Skip to main content

डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीत विचारवंत, संशोधकांऐवजी ‘आरएसएस’ आणि ‘समरसता’च्या कार्यकर्त्याचा भरणा… समिती बरखास्त करण्याची मागणी!

Article in Marathi
Team BaiManus
22 Apr 2026
37 views
डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीत विचारवंत, संशोधकांऐवजी ‘आरएसएस’ आणि ‘समरसता’च्या कार्यकर्त्याचा भरणा… समिती बरखास्त करण्याची मागणी!

टीम बाईमाणूस


  • महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केले असून त्यात बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे विचारवंत, अभ्यासकांऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा असणाऱ्या व्यक्तींचीच भरती करण्यात आली आहे.
  • समितीचे हे पुनर्गठन आंबेडकरी विचारांची धार बोथट करण्याचे आणि आरएसएसला अपेक्षित डॉ. आंबेडकरी विचारांची मांडणी करण्याचे षडयंत्र तर नाही ना? असा सवाल आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
  • ही पुनर्गठित समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून ती बरखास्त करण्याची मागणी आंबेडकरी वतुर्ळातून केली जात आहे.


महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केले असून या पुनर्गठनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे विचारवंत, अभ्यासकांऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निष्ठा असणाऱ्या व्यक्तींचीच भरती करण्यात आली आहे. संघाशी 'समरस' असलेल्या कार्यकर्त्यांचाच भरणा झाल्यामुळे ही पुनर्गठित समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून ती बरखास्त करण्याची मागणी आंबेडकरी वतुर्ळातून केली जात आहे.


१९७६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती काम करत असून आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन आणि भाषणांचे २३ खंड, जनता पाक्षिकाचे १० खंड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र साधन साहित्याचे २ खंड समितीने प्रसिद्ध केले आहेत. तसेच अनेक खंडांचे संपादन करून पुनर्मुद्रण केले आहे.


उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे १३ एप्रिल रोजी एका शासन निर्णयाद्वारे पुनर्गठन केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री उपाध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव हे सदस्य सचिव, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक हे निमंत्रित सदस्य तर शासकीय मुद्रणालये व प्रकाशनेचे संचालक हे सदस्य असतील. या समितीवर राज्य सरकारकडून १६ सदस्य नामनिर्देशित करण्यात आले आहेत. 


User Image


डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती अशी आहे


प्रा. डॉ. ईश्वर तुकाराम नंदपुरे (नागपूर), डॉ. रमेश माधवराव पांडव (छत्रपती संभाजीनगर), डॉ. भीमराव भोसले (कलबुर्गी, कर्नाटक), श्यामकांत हनुमंत अत्रे (डोंबिवली, ठाणे), प्रा. डॉ. विजय मोरे (खारघर, मुंबई), डॉ. सुनिल दादोजी भंडगे (पुणे), सागर कुसुम रूस्तूम शिंद (छत्रपती संभाजीनगर), सीमा मिलिंद कांबळे (पुणे), प्रा. संजय सुधाकर साळवे (नाशिक), एकनाथ जावीर (पुणे), प्रा. डॉ. सुधाकर जनार्दन बोकेफोडे (पुणे), ऍड. क्षितिज गायकवाड (पिंपरी-चिंचवड), योगिता अशोक होके पाटील (छत्रपती संभाजीनगर), डॉ. रमेश रावळकर (छत्रपती संभाजीनगर) आणि प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे (छत्रपती संभाजीनगर) व डॉ. प्रदीप आगलावे (नागपूर) अशी ही १६ सदस्यांची समिती आहे.


छत्रपती संभाजीनगर येथील आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे आणि नागपूरचे प्रसिद्ध विचारवंत / लेखक डॉ. प्रदीप आगलावे हे दोघे वगळता उर्वरित १६ सदस्य हे भाजप, आरएसएस, समरसता मंच, अभाविप, विवेक जागर मंच, समरसता साहित्य परिषदेशी संबंधित आहेत.


तीन वर्षांचा कार्यकाळ असलेल्या समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान, आंबेडकरी प्रमाणशास्त्र मानणाऱ्या खऱ्या अभ्यासकांची वर्णी लावता राज्य सरकारने आरएसएसच्या विचारसरणीवर निष्ठा असलेल्या सदस्यांचाच भरणा केल्यामुळे समितीचे हे पुनर्गठन आंबेडकरी विचारांची धार बोथट करण्याचे आणि आरएसएसला अपेक्षित डॉ. आंबेडकरी विचारांची मांडणी करण्याचे षडयंत्र तर नाही ना? असा सवाल आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.


