Skip to main content

एपस्टीन फाईल्स : मर्दोंने उसे बाजार दिया..

Article in Marathi
Nilambbri Joshi
20 Feb 2026
4 min read
7 views
एपस्टीन फाईल्स : मर्दोंने उसे बाजार दिया..

 निलांबरी जोशी




एपस्टीन फाईल्समधून अनेकानेक पैलू समोर येत आहेतच. त्यापैकी या सर्व अब्जाधीश, सेलिब्रिटी, सत्तास्थानी असलेल्या पुरुषांचा स्त्रियांकडे पहाण्याचा दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर जगभरातली पितृसत्ताक व्यवस्था परत एकदा अधोरेखित होते. कित्येक पुरुषांसाठी स्त्रिया या केवळ “एक बिकाऊ चीज आहेत” हे त्रासदायक सत्य एपस्टीन फाईल्समधूनही परत एकदा समोर येतं.



बिल गेटसच्या संभाव्य पार्टीत कोण कोण पाहुणे असावेत याबाबत बिल गेटसच्या सहाय्यकाला एपस्टीननं २०१३ च्या फेब्रुवारीत एक इमेल लिहिलं होतं. “पीपल फॉर बिल” अशी सुरुवात असलेल्या या इमेलमध्ये नंतर - संयुक्त राष्ट्रसंघाचे सेक्रेटरी जनरल, बान की मून, वुडी अॅलन, कतारचे पंतप्रधान, हार्वर्डमधले संशोधक, हयात हॉटेल्सचा सीईओ, व्हाईट हाऊसमधला एक संचालक, अमेरिकेचे संरक्षणमंत्री अशा जगातल्या धनवान आणि सत्तास्थानी असलेल्या पुरुषांना(च) फक्त बोलवावं असं एपस्टीननं सूचित केलं आहे.


रिचर्ड ब्रॅनसन यांना एपस्टीननं पाठवलेल्या इमेलमध्ये -  नोबेल शांतता पारितोषिक समितीचे प्रमुख जॅगलॅंड माझ्याकडे न्यूयॉर्कमध्ये रहायला येणार आहेत. तुम्हाला त्यांना भेटण्यात रस असू शकतो, असा मजकूर आहे. एका प्रभावशाली व्यक्तीला भेटायची संधी आपण पुरवतो आहोत याचा बडेजाव आणि किती महत्वाच्या लोकांबरोबर आपल्या ओळखी आहेत याची बढाई, अशा प्रकारे या इमेल्सची रचना आहे.


हाच एपस्टीन एखाद्या महिलेला इमेल पाठवताना मात्र - तुझ्या xxxxxxx चा फोटो काढ आणि पाठव.. अशाच पध्दतीत  इमेल लिहित होता. इतर सर्व गोष्टी (त्यानं सुचवलेले कपडे घालणं; त्यानं सुचवल्यानुसार केशरचना करणं; त्यानं सुचवल्याप्रमाणे मसाज आणि सेक्स करणं; त्यानं सुचवल्याप्रमाणे तो आणि इतर मुलींबरोबर टबबाथ घेणं इतकं सगळं करुनही एपस्टीननं आयोजित केलेल्या सन्माननीय लोकांच्या भोजनसमारंभाला आपल्याला येऊ दिलं नाही अशी तक्रार करणाऱ्या एकीबद्दल “ती सतत रडगाणं गाते आणि कटकट करते” (crying and whining) अशा तक्रारी एपस्टीननं इमेल्समध्ये केल्या आहेत.


पुरुषांच्या ज्या संभाषणांमधून स्त्रियांना वगळलं जातं ती संभाषणं एपस्टीन फाईल्समधून अनेकवार समोर येतात. जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठित, सन्माननीय समजल्या जाणा-या या व्यक्तीसुध्दा, आपलं संभाषण स्त्रियांना ऐकू जाणार नाही याची खात्री असेल तेव्हा, स्त्रियांबद्दल कसा विचार करतात आणि कशा प्रकारे व्यक्त होतात ते एपस्टीन फाईल्सच्या इमेल्समधून समोर येतं.


User Image

एपस्टीन फाईल्समध्ये उल्लेख असलेल्या लोकांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पुरुष : यात अब्जाधीश, करोडपती, तंत्रज्ञानातले उद्योगपती, बॅंकांचे अध्यक्ष, राजकारणी, नेते, आपलं नेटवर्क दृढ करण्याचे मार्ग एपस्टीनला आणि अशा लब्धप्रतिषष्ठित वर्तुळातल्या लोकांना पूरक ठरतील असे सर्वजण आहेत. आणि दुसरा प्रकार म्हणजे अर्थातच स्त्रिया. ज्या नगण्य, क्षुल्लक आहेत अशा सहाय्यिका भूमिकेतल्या भोवतालच्या स्त्रिया आणि  लैंगिक सेवांबद्दल तो ज्यांना पैसे पुरवत होता त्या स्त्रिया.


