Skip to main content

इतिहासाने कधीही न सांगितलेली एक रक्तरंजित कहाणी : ‘रावलापाणी हत्याकांड’!

Ranjeetsingh Rajput
02 Mar 2026
5 min read
68 views
इतिहासाने कधीही न सांगितलेली एक रक्तरंजित कहाणी : ‘रावलापाणी हत्याकांड’!

रणजितसिंह राजपूत


  • जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच एक हत्याकांड आदिवासी बांधवांचे नंदुरबारच्या रावलापाणी येथे झाले होते. भारताच्या इतिहासाच्या पानांवर याची कुठेही नोंद नाही. 


  • रावलापाणीच्या जंगलात २ मार्च १९४३ च्या त्या रात्री नेमकं काय घडलं…?



जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच एक हत्याकांड आदिवासी बांधवांचे नंदुरबारच्या रावलापाणी येथे झाले होते, मात्र भारताच्या इतिहासाच्या पानांवर याची कुठेही नोंद नव्हती. ब्रिटिशकालीन नोंदींमध्ये मात्र या घटनेच्या वस्तुनिष्ठ वर्णनांचे पुरावे आहेत. एवढेच नाही तर रावलापाणी' संग्रामस्थळी अंदाधुंद गोळीबाराच्या 'निशाण्या' तेथील कातळावर आजही इतिहासाच्या स्मृती जाग्या करतात. 


आदिवासीचे हे हत्याकांड घडलं होतं, आजच्याच दिवशी म्हणजे २ मार्च १९४३ या दिवशी… नंदुरबार जिल्ह्यातील पूर्वीच्या अक्राणी महाल आणि सध्याच्या धडगाव तालुक्यातील ‘रावलापाणी’ येथे आदिवासी सत्याग्रहींवर ब्रिटिशांनी केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक आदिवासी शहीद झाले होते.


या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशभर चळवळी, सत्याग्रह, आंदोलने झाली. यात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचेही योगदान उल्लेखनीय आहे. भलेही झालेल्या बलिदानाच्या स्मृती जागविण्यात आदिवासी कमी पडले असतील म्हणून त्याचे मोल कमी होऊ शकत नाही. आजच्या शहिद दिवसा निमित्ताने इतिहासाने कधीही न सांगितलेली एक रक्तरंजित कहाणी… "रावलापाणी"!


संत गुला महाराज आणि त्यांची ‘आपधर्म’ चळवळ


देशात स्वातंत्र्याचे वारे जोराने वाहत होते. यात धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल तळोदे तालुका कसा मागे राहील? १९३० नंतरच्या काळात स्वत: आदिवासी सुमुदायाचे असलेले संत गुला महाराज यांनी समाजबांधवांसाठी उभी केलेली आत्मसन्मानाची चळवळ बाळसे धरू लागली होती. दारूबंदी, आत्म व बाह्यशुद्धी, आत्मसन्मानासाठी व कौटुंबिक स्थैर्यासाठी याला चळवळीचे रूप प्राप्त झाले होते. ‘आपधर्मा’च्या स्थापनेतून आत्मसन्मानाचा विचार रुजू लागला होता.


User Image


अशातच १९३७ च्या फैजपूर काँग्रेसला उपस्थिती देण्याच्या काँग्रेसजनांच्या प्रयत्नाला यश आले व संत गुला महाराज स्वत: अधिवेशनासाठी मोरवडहून पायी गेले, मात्र प्रस्थापितांच्या वर्चस्वामुळे संत गुला महाराजांना काँग्रेसकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस चळवळींकडे न वळता ‘आपधर्म’ चळवळ मोठी करण्याच्या कार्यात त्यांनी वाहून घेतले. याला मिळू लागलेला मोठा प्रतिसाद इंग्रज सरकार व प्रस्थापितांना डोळ्यात खुपू लागला. दुर्दैवाने १९ जुलै १९३८ ला संत गुला महाराजांना देवाज्ञा झाली. त्यामुळे संपूर्ण समाजात दारूबंदीचे पाहिलेले स्वप्न मात्र अपुरे राहिले.


त्यांच्या मृत्यूनंतर आपधर्माच्या चळवळीचे दृश्य स्वरूप वृद्धिंगत होत होते. संत गुला महाराज यांचे कनिष्ठ बंधू रामदास महाराज या चळवळीचे अध्वर्यू ठरले. चळवळीचा ओघ आटत नाही हे पाहून इंग्रजांनी नोव्हेंबर १९४१ मध्ये आरती चळवळीवर बंदी घातली. मोरवडला बंदुकधारी शिपाई ठेवण्यात आले.


जो आरतीला जाईल त्याला १ वर्षाची शिक्षा व संत गुला महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार्‍यास बंदुकीच्या गोळीचा प्रसाद अशी अफवा सर्वदूर पसरविण्यास प्रस्थापित यशस्वी झाले होते. दुसरीकडे दारूबंदीमुळे दारू व्यवसाय बुडायला लागला. प्रस्थापितांनी पिणारे-न पिणारे, खाणारे-न खाणारे अशी भांडणे लावली. यातून निर्माण झालेल्या लुटूपुटूच्या घटनांमधून कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा कांगावा करत त्यास जबाबदार संत रामदास महाराज यांना धरले गेले. त्यांना ४ मे १९४२ रोजी हद्दपार करण्याचा हुकूम तत्कालीन ब्रिटिश शासनाने बजावला.


