नंदुरबारमध्ये एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपी मुख्यापकाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेने आपल्या आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेल्या भायनक प्रकाराबद्दल सांगितलं असता या प्रकरणी धडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात असून मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्यांमुळे शाळेत देखील मुली सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धडगाव तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रम शाळा तलाई येथे शिकणाऱ्या 14 वर्षीय 8 महिन्याच्या विद्यार्थिनीवर संशयित मुख्याध्यापक सायसिंग मोवाश्या वसावे याने पीडित विद्यार्थिनीवर जुलै 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत आश्रमशाळेतील कार्यालय आणि एका गावाजवळील जागेत अत्याचार केले. त्यासाठी त्याला वॉर्डन महिला ही वेळोवेळी काही तरी काम सांगून विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये पाठवत होती. ही प्रकार बाहेर सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही सदर विद्यार्थिनीला देण्यात आली.
वारंवारच्या या प्रकाराने व मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने सदर बाब तिच्या आई-वडिलांना सांगितल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक सायसिंग वसावे व वॉर्डन महिला मालती पाडवी यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहे.
ही घटना समोर आल्यानंतर, विशेषत: आदिवासी संघटनांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गावकरी आणि आदिवासी संघटनांकडून आता या घटनेतील आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
आज कोणत्याच क्षेत्रात मुली मागे नाही… मोठ्या जिद्देने आणि कष्टाने महिला आपलं ध्येय साधताना दिसत आहे… पण दुसरी आणि सर्वात वाईट बाजू म्हणजे देशाचं नाव मोठ्या करणाऱ्या मुली आणि महिला खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे… तर कोणत्यात क्षेत्रात महिला सुरक्षित नाही… फक्त क्षेत्रच नाही तर, शाळेत देखील मुली सुरक्षित नाही… त्यामुळे मुलींना शाळेत पाठवायचं की नाही?
शाळेत देखील मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत… 3.30 वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर देखील बलात्कार होत आहे. फक्त बलात्कार नाही तर, अनेक मुलींंनी यामध्ये आपले प्राण देखील गमावले आहेत… अशात महिलांच्या सुरक्षेचं काय? हा सर्वात मोठा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे…