त्यापैकी सर्वात जास्त वेळा त्याच्या इमेल्समध्ये स्त्रियांकडे वस्तू म्हणून पाहिल्याचं दिसतं. अशा वस्तू ज्यांच्याकडे पहायचं आणि त्यांना शारीर पातळीवर स्वत:ला सुधारायच्या सूचना द्यायच्या… हिचे दात पुढे आले आहेत, तिचं वजन कमी / जास्त आहे, तिचा गुप्तरोगावर इलाज झाला आहे, तिचे नाकडोळे (प्लॅस्टिक सर्जरीनं) ठीकठाक केलेत असे एखादं उत्पादन क्वालिटी कंट्रोलला आल्यासारख्या संवेदनाहीन सूचना दिसतात.


“तुला तेविसावं वर्ष लागायच्या आत डॉक्टरांना भेटून नाक ठीक करुन घ्यावं लागेल” असं इमेल एपस्टीननं एका मुलीला २०१७च्या जुलैत पाठवलेलं आहे.


पुरुषांना पुरुषांनी पाठवलेले मेसेजेस काय प्रकारचे होते हे सुलतान अहमद बिन सुलेमान याच्यासारख्या व्यावसायिकांच्या मेसेजेसवरुन उघड होतं. “युक्रेनियन आणि मोलडोव्हन आल्या आहेत. भ्रमनिरास झाला. फोटोत दिसतात तितक्या मोलडोव्हियन आकर्षक नाहीत“ असं सुलतान म्हणतो. यावर एपस्टीन “फोटोशॉप केलं असेल” असं उत्तर देतो.


एपस्टीन तुरुंगातून सुटल्याचं “सेलिब्रेशन” स्ट्रिपर्ससोबत करायच्या संदेशांची पीटर मांडेलसनसोबत केलेली देवाणघेवाणही या इमेल्समध्ये आहे.


२०१९ मध्ये एपस्टीन मरण पावला त्याआधी सहा मुलांचा बाप असलेला हार्वर्डचा प्रेसिडेंट समर्स हा एपस्टीनला मेसेज पाठवून “रोमॅंटिक सल्ला” मागत होता. समर्सनं अल्पवयीन मुलीबरोबर संबंध ठेवल्याचं कबूल केलं आहे.


एपस्टीन फाईल्समधल्या स्त्रियांचा दुसरा प्रकार म्हणजे संयोजक स्त्रिया. एपस्टीनच्या कळपातल्या पुरुषांसाठी मदतनीसाचं काम करणाऱ्या स्त्रिया. उदाहरणार्थ, लेस्ली ग्रॉफ ही एपस्टीनची दीर्घकाळ सहाय्यक होती. त्याचे कार्यक्रम, भोजनव्यवस्था यांचं संयोजन करणं आणि आणि सेक्ससाठी पुरवायच्या मुलींचं संयोजन करणं ही कामं लेस्ली करत होती. २०१२ मध्ये लॅरी समर्ससोबत एपस्टीनची मिटिंग होती तेव्हा लेस्लीनं “लॅरी हा व्हीआयपी असल्याची” तिच्याबरोबरच्या सहाय्यक महिलांना आठवण करुन दिली होती. “त्याच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करुन ठेवायला हवी” याबाबतच्या काटेकोर सूचना तिनं दिल्याचे इमेल्स आहेत.


लेस्ली आपला बॉस, एपस्टीन, हा पॅरिस, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, लंडन अशा ठिकाणी कोणाकोणाला भेटणार; तिथल्या परिषदा आणि डिनर्स कशी अटेंड करणार यांचं सतत नियोजन करत होती. हेलिकॉप्टर्स बुक करणं, पॅकिंग अशी कामं करताना  “I’ll take care of it.” असे मेसेजेस ती एपस्टीनला पाठवायची.


सेक्ससाठी पुरवल्या जाणाऱ्या स्त्रिया / मुली यांचे व्हिसा तयार आहेत का हे पहाणं, वेगवेगळ्या शहरांमधून त्या नियोजित ठिकाणी पोचतील याची व्यवस्था करणं हे लेस्ली कार्यक्षमपणे करत होती. सॉना बाथ, स्टीम रुम्सचं संयोजन; बेडरुममधलं मॉडेम नीट काम करतंय का? वगैरे तपशील चेक करणं हे लेस्ली करत होती.


२०१२ मधल्या एका शनिवारी एपस्टीननं जेव्हा, सत्ता आणि पैसा या दोन विषयांवर दोन परिषदा घ्यायचं अचानक ठरवलं तेव्हा त्यानं या परिषदांना कोणाला बोलवावं अशा वीस माणसांची यादी लेस्लीला पाठवली होती. त्यात जेफ बेझॉस, जेस स्टेली, बिल क्लिंटन, बिल गेटस यांची नावं होती. यात अर्थातच कोणत्याच स्त्रीचं नाव नव्हतं. सत्ता आणि पैसा हे विषय थोडेच बायकांनी बोलायचे असतात? लेस्लीलाही त्यात काही वावगं वाटलं नाही हे दु:खदायक आहे. या लोकांना आमंत्रणं धाडायला ती सरसावली.


