
नेहा, अमीन आणि मनीष कुमार… यांचेही सलग 23 दिवसांचे उपोषण तितकेच महत्वाचे आहे, जितके सोनम वांगचूक यांचे! कोण आहेत हे 'आयसा'चे विद्यार्थी नेते?
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व केवळ सोनम वांगचुक यांच्यापर्यंत मर्यादित राहिले नव्हते. वांगचुक यांच्यासोबतच या लढ्याचा खरा कणा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे तीन विद्यार्थी नेते होते, जे सलग २३ दिवस अन्नाचा एकही कण न खाता बेमुदत उपोषणाला बसले होते. अखेर प्रकृती अत्यंत खालावल्याने २३ व्या दिवशी त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे.









