Skip to main content

Tag: bollywood news

Browse all articles tagged with "bollywood news"

लाईट्स, कॅमेरा… शोषण! ग्लॅमरच्या प्रकाशामागचा अंधार
ग्राउंड रिपोर्ट

लाईट्स, कॅमेरा… शोषण! ग्लॅमरच्या प्रकाशामागचा अंधार

बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणाऱ्या चकाकीमागे १६-१८ तास राबणाऱ्या कंत्राटी कामगारांचं कठोर वास्तव… महिला कामगारांसाठी टॉयलेट्स, कपडे बदलण्याच्या जागा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न… OTT आणि वेगवान कंटेंट संस्कृतीमुळे वाढलेला कामाचा दबाव… ‘बॉईज क्लब’ संस्कृतीत अजूनही दुय्यम ठरणाऱ्या महिला तंत्रज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी… करोडोंची उलाढाल करणाऱ्या उद्योगात अस्थिर उत्पन्न, उशिराने मिळणारे मानधन आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव… भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत प्रतिमेखाली दडलेलं असंघटित श्रमविश्व

4 min read
D
Dipankar
 गेल्या १० वर्षात पेपर फुटले तब्बल ८९ वेळा आणि परीक्षा पूर्णपणे रद्द झाल्या ४८ वेळा… कुठे गेला 'नवीन पेपर लीक कायदा’?
ताज्या घडामोडी

गेल्या १० वर्षात पेपर फुटले तब्बल ८९ वेळा आणि परीक्षा पूर्णपणे रद्द झाल्या ४८ वेळा… कुठे गेला 'नवीन पेपर लीक कायदा’?

परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. विश्वासार्हता किंवा पेपरफुटीच्या कारणावरून परीक्षा रद्द करण्याची ही काही पहिली वेळ नाही. देशात गेल्या १० वर्षात ८९ वेळा पेपर फुटले, त्यापैकी जवळपास ४८ परीक्षा पूर्णपणे रद्द करून प्रशासनाला त्याच्या फेरपरीक्षा घ्याव्या लागल्या. पेपरफुटीच्या अश्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच सार्वजनिक परीक्षा कायदा, २०२४ लागू केला आहे. परंतु या कायद्यामध्ये कठोर तरतुदी असूनही या घटना वारंवार का घडत आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे…

4 min read
S
Shantanu Khuje
आधीच युद्धाने होरपळलोय, त्यातच आता मॉन्सूनची हुलकावणी… देशासमोर तिहेरी संकट!
ताज्या घडामोडी

आधीच युद्धाने होरपळलोय, त्यातच आता मॉन्सूनची हुलकावणी… देशासमोर तिहेरी संकट!

यंदाच्या मॉन्सूनबाबत ‘स्कायमेट’ आणि भारतीय हवामान विभागाने काही दिवसांच्या फरकाने व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजानुसार भारतात या वर्षी मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी पाऊस पडणार आहे. गेल्या काही वर्षांतील पावसाबाबत केलेली भाकिते बहुतांश वेळा सत्यात उतरताना दिसतात. पाऊस कमी होणार असला, तरी त्यामुळे पॅनिक होण्यापेक्षा सरकार व अन्नदात्यांनी परस्पर सहकार्याने काही नियोजन केले, तर या संकटावर मात करता येईल.

5 min read
B
Bhaga Warkhade
The Video Trap: व्हायरल व्हिडिओच्या नादात अडकलेलं महाराष्ट्र राजकारण
Video content
ताज्या घडामोडी

The Video Trap: व्हायरल व्हिडिओच्या नादात अडकलेलं महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक विचित्र पॅटर्न दिसतोय कुणाचं तरी नाव पुढे येतं, त्यासोबत एखादा व्हिडिओ व्हायरल होतो, त्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात आणि काही दिवसांनी सगळं शांत होतं. नरहरी झिरवाळ, अशोक खरात प्रकरण, जयकुमार गोरे यांच्यावरचे आरोप, हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ वाद आणि किरीट सोमय्या प्रकरण अशा घटनांनी एक मोठा प्रश्न निर्माण केलाय हे सगळं नेमकं खरं आहे का, की यामागे काही वेगळंच राजकारण चाललंय? कारण प्रत्येक वेळी चर्चा होते, वाद होतो, पण सामान्य माणसाला स्पष्ट आणि सत्य काहीच समजत नाही, आणि त्यामुळेच वाढतो तो गोंधळ, संशय आणि अविश्वास. या व्हिडिओमध्ये आपण याच सगळ्या घटनांकडे एकत्रितपणे पाहण्याचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेल्या या ट्रेंडमागचं मोठं चित्र समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत...

