले आहे. दिवसेंदिवस लोकसंस्कृती, लोकगीत मृतप्राय ठरताहेत ही परंपरा जोपासणारी पिढीदेखील नामशेष होत आहे. कालपटलावर गौरवपूर्ण असा पारूचा हा इतिहास उद्या कदाचित केवळ एक आख्यायिका बनून जाईल. येणाऱ्या पिढ्या रॉबर्टला इतिहास मानतील आणि पारूला मात्र केवळ एक कल्पना जिचे अस्तित्व आम्ही धूसर आणि विपर्यास्त करून ठेवले आहे.


User Image


उपेक्षेच्या सावलीत पारूची समाधी


जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. रॉबर्ट गिलने आपल्या प्रेयसीच्या स्मरणार्थ उभारलेली ही समाधी केवळ दोन व्यक्तींच्या प्रेमाची आठवण नाही, तर भारतीय इतिहासाच्या कडेला ढकलल्या गेलेल्या एका आदिवासी स्त्रीच्या अस्तित्वाची शेवटची खूण आहे. मात्र काळाच्या ओघात या स्मृतीस्थळाची दुरवस्था होत गेली. समाधीभोवती वाढलेले गवत, झिजलेले दगड, पुसट होत चाललेली अक्षरे आणि संवर्धनाच्या अभावामुळे तिचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.


विशेष म्हणजे, दरवर्षी अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे येतात; लेण्यांतील चित्रशिल्पांवर मंत्रमुग्ध होतात, रॉबर्ट गिलच्या योगदानाबद्दल ऐकतात, पण त्याच अजिंठ्याच्या कुशीत शांतपणे उभी असलेली पारूची समाधी मात्र त्यांच्या नजरेआडच राहते. अनेकांना तिच्या अस्तित्वाची माहितीही नसते. पर्यटनाच्या अधिकृत नकाशांमध्ये, माहितीफलकांमध्ये किंवा सांस्कृतिक चर्चांमध्ये पारूचा उल्लेख क्वचितच आढळतो. त्यामुळे अजिंठ्याच्या जागतिक वारशाचा गौरव होत असताना, त्या वारशाशी भावनिक नाळ जोडणारी ही प्रेमकहाणी आणि तिची स्मृती मात्र उपेक्षितच राहते.


रॉबर्ट गिलच्या चित्रांचा गौरव करणारा इतिहास पारूच्या समाधीकडे मात्र पाठ फिरवतो. त्यामुळे ही समाधी केवळ एका प्रेमकथेची स्मृती राहत नाही, तर इतिहासाने, समाजाने आणि व्यवस्थेने एका स्त्रीला कसे उपेक्षित ठेवले याचे जिवंत प्रतीक बनते. अजिंठ्याच्या भव्य लेण्यांच्या सावलीत उभी असलेली पारूची ही जीर्ण समाधी जणू आजही कुणीतरी तिची कथा समजून घेईल, तिच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सन्मान करेल, या प्रतीक्षेत शांतपणे उभी आहे.


पारूसारखी सर्वस्व त्यागाची सम्यक प्रेरणा असलेली अशी असंख्य इतिहासातील पाने आम्ही हरवून बसलो आहोत जी प्रेमाची आणि त्यागाची प्रतीके ठरतात.


Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!
कला / साहित्य / सिनेमा

प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!

चहा हे असं पेय आहे, जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत सर्वच पितात. म्हणून तर मी चहाला समाजवादी पेय म्हणतो. चहा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ‘चहातरी घेऊन जा’ असं घरी आलेल्या माणसाला आपण किमान सांगतो तरी (ह्यात अस्सल सदाशिव पेठी घरं धरलेली नाहीत.) सध्या ‘रात्री सातनंतर चहा घेत नाही’ असं म्हणण्याचा जरी जमाना आलेला असला, तरी सकाळी उठल्यावर पहिली आठवण अजूनही चहाची येते. म्हणूनच आजच्या ‘आंतरराष्ट्रीय चहा दिना’निमित्त हे आपल्या जीवाभावाच्या मित्राला पत्र...

7 min read
D
Dwarkanath Sanjhgiri

Comments

Comments are currently disabled or loading...