Skip to main content

तुमच्या सोशल मीडियावर ‘एआय स्लॉप’ व्हिडियो वारंवार का दिसतात?

shekhar patil
10 Dec 2025
9 views
तुमच्या सोशल मीडियावर ‘एआय स्लॉप’ व्हिडियो वारंवार का दिसतात?

- शेखर पाटील

विद्यमान वर्ष संपत असतानाच एआयच्या क्षेत्रातील एक समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली आहे. आपण युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी सोशल साईटवरून स्क्रोल करत असताना आपल्याला चित्र-विचीत्र, अतार्कीक पण आकर्षित करणारे व्हिडीओज पहायला मिळतात. हे एआय निर्मित असल्याचे तात्काळ आपल्या ध्यानात येते. तथापि, आपण एखाद्या व्हिडीओवर थबकलो की, आपल्या टाईमलाईनमध्ये याच प्रकारातील व्हिडीओ वारंवार दिसू लागतात. याला म्हणतात 'एआय स्लॉप'.... आणि याचीच आज जगभरातील युजर्सला डोकेदुखी झालेली आहे. हा प्रकार यंदा इतका गाजत आहे की, मॅक्वायर डिक्शनरी आणि 'द इकॉनॉमिस्ट'ने याला 'वर्ड ऑफ द इयर'चा बहुमान दिला. तथापि, याच स्लॉपमुळे इंटरनेटच्या भवितव्याबाबत अनेक तज्ज्ञांना चिंता लागली आहे.

खरं तर स्लॉप याचा शब्दश: अर्थ-डुकरांना टाकण्यात येणारे शिळे व निकृष्ट दर्जाचे अन्न असे आहे. तर सायबर विश्वात एआय स्लॉप म्हणजे कृत्रिम बुध्दिमत्तेच्या मदतीने तयार करण्यात आलेले अतिशय सुमार दर्जाचे काँटेंट होय. हा डिजीटल काँटेंट खूप कमी गुणवत्तेचा, निरर्थक आणि केवळ सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात येतो. हा अतिशय आकर्षक अशा पध्दतीत सादर करण्यात येत असल्याने युजर्स याला पाहण्यासाठी जातात, तथापि, यातून त्यांना सकस असे काहीही मिळत नाही.

अनेक तज्ज्ञांच्या मते एआय स्लॉप म्हणजे एक प्रकारचे 'डिजीटल जंक फूड' होय. याचा युजरला काहीही लाभ होत नाही. मात्र सोशल साईटच्या अल्गोरिदमशी ते सुसंगत असल्यामुळे ते इंटरनेटच्या विश्वात तात्काळ व्हायरल होते. याचमुळे आज या प्रकारातील काँटेंटच्या निर्मितीला अक्षरश: ऊत आल्याचे दिसून येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते येत्या एक-दोन वर्षातच युट्युबवरील 90 टक्के व्हिडीओज हे एआय स्लॉप या प्रकारातील असतील.



एआय स्लॉप व्हिडियो कसे ओळखायचे?

एआय स्लॉप ओळखणे तसे फारसे कठीण नाही. याची काही खास वैशिष्टये आहेत. यात प्रामुख्याने भावनाशून्य वाटणारा रोबोटिक यांत्रिक ध्वनी, फेक न्यूज, डिपफेक व्हिडीओज, काल्पनिक कथा, इतिहासकालीन तथ्यहीन स्टोरीज, प्राण्यांचे अवास्तव व्हिडीओज, सेलीब्रिटीजचे बनावट व्हिडीओज, चित्रपटांचे बनावट ट्रेलर्स आदी सर्व बाबी एआय स्लॉप या प्रकारातील गणल्या जातात.

आज गुगल व्हीईओ-3, सोरा, चॅटजीपीटी, मिडजर्नी, इलेव्हन लॅब्ज आदींसारख्या एआय टुलचा वापर करून कुणीही एआय निर्मित व्हिडीओज फार परिश्रम न करताना देखील तयार करत असल्याने जगभरात एआय स्लॉपची अक्षरश: त्सुनामी आल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाचा अल्गोरिदम याला प्रोत्साहन देत असल्याने ते तात्काळ तुफान व्हायरल होतात. यामुळे सोशल साईटवर एआय स्लॉपचा अक्षरश: महापूर आल्याचे आजचे चित्र आहे.  

एआय स्लॉप या प्रकारातील व्हिडीओज हे मानवी मनाला तात्काळ आकर्षित करणारे असल्यामुळे याला मोठी लोकप्रियता लाभली आहे. तथापि, याच्यामुळे खऱ्या-खुऱ्या मानवी सर्जनशीलतेवर मोठा आघात झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हणजे कुणी युजर परिश्रम करून एखादा खरा व्हिडीओ तयार करत असेल, आणि दुसरा युजर काही मिनिटांमध्ये एआय व्हिडीओ तयार करून त्याला तात्काळ जास्त व्ह्यूज मिळत असतील तर मानवी सृजनशीलतेचे काय? हा प्रश्न उपस्थित झाला असून याचमुळे एआय स्लॉप हा चिंतेचा विषय बनलेला आहे.

