
270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना…? खत अनुदानातील 'डीबीटी' क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण…!
केंद्र सरकार वार्षिक १.७ लाख कोटी रुपयांचे खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्याच्या तयारीत आहे. यामुळे सध्या ₹२७० ला मिळणारी युरियाची गोणी थेट ₹२,४०० वर पोहोचणार असून, पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या 'भांडवली धक्क्याचा' सामना करावा लागणार आहे. पारदर्शकता आणि गळती रोखण्याच्या या प्रयत्नात ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील सावकारी पाश अधिक घट्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.










