Skip to main content

गेल्या १० वर्षात पेपर फुटले तब्बल ८९ वेळा आणि परीक्षा पूर्णपणे रद्द झाल्या ४८ वेळा… कुठे गेला 'नवीन पेपर लीक कायदा’?

Article in Marathi
Shantanu Khuje
13 May 2026
4 min read
31 views
 गेल्या १० वर्षात पेपर फुटले तब्बल ८९ वेळा आणि परीक्षा पूर्णपणे रद्द झाल्या ४८ वेळा… कुठे गेला 'नवीन पेपर लीक कायदा’?

शंतनू खुजे 



  • परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.


  • विश्वासार्हता किंवा पेपरफुटीच्या कारणावरून परीक्षा रद्द करण्याची ही काही पहिली वेळ नाही. देशात गेल्या १० वर्षात ८९ वेळा पेपर फुटले, त्यापैकी जवळपास ४८ परीक्षा पूर्णपणे रद्द करून प्रशासनाला त्याच्या फेरपरीक्षा घ्याव्या लागल्या.


  • पेपरफुटीच्या अश्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच सार्वजनिक परीक्षा कायदा, २०२४ लागू केला आहे. परंतु या कायद्यामध्ये कठोर तरतुदी असूनही या घटना वारंवार का घडत आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे… 



राष्ट्रीय परीक्षा संस्थेने १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ देत, नीट युजी २०२६ परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला. परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.


विश्वासार्हता किंवा पेपरफुटीच्या कारणावरून परीक्षा रद्द करण्याची ही काही पहिली वेळ नाही. देशात गेल्या १० वर्षात ८९ वेळा पेपर फुटले, त्यापैकी जवळपास ४८ परीक्षा पूर्णपणे रद्द करून प्रशासनाला त्याच्या फेरपरीक्षा घ्याव्या लागल्या. ज्यामुळे परीक्षेला सामोरे जाणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. 


पेपरफुटीच्या अश्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच सार्वजनिक परीक्षा कायदा, २०२४ लागू केला आहे. परंतु या कायद्यामध्ये कठोर तरदुती असूनही या घटना वारंवार का घडत आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे… 


नीट युजी परीक्षा का रद्द करण्यात आली… 


देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे 'एनटीए'ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.


User Image

पेपर फुटण्याच्या आणि परीक्षा रद्द होण्याची मालिका…


देशात गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांचे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यातील अनेक परीक्षा प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या आणि काही ठिकाणी फेरपरीक्षा घ्याव्या लागल्या.


  • नीट युजी २०२४ - वैद्यकीय प्रवेशासाठीची ही देशातील सर्वात मोठी परीक्षा २०२४ मध्ये प्रचंड वादात सापडली. बिहार आणि गुजरातमध्ये पेपर फुटल्याचे आणि काही विशिष्ट केंद्रांवरील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स  दिल्याचे समोर आले. या प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थ्यांची मोठी आंदोलने झाली आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. अखेर ८१३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली.

  • युजीसी नेट २०२४ - प्राध्यापक पदासाठी आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप साठी घेतली जाणारी ही परीक्षा १८ जून २०२४ रोजी झाली होती. मात्र, डार्कनेट आणि टेलिग्रामवर या परीक्षेचा पेपर आधीच लीक झाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला मिळाल्यावर, दुसऱ्याच दिवशी शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा संपूर्ण देशात रद्द केली.


    User Image
  • एसएससी सिजीएल २०१७ - कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीस्तर परीक्षा २०१७ मध्ये पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. याविरोधात दिल्लीत विद्यार्थ्यांनी अनेक दिवस मोठे आंदोलन केले होते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने काही टप्प्यांतील परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात आली होती..

  • महाराष्ट्र - टीईटी आणि आरोग्य विभाग भरती  - महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा, म्हाडा आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड च्या परीक्षांचे पेपर फुटल्याचे मोठे रॅकेट पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्तांनाही अटक झाली होती. आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ती नंतर टीसीएस मार्फत नव्याने घेण्यात आली.

परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवू शकत नाही, ही बाब वेदनादायी… 

नीटसारख्या महत्वाच्या परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यात आपण अपयशी ठरलो अशी खंत डॉ. अमोल अन्नदाते व्यक्त करतात. ते वैजापूर येथील आनंद मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक म्हणून कार्यरत असून ते लेखक आणि वक्ते देखील आहेत. 


बाईमाणूसशी बोलतांना ते म्हणतात की, 

"२०२४ साली पहिल्यांदा पेपर फुटला होता. मागच्या वर्षी पण मुलांना पैकीच्या पैकी मार्क पडल्यामुळे गैरप्रकार पुढे आले होते. हे सलग तिसरं वर्ष आहे. ही साधीसुधी परीक्षा नाहीये, या परीक्षेला दरवर्षी अंदाजे २५ लाख मुलं बसतात. यावर्षी साडेबावीस लाख मुलं बसली. तीन वर्षाचं ॲव्हरेज काढलं तर २५ लाख मुलं फक्त एक लाख सीट्ससाठी कम्पीट करत असतात." 
"ही परीक्षा सर्वसामान्यांच्या जीवाशी निगडित असलेली परीक्षा आहे. देशाच्या आरोग्याचं भवितव्य ही मुलं ठरवणार आहेत. इतक्या संवेदनशील आणि राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेचं पावित्र्य आणि पारदर्शकता आपण टिकवून ठेवू शकत नाही, ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याचं मत अन्नदाते यांनी व्यक्त केलं.”


प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनोधैर्यावर खोलवर घाव…

 

बाईमाणूसशी बोलतांना भाऊ चासकर म्हणाले की, 


ही केवळ परीक्षा रद्द झालेली नाहीये तर प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनोधैर्यावर खोलवर घाव घातला गेलाय. चूक काही मोजक्या लोकांनी केली परंत शिक्षा मात्र लाखो गुणी, मेहनती मुलांना! इथे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा, त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा आणि आयुष्याच्या नाजूक टप्प्याचा विचार होत नाही. 

चासकर हे शिक्षणतज्ञ आहेत. त्यांच्या मते, लाखो मुलांनी परीक्षा दिली तेव्हा हुश्श म्हणत एकदाची सुटका झाली म्हणून मोठा सुस्कारा सोडला असेल. आता विचार करा, सध्या काहीसे ताणरहीत निवांत आयुष्य जगत असलेल्या आणि म्हणूनच किंचित गाफील असलेल्या मुलांना आता पुन्हा एकदा कस घेणारी कठोर परीक्षा द्यायचीये. 


User Image

नीटची परीक्षा रद्द झाल्याच्या १ कोटी लोकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम… 


डॉ. अन्नदाते यांच्या मते, नीटची परीक्षा रद्द झाल्याच्या  प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम जवळपास १ कोटी लोकांवर झालाय. ते म्हणतात की, 


"याच्यामध्ये होणाऱ्या खर्चाचा हिशोब लावला तर ते आकडे खूप मोठे आहेत, पण याच्यामुळे येणारी 'मेंटल हेल्थ कॉस्ट' मोठी आहे. २२ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या फॅमिलीतले सदस्य मिळून जवळपास एक कोटी लोकांवर याचा इम्पॅक्ट होतो, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. या लोकांवर जो मानसिक ताण आलाय, त्याची किंमत पैशात मोजता येण्यासारखी नाहीये." "याच्यामध्ये होणाऱ्या खर्चाचा हिशोब लावला तर ते आकडे खूप मोठे आहेत, पण याच्यामुळे येणारी 'मेंटल हेल्थ कॉस्ट' मोठी आहे. २२ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या फॅमिलीतले सदस्य मिळून जवळपास एक कोटी लोकांवर याचा इम्पॅक्ट होतो, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. या लोकांवर जो मानसिक ताण आलाय, त्याची किंमत पैशात मोजता येण्यासारखी नाहीये."


