
‘व्हय बाजूला, तुला काय कळतंय?’ ही पुरुषांनी वृत्ती सोडली तरच राष्ट्रीय पंचायत राज दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल…!
पंचायत राज व्यवस्थेत लाखो महिलांनी सहभाग घेतला असला तरी त्यांना अजूनही अपेक्षित सामाजिक आणि राजकीय मान्यता मिळालेली नाही. पुरुषप्रधान मानसिकता, पक्षीय राजकारणातील दुय्यम स्थान आणि निर्णय प्रक्रियेतून होणारी वगळणी यामुळे अनेक सक्षम महिला नेतृत्वाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत. राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या निमित्ताने महिलांच्या राजकीय सहभागातील या अडथळ्यांचा आणि बदलाची गरज अधोरेखित करणारा हा लेख.