समितीत संघाच्या आणि समरसताच्या कार्यकर्त्यांचा अधिक भरणा


नागपूरचे प्रा. डॉ. ईश्वर तुकाराम नंदपुरे हे दलित लेखक, दलित नाट्य समीक्षक असले तरी २०१९ पासून आरएसएस प्रेरित संस्था समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. 'सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक' असे या साहित्य परिषदेचे बोधवाक्य आहे. डॉ. नंदपुरे यांची एकूणच जडण-घडण आरएसएसच्या मुशीत झालेली आहे. त्यांनी समरसता साहित्य परिषदेची भूमिका मांडणारे 'समरसता साहित्यः संकल्पना-प्रेरणा-स्वरूप' असे पुस्तकच प्रकाशित केलेले आहे. 


छत्रपती संभाजीनगरचे डॉ. रमेश माधवराव पांडव आरएसएसशीच संबंधित असलेल्या महाराष्ट्र सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक आणि आरएसएसचे प्रचारक आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही काम केले आहे. विशेष म्हणजे डॉ. रमेश पांडव हे स्वतःला बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक असल्याचे सांगतात. नुकत्याच झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पांडव यांच्या विशेष उपस्थितीत नाशिकमध्ये आरएसएसच्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'भव्य महाआरती' कार्यक्रमाचा आयोजनावरून मोठा वाद निर्माण झाला होता.


छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकेकाळी कार्यरत असलेले डॉ. भीमराव भोसले हे सध्या कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठात भाषाशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. आरएसएसच्या विचारधारेशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिल्याबद्दल त्यांची केंद्र सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडच्या अशासकीय स्वतंत्र संचालकपदी २०२१ मध्ये पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०२५ मध्ये त्यांची पुन्हा याच पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे.


ठाण्यातील डोंबिवलीच्या श्यामकांत हनुमंत अत्रे हे आरएसएसच्या नेतृत्वातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीशी संबंधित असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते आणि वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी आहेत.


मुंबईतील खारघरचे प्रा. डॉ. विजय मोरे हे डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयात इतिहासाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते आरएसएसशी साहित्यिक आघाडी असलेल्या समरसता साहित्य परिषदेचे २०१९ पासूनच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत.


User Image


डॉ. सुनिल दादोजी भंडगे हे पुण्याच्या भांडारकर प्राच्चविद्या संशोधन संस्थेचे (बोरी) आजीवन सदस्य आहेत. तेही समाजिक समरसता मंचशी संबंधित आहेत. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख आहेत. सागर कुसुम रूस्तूम शिंदे हे छत्रपती संभाजीनगर येथील आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते आहेत. विवेक जागर मंच या आरएएस प्रेरित संघटनेत ते सक्रीयपणे काम करतात. पुण्याच्या सीमा मिलिंद कांबळे या डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या पत्नी आहेत. मिलिंद कांबळे हे विद्यार्थीदशेपासूनच आरएसएसशी जोडले गेले असून विद्यार्थी दशेत त्यांनी अभाविप या आरएसएसच्या विद्यार्थी आघाडीत काम केले आहे. त्यांनी भाजपकडून पुणे महानगरपालिकेची निवडणूकही लढवली होती.


नाशिकचे प्रा. संजय सुधाकर साळवे हेही आरएसएसचे स्वयंसेवक असून गेल्या वर्षी १० मे २०२५ रोजी मुंबई तरुण भारतमध्ये त्यांचा 'राष्ट्रीय पुनरूत्थानः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' असा लेख प्रसिद्ध झालेला आहे. तो आजही त्यांच्या फेसबुक वॉलवर पहायला मिळतो. विद्यार्थीदशेत ते अभाविपचे सक्रीय कार्यकर्ते होते. एकनाथ जावीर हे व्यवसायाने वकील असून ते अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे संस्थापक नेते आणि आरएसएसचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. होलार समाज संघटनेच्या कार्यक्रमाला सामाजिक समरसता मंच, आरएसएसचे स्वयंसेवक, डिक्कीच्या लोकांनाच निमंत्रित केले जाते.


या समितीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेले पुण्याचे प्रा. डॉ. सुधाकर जनार्दन बोकेफोडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन समितीचे प्रमुख आहेत. पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळाचे ते संचालक आहेत. २०१८ मध्येही भाजप सरकारने त्यांच्यावर या समितीच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी सोपवली होती. तेही संघाशी संबंधित असल्याचा आरोप तेव्हाही झाला होता.


ऍड. क्षितिज गायकवाड हे पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी ते काँग्रेसचे पिपंरी-चिंचवड शहरजिल्हा उपाध्यक्ष होते. योगिता अशोक होके पाटील या छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. विद्यापीठ विकास मंच या आरएसएस नेतृत्वातील संघटनेच्या पॅनलच्या त्या उमेदवार होत्या. या पॅनलच्या त्या माध्यमातून त्या विद्यापीठाची अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवर निवडून आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरचे डॉ. रमेश रावळकर हे अजिंठा येथील बाबुराव काळे महाविद्यालय या कायम विनाअनुदानित महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. 