कठोर कायदे करूनही देशात पेपर फुटीचे प्रकार सुरूच…  


देशातील स्पर्धा परीक्षांमधील वाढते पेपरफुटीचे प्रकार आणि गैरव्यवहार कायमचे रोखण्यासाठी केंद्र सरकारने 'सार्वजनिक परीक्षा  कायदा, २०२४' लागू केला. या कायद्याचा मुख्य उद्देश प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्या, सॉल्वर गँग आणि परीक्षा प्रक्रियेतील भ्रष्ट खाजगी किंवा सरकारी संस्थांवर कठोर कारवाई करणे हा आहे. 


User Image

या कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना थेट लक्ष्य न करता, या गैरप्रकारांमागील मुख्य सूत्रधारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या नव्या आणि अत्यंत कठोर कायद्यानुसार, पेपर फोडणाऱ्या किंवा सिस्टीम हॅक करण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीला ३ ते ५ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तर संघटित गुन्ह्यांसाठी  ५ ते १० वर्षांचा तुरुंगवास आणि तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. पण असे कठोर कायदे करूनही देशात पेपर फुटीचे प्रकार सुरूच आहेत. 


खान सर म्हणतात, “डायपरदेखील लीक होत नाही…”


प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी एनटीएवर जोरदार टीका करत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप केला. एनटीएचे नाव बदलून 'नेव्हर ट्रस्टेबल एजन्सी' करा, असा टोलाही त्यांनी लगावला. दहा रुपयांना मिळणारे लहान मुलाचे डायपरदेखील लीक होत नाही, पण परीक्षेचे पेपर लीक होतात, असा संताप यावेळी खान सरांनी व्यक्त करत एनटीएच्या विश्वासार्हतेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारी संस्थांवर परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली आहे की पेपर फोडण्याची असे ताशेरेही त्यांनी ओढले.


नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…


2024 ला पेपर फुटला होता. त्यापासून एनटीएने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. वास्तविक अशा केसमध्ये दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून पुन्हा पेपर लीक करायची कोणाची हिंमत होता कामा नये. अन्यथा मुलांचा आयुष्याशी आणि भविष्याशी क्रूर खेळ सुरू राहील. एके दिवशी परीक्षा व्यवस्थेवरील मुलांचा, पालकांचा आणि शिक्षकांचा विश्वास कायमचा उडून जाईल. अशी भीती भाऊ चासकर व्यक्त करतात. 


User Image

हा सर्वकाही प्रकार नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधूनच घडलाय.हा शासकीय सिस्टीममधला लिकेज आहे, त्यामुळे याची जबाबदारी शासनाला स्वीकारायलाच लागेल, असं डॉ. अन्नदाते यांचं मतं आहे. 

ते म्हणतात की,


"येणाऱ्या काळात कधीही असा गैरप्रकार होणार नाही, याची शाश्वती शासनाने द्यायला हवी. कुणीतरी पुढे येऊन ही जबाबदारी घ्यायला हवी, पण कुणीच तशी जबाबदारी घेतलेली नाही. यावर कुणाचं एक स्टेटमेंट नाही, एक ट्विट नाही, की एक कोट नाही. जेव्हा पाठ थोपटून घ्यायची असते तेव्हा तुम्ही रोज गोष्टी करता; मग किमान आता तरी ही जबाबदारी घ्या की अशा प्रकारे हे प्रकार पुन्हा होणार नाहीत."


खरं तर देशात आता परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक पाळले जात नाही, तर त्याऐवजी हे एक नवीन वार्षिक वेळापत्रकच तयार झाले आहे. याची सुरुवात परीक्षेचा पेपर फुटण्यापासून होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्यावर आणि दबाव वाढल्यावर प्रशासनाकडून परीक्षा रद्द केली जाते. लोकांचा रोष शांत करण्यासाठी सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशीची घोषणा होते. काही काळानंतर पुन्हा नव्याने परीक्षा घेतली जाते. मात्र, मूळ व्यवस्थेत सुधारणा न झाल्यामुळे पुढच्या वर्षी किंवा पुढच्या परीक्षेला पुन्हा पेपर फुटीपासून या चक्राची पुनरावृत्ती होते. 


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...