User Image

एलॉन मस्कच्या मेरी बेथ आणि अॅनी आणि ब्रॅन्सनची हेलेन अशा सहाय्यिका होत्या. लेस्ली आणि त्या सर्वजणी “आपापल्या मालकांना काय खायला आवडेल” याबाबत एकमेकींशी चर्चा करायच्या. ब्रॅन्सनला कोणती दारु आवडते, कोणती नाही, वगैरे उल्लेख इमेल्समध्ये सापडतात.  (Branson likes sauvignon blanc, pinot grigio and rosé. “No chardonnay please! Likes desserts in general. As sugar-free as possible.”)


या इमेल्समध्ये फेव्हर्सच्या देवाणघेवाणी उघड आहेत. एपस्टीननं कोणाच्या तरी मुलाला नोकरी मिळवून दिली आहे, कोणालातरी आपल्या न्यूयॉर्कच्या घरात रहायची परवानगी दिलेली आहे असं इमेल्समध्ये दिसतं. अहो रुपं अहो ध्वनि: पध्दतीत एकमेकांची भलामण करणं हे नित्याचंच होतं.

मग एपस्टीनचं ऋण चुकवण्यासाठी “सेक्सचे आरोग्यासाठी असलेले फायदे” असे मेसेजेस हॅपी न्यू इअरच्या मेसेजसोबत एपस्टीनला मित्रमंडळी पाठवत होती.

विकिपिडियावर तुझ्या नावासमोरचं सेक्स आॉफेंडर काढून फक्त बिझिनेसमन, दानशूर इतकंच ठेवायचा प्रयत्न करतो आहोत - असेही एपस्टीनच्या मित्रांनी त्याला मेसेजेस पाठवले आहेत. एकमेकांना जगासमोर “भला माणूस” दाखवणं हा हेतू त्यात दिसतोच.


एपस्टीन फाईल्समधून अनेकानेक पैलू समोर येत आहेतच. त्यापैकी या सर्व अब्जाधीश, सेलिब्रिटी, सत्तास्थानी असलेल्या पुरुषांचा स्त्रियांकडे पहाण्याचा दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर जगभरातली पितृसत्ताक व्यवस्था परत एकदा अधोरेखित होते. कित्येक पुरुषांसाठी स्त्रिया या केवळ “एक बिकाऊ चीज आहेत” हे त्रासदायक सत्य एपस्टीन फाईल्समधूनही परत एकदा समोर येतं.


संदर्भ : https://www.theguardian.com/.../sex-and-snacks-but-no…


(साभार - निलांबरी यांच्या फेसबुक पेजवरून)


Share this article
 पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…
कॉलम

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’च्या आवाहनात एक महत्त्वाचा प्रश्न गायब आहे तो म्हणजे भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खाद्यतेल आयातीवर का खर्च करतो? १९९० नंतरच्या धोरणांनी भारताची स्वयंपूर्ण तेलबिया अर्थव्यवस्था कशी मोडली आणि त्याची किंमत आज महाराष्ट्रातील शेतकरी कशी मोजतो आहे? सोयाबीनच्या पडत्या भावापासून ते हवामान बदलामुळे वाढलेल्या रोगराईपर्यंत, ग्रामीण भारत एका दुहेरी संकटात अडकला आहे. ‘त्याग’ नागरिकांनी करायचा, पण धोरणात्मक ‘खोडा’कडे पाहायचं नाही, हीच आजच्या अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.

4 min read
G
Girish Patil
सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…
कॉलम

सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…

गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.

4 min read
N
Nilu Damle
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
 एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?
कॉलम

एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?

सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले. या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.

5 min read
N
Nilu Damle
प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन
कॉलम

प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

- अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्रांपैकी एक असून, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासाठी ओळखले जाते. - मात्र या तेजस्वी प्रतिमेमागे व्यक्तिगत शस्त्रास्त्रांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे एक गंभीर वास्तव दडलेले आहे. - ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून, जागतिक चिंतेचा विषय बनली असून भारतासह इतर देशांसाठीही अभ्यासाचा मुद्दा ठरत आहे.

4 min read
B
Bhaga Warkhade
‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?
कॉलम

‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?

फॅक्ट-चेक युनिटच्या माध्यमातून सरकारकडून माध्यमांवर नवे नियंत्रण. सरकारच्या नव्या नियमांमुळे पत्रकारितेत वाढतेय सेन्सॉरशिपची मोठी भीती. कायद्याच्या आडून सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न.

5 min read
B
Bhaga Warkhade

Comments

Comments are currently disabled or loading...