विशिष्ट 'अजेंडा' राबवण्याचा डावः डॉ. मनोहर


दरम्यान, राज्य सरकारने केलेल्या या समितीच्या पुनर्गठनावर राज्यातील आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक, लेखक व कार्यकर्त्याकडून तीव्र आक्षेप घेण्यात येऊ लागले आहेत. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्यासह अनेकांनी ही समिती तातडीने बरखास्त करण्याची मागणी केली आहे.


नव्या समितीत 'समरसतेच्याच कार्यकर्त्यां'चा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे ही समिती त्वरित बरखास्त करून आंबेडकरी प्रमाणशास्त्र मानणाऱ्या खऱ्या अभ्यासकांची नवी समिती स्थापन करावी, अशी मागणी प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केली आहे.


ज्या समितीवर बाबासाहेबांचे चरित्र आणि साधने प्रकाशित करण्याची जबाबदारी आहे, त्या समितीचे सदस्य हे केवळ सरकारी निष्ठा असणारे नव्हे तर बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे असावेत. सध्याच्या समितीच्या रचनेत शासनाचा विशिष्ट अजेंडा राबवला जात असल्याची शंका येत आहे. समरसतावाद्यांचा भरणा समिती बरखास्त करून नवी समिती स्थापन करावी, हीच माझी स्पष्ट सूचना आहे. महाराष्ट्र शासन हे संविधानिष्ठ असून त्यांनी स्थापन केलेली समिती खरोखरच आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे जाणत्या लोकांना वाटले पाहिजे, असेही डॉ. मनोहर यांनी म्हटले आहे.


User Image


'वैचारिक कंट्रोल' आणण्याचे षडयंत्रः पातोडे


'हा केवळ समिती बदल नसून फुले शाहू आंबेडकरी विचारांची धार बोथट करण्याचा प्रयत्न आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून त्यांच्याच साहित्याला भाजप संघ पूरक दाखवण्याचे हे कारस्थान वेळीच ओळखणे गरजेचे आहे. ही केवळ समितीची पुनर्रचना नाही, तर येणाऱ्या काळातील वैचारिक लढाईची नांदी आहे. जर आंबेडकरी समूह आणि अभ्यासक आता गप्प राहिले, तर उद्याचा इतिहास हा 'सरकारला हवा तसा' लिहिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही बोगस समिती तातडीने बरखास्त करून नव्याने समिती गठित करण्यात यावी. त्यात फक्त ज्यांचा चळवळीशी थेट संबंध आणि योगदान आहे अशाच चळवळीतील अभ्यासक, विद्वान, बुद्धिजीवी आणि आंदोलकांचा समावेश करावा. खोगीर भरती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, वैचारिक 'कंट्रोल' करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.


ज्यांनी सत्तेला सडेतोड प्रश्न विचारले असते, असे 'आक्रमक' आवाज या समितीतून पद्धतशीरपणे गायब करण्यात आले आहेत आणि 'लो-प्रोफाईल' सदस्यांचा भरणा नव्हे तर खोगीर भरती करण्यात आली आहे. ही एक संघी रणनीती आहे. नवीन समितीतील अनेक सदस्यांचा सार्वजनिक वावर अत्यंत मर्यादित आहे. हे सदस्य तांत्रिकदृष्ट्या पात्र वाटत असले, तरी त्यांची वैचारिक भूमिका धूसर आहे. ते आरएसएस-भाजपला पुरक आहेत. जेव्हा समितीवर असे लोक असतात ज्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख नसते, तेव्हा सरकारला अशा समितीवर पडद्यामागून नियंत्रण मिळवणे सोपे जाते. यालाच राजकीय परिभाषेत 'कंट्रोल विदाआउट व्हिसिबिलिटी' असे म्हटले जाते, असेही पातोडे यांनी म्हटले आहे.


घुसमट झाली तर राजीनामा देऊन बाहेर पडेन  - प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे 


या समितीचे सदस्य आणि प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक/विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीत संघाशी समरस असलेल्या कार्यकर्त्यासोबत काम कसे कराल? ते त्यांचाच अजेंडा राबवू लागले तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न प्रा. डॉ. कांबळे यांना विचारला असता 'ऋषीकेश कांबळेंच्या भूमिका सर्वांना ठाऊक आहेत. या समितीत प्रमाणशीर काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचसाठी मी या समितीचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पण या समितीत काम करत असताना माझी घुसमट होत असेल तर मात्र राजीनामा देऊन बाहेर पडेन,' असे प्रा. डॉ. कांबळे म्हणाले.


(साभार - newstown.in)


Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...