Skip to main content

अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’

भगवान राऊत
08 Dec 2025
5 min read
6 views
अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’

भगवान राऊत        

अहिल्यानगर जिल्हा हा साहित्यिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप सधन आणि संपन्न आहे. विविध प्रकारचे साहित्य आणि विविध प्रकारच्या कला या जिल्ह्यात हातात हात घालून नांदतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात नाटक, चित्रपट आणि लोककला या तिन्ही कलांचा अनोखा त्रिवेणी संगम लाभला आहे. नाटक आणि चित्रपटात पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पारंपारिक लोककलांनाही सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळेच चित्रपट आणि नाटकांसाठीच्या राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारापाठोपाठ पारंपारिक लोककलेला देखील आता महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपारिक लोककला आजही मोठ्या दिमाखात विविध प्रसंगी सादर होतात. त्यामध्ये लावणी, शाहिरी, भारुड, कलगीतुरा, आदिवासी लोक नृत्य, धनगरी लोक नृत्य, गोंधळ, जागरण असे अनेक लोककला प्रकार प्रसंगानुरूप सादर केले जातात. मात्र या सर्व पारंपारिक लोककला पेक्षा वेगळ्या आणि दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या डक्कलवाराचे किंगरी वादन या लोककला प्रकाराला देखील यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात आले ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि शेवगाव तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

शेवगाव शहरातील रामनगर येथील रहिवासी पारंपारिक लोक कलावंत डक्कलवार धर्मा अमृता कांबळे याला डक्कलवाराचे किंगरी वादन या दुर्मिळ प्रयोगात्मक लोककला प्रकारासाठी यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर भातकुडगाव येथील रहिवासी प्रसिद्ध भारुड कलावंत हमीद अमीन सय्यद यांनाही संत एकनाथांच्या सोंगी भारुडासाठी महाराष्ट्र शासनाचा युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला आहे.



मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते शेवगाव तालुक्यातील या दोन्ही कलावंतांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभीषण चवरे, सहसंचालक श्रीराम पांडे, कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ, ज्येष्ठ भारुड कलावंत चंदाताई तिवाडी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एका ‘डक्कलवारा’ला राज्य पुरस्कार मिळतो तेव्हा…

डक्कलवार ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मातंग समाजातील एक पोट जात समजली जाते. बाडाच्या साह्याने किंगरी वादन करून, मोर नाचवून व मुजरा करून आपला उदरनिर्वाह करण्याची त्यांची पुरातन प्रथा परंपरा आहे. वेगवेगळ्या आकाराचे तीन भोपळे, बांबू, तारा, लाकडी खूट्या व लाकडी मोर यापासून डक्कलवार हा किंगरी हे पारंपारिक वाद्य तयार करतो. बांबूवर विशिष्ट पद्धतीने तीन भोपळे बांधले जातात.

त्या भोपळ्यांना बांबू आणि ताराच्या माध्यमातून जोडले जाते. डाव्या हाताने किंगरी वाजवतात तर उजव्या हाताच्या बोटाने लाकडी मोराची दोरी ओढून मुजरा करत व मुखाने बसवपुराण कथन करीत डकलवाराचे किंगरी वादन ही पारंपारिक लोककला सादर केली जाते. ही कला सादर केल्यानंतर मातंग समाज बांधव त्यांना दान देतात. दानाचे स्वरूप रोख रक्कम, कपडे, अन्नधान्य अशा स्वरूपाचे असते.



अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मधील रामनगर भागामध्ये डक्कलवाराचे चार ते पाच कुटुंब वस्ती करून राहतात. हे कुटुंब मराठवाड्यातून शेवगाव मध्ये 35 वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेले आहे. त्यामध्ये अमृता कांबळे हे ज्येष्ठ डक्कलवार किंगरी वादक लोककलावंत होते. ते मराठवाड्यासह सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातही भटकंती करत आपली कला सादर करीत असत. त्यांच्यापासूनच त्यांचा थोरला मुलगा धर्मा अमृता कांबळे याने किंगरी वादनाची ही कला आत्मसात केली. अमृता कांबळे यांचे कोरोना काळात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या या पारंपारिक लोककलेचा वारसा धर्मा अमृता कांबळे पुढे चालवीत आहे.

पिंपरी चिंचवड येथे झालेल्या लोककला संमेलनात तसेच अहिल्यानगर येथील लोककला महोत्सवात देखील त्याने आपली ही कला यापूर्वी सादर केली आहे. तसेच 14 ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील कलांगणच्या रंगमंचावर त्याने आपली कला सादर केली होती. महाराष्ट्रातील ही दुर्मिळ लोककला असल्याचे लोककला अभ्यासकांनी सांस्कृतिक कार्य विभागाला वारंवार सांगितले होते. त्यानुसार यावर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी त्यांचा प्रस्तावही दाखल केला होता. त्यानुसार सांस्कृतिक खात्याचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, संचालक बिभीषण चवरे व कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ यांच्या सहकार्याने आणि निवड समितीतील सदस्यांच्या माध्यमातून धर्मा कांबळे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

भारुड कलावंत हमीद अमीन सय्यद यांनाही राज्य पुरस्कार

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव व येथील रहिवासी असलेले सुप्रसिद्ध भारुड कलावंत हमीद अमीन सय्यद हे शिवशाहीर कल्याण काळे यांचे पट्ट शिष्य आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी शिवशाहीर कल्याण काळे यांना पोवाडा गायनासाठी अनेक वर्षे गायन साथ दिली. त्यांच्या मुशीतूनच हमीद सय्यद हे कलावंत तयार झाले.

मात्र पुढे त्यांनी संत एकनाथांचे सोंग लोककला प्रकार निवडला. या कलेची त्यांनी अनेक वर्षे साधना केली. गेल्या अनेक वर्षापासून ते संत एकनाथांच्या सोंगी भारुडाचे स्वतंत्र कार्यक्रम सादर करीत आहेत. महाराष्ट्रभर भारुडाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन करीत आहेत. अनेक शासकीय योजनांची माहिती देखील ते आपल्या भारुडाच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचवीत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनीही विविध लोककला महोत्सवात आपला सहभाग नोंदवला होता. त्यांना देखील यावर्षीच्या युवा राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात आले. 



शेवगाव तालुक्यातील दोन लोक कलावंतांना एकाच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविणे ही अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या पुरस्काराने अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त लोक कलावंतांचा सन्मान झाला आहे. यापासून प्रेरणा घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विविध लोककला प्रकारातील लोककलावंत देखील यापुढे अधिक मेहनत घेऊन पुरस्काराला गवसणी घालतील अशी अपेक्षा करायला मुळीच हरकत नाही.

Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod

Comments

Comments are currently disabled or loading...