एआय स्लॉपचा लहान मुलांवर गंभीर परिणाम

वरकरणी पाहता, फेसबुक, युट्युब आदींवर एआय निर्मित अवास्तव व्हिडीओजला आळा घालण्यासाठी नियमावली असली तरी ती फार वरवरची असून यात अनेक त्रुटी आहेच. क्रियेटर्स याचाच फायदा उचलत बेसुमारपणे स्लॉप व्हिडीओज तयार करत आहेत. हे खोटी माहिती आणि अपप्रचाराचा प्रसार करण्याचे एक शक्तीशाली माध्यम बनले आहे. याचा मानवी मनावर आणि विशेष करून बालकांच्या मनोदशेवर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. मुलांची जडणघडण होण्याच्या वयात त्यांनी वारंवार एआय स्लॉप पाहिले तर जगाबाबतची त्यांची समज ही कायमची प्रभावीत होण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. म्हणजेच हा प्रकार थेट मानवी मनावर आघात करणारा असल्याची बाब ही अतिशय चिंताजनक अशीच आहे.



एआय स्लॉपचा सर्वात मोठा धोका म्हणजे मानवी श्रमांचे अवमूल्यन होय. यामुळे कोणतेही श्रम न करता सवंग स्टोरीज तयार करणे सहज शक्य झाले आहे. यासोबत वलयांकीत व्यक्तींच्या प्रतिमा, व्हिडीओ, आवाज आदींची चोरी करून यापासून बनावट काँटेंट तयार करण्याला गती मिळाली आहे. तर, चित्रपट, गाणी, गीत-संगीत आणि अन्य  कलाकृतींची चोरी करून याच्या अतिशय सवंग अशा आवृत्त्या सोशल मीडियात व्हायरल केल्या जात आहेत. तंत्रज्ञानाने आधीच सत्य आणि असत्यातील सीमारेषा धुसर केली होती. एआयने तर ही रेषाच पुसुन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भविष्यात इंटरनेट हे फक्त आणि फक्त एआय निर्मित काँटेंटनेच भरलेले राहील की काय ? अशी भिती व्यक्त करण्यात येत असून ती सार्थ देखील आहे.

साहित्य, कला, संगीत या क्षेत्रांनाही अधिक धोका

एआय स्लॉप केवळ डिजिटल जगापुरता मर्यादित नाही, तर तो भौतिक जगातही पोहोचला आहे. स्थानिक कला बाजारांमध्ये, एआय-निर्मित कलाकृती कॅनव्हास आणि प्रिंट्सवर "हस्तनिर्मित" म्हणून विकल्या जात आहेत. यामुळे खऱ्या कलाकारांना आर्थिक फटका बसत आहे कारण त्यांना या स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात तयार केलेल्या उत्पादनांशी स्पर्धा करावी लागत आहे. एआय द्वारा तयार करण्यात आलेले लेख, पुस्तके, प्रतिमा, व्हिडीओ, गाणी आदींनीही अशाच प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे आज आपण अनुभवत आहोत.

विशेष बाब म्हणजे, एआय-व्युत्पन्न सामग्रीमुळे गंभीर नैतिक आणि कायदेशीर चिंता निर्माण झाल्या आहेत. अनेक कंपन्या परवानगीशिवाय लेखक/पत्रकारांचे लिखाण, कलावंतांचे आवाज/प्रतिमा आणि कलाकारांची कामे चोरून स्वतःच्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करत आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कॉपीराइटचे उल्लंघन होत आहे. याव्यतिरिक्त, परवानगीशिवाय अश्लील प्रतिमा तयार करण्यासाठीही एआयचा गैरवापर होत आहे, जे एक मोठे सामाजिक संकट आहे.



एआय स्लॉपच्या निर्मितीत सध्या सोशल मीडियात जे स्वयंघोषीत काँटेंट गुरूचे फुटलेले पेव हे देखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत मानले जात आहे. युट्युबवर 'फेसलेस चॅनल' तयार करून लाखो रूपये कमवा !'' अशा आशयाचे असंख्य व्हिडीओज शेअर केले जात आहेत. यातून सृजनाची क्षमता नसतानाही अनेक जण बेसुमारपणे एआय व्हिडीओज शेअर करत आहेत. आणि आता या प्रकाराचा अक्षरश: वणवा पेटल्याचे दिसून येत आहे.  फेसबुक, इन्स्टाग्रामचे रील्स व युट्युब शॉर्टच्या स्वरूपात याला तुफान लोकप्रियता लाभली आहे.