ब्रिटिशींच्या जुलमी राजवटीविरोधात एकवटली आदिवासांची ‘आपधर्म’ चळवळ


हद्दपारीत रामदास महाराज मोरवडहून मध्य हिंदुस्थानातील राजघाट (चिखलदरा) येथे आपले कुटुंब व अनुयायांसह गेले. याच काळात देशात ‘चले जाव’ चळवळ जोरात होती. तत्कालीन धुळे जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षांनी रामदास महाराजांना पत्र लिहून हद्दपारीची मुदत संपण्याची वाट न पाहता साम्राज्यवाद्यांच्या विरोधातील संघर्षात सामील होण्याचे आवाहन केले. नानासाहेब ठकार स्वत: रामदास महाराजांना विनंती करण्यास राजघाटला गेले. या सर्वांचा परिपाक म्हणून रामदास महाराज नर्मदा नदी पार करून जिल्ह्यात परत यावयास निघाले. रस्त्यात त्यांच्याबरोबर त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सामील होऊ लागले.


User Image


बघता बघता हजारो आदिवासींचा ‘कारवा’ तयार झाला. यात स्त्रियांचाही सहभाग मोठा होता. महाराज गावोगावी समाजबांधवांशी बोलत हेाते. ‘आपधर्म’ समजवून सांगत होते. १ मार्च,१९४३ ला ‘अक्राणी महल’ या किल्ल्यावरून निघालेला हा ‘कारवा’ रावलापाणीजवळच्या निझरा नाल्यात पोहोचला. मोठमोठी झाडे, कीर्र जंगल, खोल नाला, दोन्ही बाजूला मोठ्या टेकड्या, किनार्‍यावरच मोठे बोरीचे झाड, १५००-२००० लोक थांबतील असा नाल्यातील सपाट भाग अशा स्थितीत मुक्कामासाठी स्त्री-पुरुष तेथे स्थिरावले.


रावलापाणीच्या जंगलात त्या रात्री नेमकं काय घडलं…?


महाराज परतत असल्याबाबतची खबर वरिष्ठांना आधीच कळविण्यात आली होती. सरकार त्यांच्या वाटचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. सर्वात आधी ‘बोरद’ गाव लुटले जाईल, अशी खोटी अफवा पसरविण्यात आली. परिसरात अविश्वासाचे व भीतीचे वातावरण झाले. १ मार्च १९४३ ला ‘बन’ या गावी १ पलटण इंग्रज सैनिक पोहोचवले गेले. सैनिकांनी रात्रीतून पायी जाऊन रामदास महाराजांच्या ‘कारव्या’ला नाल्याच्या दोन्ही बाजूने घेरले.


२ मार्चला सूर्योदयापूर्वी हा ‘कारवा’ मार्गस्थ होताना अचानक दोन्ही बाजूंनी नि:शस्त्र जमावावर बेछूट गोळीबार केला गेला. हे ठिकाण एवढे विचित्र आहे की, येथून पुढे वा मागे जाण्यास तातडीचा मार्ग उपलब्ध नाही. महाराजांना गोळी लागू नये म्हणून त्यांच्या अनुयायांनी ढालीसारखे घेरून ठेवले. या एकतर्फी संघर्षात १५ जणांना जागेवरच हौतात्म्य मिळाले व २८ जखमी झाले.


प्राचार्य जी. बी. शहा यांच्या ‘धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान’ या पुस्तकात हे नमूद आहे. जनार्दन वळवी (हे त्याकाळी तळोद्याला इयत्ता ७ वीत शिकत होते) यांनी दोन बैलगाडी भरून लाकडे रचावीत तशी प्रेते रचून आणल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे.


User Image


सुमारे ४० प्रेते तळोदे येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आली होती, असे ते म्हणतात. डॉ. जी. बी. शहांनी या हत्याकांडाची जनरल डायरने केलेल्या जालियनवाला हत्याकांडाशी तुलना केली आहे. एकाच ठिकाणी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक गोळीबारात धारातीर्थी पडले होते. आज त्या ठिकाणी बोरीचे झाड नाही, निझरा नाल्यात तेवढे पाणी नाही, जंगल नामशेष झालेले दिसत असले तरी इंग्रजी क्रूर प्रशासनाने केलेल्या बेछूट गोळीबाराच्या ‘निशाण्या’ या इतिहासाची साक्ष देत आहेत.


पक्क्या दगडात घुसलेल्या गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसतात. प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर वेगळ्याच वातावरणाची अनुभूती होते. डोळे पाणावतात, मस्तक नत होते. एकूण परिस्थितीची जाणीव हेाते. परकीयांचे अत्याचार कसे पाषाणहृदयी होते हे लक्षात येते.


नंदुरबार जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळातल्या दोन गोळीबारांपैकी नंदुरबारच्या घटनेत हुतात्मा शिरीषकुमारसह ५ बालकांना हौतात्म्य पत्करावे लागले. तेथे आज हुतात्मा स्मारक उभे आहे, मात्र रावलापाणीचे स्मारक अद्याप आम्ही करू शकलो नाही. तेथे स्मारक होणे ही केवळ स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देणे नाही.


त्या स्मारकापासून प्रेरणा मिळेल, आदिवासींचा खरा इतिहास उजागर होईल, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागाची माहिती ज्ञात होईल, ‘आप की जय’ चळवळीचा इतिहास कळेल. आजही २ मार्चला दरवर्षी मोरवडचे आपधर्मी न चुकता रावलापाणीच्या संग्रामस्थळी जाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतात.


Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...