
पॉझिटिव्ह बातमी : ‘नकोशा’ झाल्या हव्याशा, मुलगाच हवा या मानसिकतेत सुधारणा…!
44 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर 70 लाख मुलींचा मृत्यू रोखला गेला आहे. मात्र याचा दुसरा अर्थ असा की, दरवर्षी 10 लाखांहून अधिक मुलींना अजूनही गर्भाशयातच मारले जात आहे. ‘लाडली योजना’, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ आणि ‘कन्या विद्याधन’ यासारख्या सरकारी योजना या दिशेने सरकारने उचललेले यशस्वी पाऊल.