याचमुळे एआय निर्मित सुमार, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओजला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. यात प्रामुख्याने अशा प्रकारच्या व्हिडीओजवर ठसठशीत आणि स्पष्ट दिसेल अशा प्रकारचे 'लेबलींग' लावणे अत्यावश्यक आहे. फसव्या आणि बनावट काँटेंटबाबतचे धोरण हे अधिक कठोर बनविण्याची गरज देखील अधोरेखीत झाली आहे आणि याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद देखील आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोणत्याही व्यक्तीचा आवाज, प्रतिमा किंवा ओळख ही त्याच्या परवानगी शिवाय वापरण्यावर पूर्णपणे बंदी आवश्यक आहे. यासोबत कोणताही व्यक्ती वा ब्रँडची बदनामी करणारा मजकूर हा सोशल साईटवरून तात्काळ डिलीट करणारी प्रभावी यंत्रणा स्थापित करणे ही देखील आज काळाची गरज बनलेली आहे.

टेक कंपन्यांचा दुटप्पीपणा

तथापि, यासाठी टेक कंपन्या तयार होतील का ? हा सर्वात मोठा प्रश्न होय. वरकरणी सर्व कंपन्यांनी एआय स्लॉपचा प्रतिकार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे याच कंपन्या आपल्या मंचावर एआय स्लॉप तयार करणारे टुल्स देत आहेत. विविध सोशल साईटचा हा दुटप्पीपणा एआय निर्मित काँटेंटला प्रतिकार न करता, त्यांना उघड प्रोत्साहन देणारा असल्याची बाब अगदी उघड आहे.



एआय स्लॉपबाबत भविष्याचा वेध घेतला असता आपल्याला दोन प्रवाह प्रामुख्याने आढळून येतात. यातील नकारात्मक बाब म्हणजे हा प्रकार अशाच वेगाने सुरू राहिला तर काही वर्षातच इंटरनेट हे एआय-व्युत्पन्न सामग्रीने ओसंडून वाहू लागेल. तो एक प्रकारचा अजस्त्र डिजीटल कचरा असेल आणि यात खरी माहिती शोधणे जवळपास अशक्यप्राय होऊन जाईल. अनेक तज्ज्ञांनी यालाच 'डेड इंटरनेट' असे नाव दिले आहे.

या अंधारात एक आशेचा किरणही आहे. जसजसे लोक एआय स्लॉप ओळखायला शिकतील, तसतसे अस्सल, मानवी-निर्मित कंटेन्टचे महत्त्व वाढेल. एआयचा वापर सर्जनशीलतेला संपवण्यासाठी नाही, तर तिला वाढवण्यासाठी एक साधन म्हणून केला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे कॅमेऱ्याच्या शोधानंतर चित्रकला संपली नाही, त्याचप्रमाणे एआय मानवी सर्जनशीलतेला संपवू शकणार नाही. तर याचा सकारात्मक पैलू म्हणजे एआय टुल्स हे मानवी सर्जनशीलतेला एक नवीन उंची प्रदान करून विलोभनीय अशा पध्दतीत सृजन करू शकतात. मात्र यासाठी टेक कंपन्यांचा निर्णय सर्वात महत्वाचा ठरणारा आहे.

 

Share this article
 पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…
कॉलम

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’च्या आवाहनात एक महत्त्वाचा प्रश्न गायब आहे तो म्हणजे भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खाद्यतेल आयातीवर का खर्च करतो? १९९० नंतरच्या धोरणांनी भारताची स्वयंपूर्ण तेलबिया अर्थव्यवस्था कशी मोडली आणि त्याची किंमत आज महाराष्ट्रातील शेतकरी कशी मोजतो आहे? सोयाबीनच्या पडत्या भावापासून ते हवामान बदलामुळे वाढलेल्या रोगराईपर्यंत, ग्रामीण भारत एका दुहेरी संकटात अडकला आहे. ‘त्याग’ नागरिकांनी करायचा, पण धोरणात्मक ‘खोडा’कडे पाहायचं नाही, हीच आजच्या अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.

4 min read
G
Girish Patil
सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…
कॉलम

सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…

गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.

4 min read
N
Nilu Damle
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
 एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?
कॉलम

एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?

सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले. या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.

5 min read
N
Nilu Damle
प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन
कॉलम

प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

- अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्रांपैकी एक असून, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासाठी ओळखले जाते. - मात्र या तेजस्वी प्रतिमेमागे व्यक्तिगत शस्त्रास्त्रांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे एक गंभीर वास्तव दडलेले आहे. - ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून, जागतिक चिंतेचा विषय बनली असून भारतासह इतर देशांसाठीही अभ्यासाचा मुद्दा ठरत आहे.

4 min read
B
Bhaga Warkhade
‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?
कॉलम

‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?

फॅक्ट-चेक युनिटच्या माध्यमातून सरकारकडून माध्यमांवर नवे नियंत्रण. सरकारच्या नव्या नियमांमुळे पत्रकारितेत वाढतेय सेन्सॉरशिपची मोठी भीती. कायद्याच्या आडून सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न.

5 min read
B
Bhaga Warkhade

Comments

Comments are currently disabled or loading...