V
Vitthal Sable
सिनेमा-वेबसिरीज क्षेत्रात ‘इराणफोबिया’, ‘इस्लामोफोबिया’ नावाचा ‘व्हायरस’ अमेरिकेने कसा पसरवला?
कला / साहित्य / सिनेमा

सिनेमा-वेबसिरीज क्षेत्रात ‘इराणफोबिया’, ‘इस्लामोफोबिया’ नावाचा ‘व्हायरस’ अमेरिकेने कसा पसरवला?

इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘तेहरान’सारख्या सिरीजमुळे ‘इराणफोबिया’ला खतपाणी घातलं जातंय का? ९/११ नंतर हॉलिवूडने इस्लामोफोबिक कथानकांना कशी चालना दिली आणि त्यातून जागतिक राजकारणावर कसा परिणाम झाला, याचा हा सखोल वेध.

7 min read
टीम बाईमाणूस
Boong's Global Journey: Manipur's Narrative from Conflict to the BAFTAs
Art/Literature/Cinema

Boong's Global Journey: Manipur's Narrative from Conflict to the BAFTAs

Against the backdrop of ethnic unrest and displacement in Manipur, the small-budget film Boong has achieved a historic first for Indian cinema, winning Best Children’s & Family Film at the 79th BAFTAs. By defeating global studio giants, this Manipuri-language narrative proves that the most powerful stories are often born in the most fractured spaces.

5 min read
R
Ritesh Shisode
NEET साठी अर्ज 24 लाख जागा फक्त 1 लाख? समानता आहे कुठे आणि खेड्यातील मुलांचे भविष्य काय?
ताज्या घडामोडी

NEET साठी अर्ज 24 लाख जागा फक्त 1 लाख? समानता आहे कुठे आणि खेड्यातील मुलांचे भविष्य काय?

गेल्या काही वर्षांत NEET परीक्षेबाबत अनेक प्रश्न, वाद आणि संशय निर्माण झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन, शैक्षणिक अभ्यास आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित आकडेवारी या सर्व गोष्टी नीट व्यवस्थेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत आहेत. ग्रामीण भागातील, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकून राहणे कठीण जाते. ही बाब सामाजिक समतेच्या दृष्टीने गंभीर ठरते.

4 min read
कोणता चार्ली चॅप्लिन खरा…? बाईलवेडा, हिंसक, हुकुमशहा, विलासी आयुष्य जगणारा की पडद्यावरचा साधाभोळा, गरीब, विनोदी असलेला?
कला / साहित्य / सिनेमा

कोणता चार्ली चॅप्लिन खरा…? बाईलवेडा, हिंसक, हुकुमशहा, विलासी आयुष्य जगणारा की पडद्यावरचा साधाभोळा, गरीब, विनोदी असलेला?

चार्ली चॅप्लिन वैयक्तिक आयुष्यात इतका साधा, भोळा, स्वभावाने गरीब, विनोदी वगैरे नव्हता. तो क्वचितच हसायचा. तो संशयी होता, रागीट होता, एकलकोंडा होता, बाईलवेडा होता. पडद्यावर साधाभोळा, सज्जन, सहृदय वाटणारा चार्ली प्रत्यक्ष स्वत:च्या मुलांशी क्रूरपणे वागायचा. तो धनाढ्य होता आणि विलासी आयुष्य जगत होता. त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आले आणि त्यातल्या बहुतेक त्याच्यापेक्षा वयानं खूप म्हणजे खूपच लहान होत्या. कोणता चार्ली खरा? पडद्यावरचा? की पडद्यामागचा? आज चार्लीचा स्मृतिदिन..त्या निमित्तानं…!

6 min read
T
Team BaiManus
'धुरंधर'मधील रहेमान डकैतचे 'ल्यारी': पाकिस्तानातील ब्राझील! खतरनाक गँगवॉर अन् 'सरदार'ची दहशत
कला / साहित्य / सिनेमा

'धुरंधर'मधील रहेमान डकैतचे 'ल्यारी': पाकिस्तानातील ब्राझील! खतरनाक गँगवॉर अन् 'सरदार'ची दहशत

'धुरंधर' या चित्रपटाने ल्यारीच्या गुंतागुंतीच्या, वास्तविक जगाला पुन्हा एकदा जागतिक पटलावर आणले आहे, ज्यामुळे त्याच्या हिंसक भूतकाळाकडे आणि संघर्षमय वर्तमानाकडे अधिक सखोलपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. खरा प्रश्न हा आहे की, चित्रपटातील गोळीबाराच्या पलीकडे, ल्यारी या शहराच्या दुहेरी ओळखीची खरी कहाणी काय आहे?

8 min read
V
Vikrant Patil
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद
ताज्या घडामोडी

घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. नेहरू, पटेल यांचे नेतृत्व आणि त्याबाबत राजकीय चर्चा अनेकदा रंगत असली तरी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देश कसा बदलू शकला असता, याकडे दुर्लक्ष आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित नेते नाहीत तर ते समाजवादी विचारांचे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर खोलवर विचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेसाठी नवे मार्ग सुचले असते.

5 min read
राजेंद्र प्रसाद