- श्वेता ठाकूर नंदा
डिझायनर गौतम गुप्ता यांच्या दक्षिण दिल्लीतील आलिशान स्टुडीयोच्या दुसऱ्या मजल्यावर लोकांची गर्दी त्यांच्या आवडीचे ट्रेंडी कपडे निवडायला जमली आहे. याच्या खालच्या मजल्यावर न विकले गेलेले आणि जुने कपडे ‘आदरपूर्वक’ ठेवण्यात आले आहेत. यांना ‘डेडस्टॉक’ म्हणतात. कधी वरच्या मजल्यावरील लोकांच्या कौतुकाचा भाग बनलेला हा डेडस्टॉक, नाविन्य आणि चंगळवादाच्या जगाच्या खूणा बनल्या आहेत. पर्यावरणावर प्रभाव टाकू शकणारा हा डेडस्टॉक त्याला टिकवण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो.
डेडस्टॉक मधले कपडे अनेकदा फेकून दिले जातात, जाळले जातात किंवा जमिनीत गाडले जातात. त्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम घडतो. पण आता डिझायनर्स आणि फॅशन जगत, या डेडस्टॉक कपड्यांपासून नवीन कापडी वस्तू, किंवा कपडे तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पर्यावरणाची चिंता, रचनात्मकता आणि व्यायसायिक कौशल्य यांच्या मेळातून हा नवीन ट्रेन्ड आता लोकप्रिय होऊ लागला आहे. 
फेकलेल्या कपड्यांमुळे पर्यावरणाला नुकसान
“वापरलेल्या कपड्यांचा पुनर्उपयोग म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणे होय. अलिकडे फॅशन आणि लाईफस्टाईल उद्योगात पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी डेडस्टॉक पुन्हा एकदा कसा वापरता येईल यावर विचार सुरू आहे. यामुळे नवीन साधनांवरील आमची गरजही कमी होते,” गुप्ता सांगतात. गुप्ता, आपल्या डिझायनर कपड्यांसाठी विणकर आणि गोदामातून डेडस्टॉक विकत घेत असतात. ते म्हणतात की फेकलेल्या कपड्यांमुळे पर्यावरणाला नुकसान होते. लोकांमध्ये आता ही जाणीव वाढत आहे की चांगले पर्यावरण असणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.
‘इंडिया वॉटर फाऊंडेशन’चे अध्यक्ष अरविंद कुमार सांगतात की घनकचऱ्याचे यामुळे व्यवस्थापन होतेच पण पाण्याचीही बचत होते. नवीन कपडे तयार करण्यासाठी पाणी जास्त लागते, विशेषतः कापूस पिकवण्यासाठी पाणी जास्त लागते. ते पाणी यात वाचते. विजेचीही बचत होते. कारण यात धाग्यांचं उत्पादन, रंगकाम, सिलाई यातील विजेचा वापर कमी होते. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. नवीन कापड नाही म्हणजे नवीन कापूस नाही, म्हणजेच त्यांना उगवण्यासाठी किटकनाशकं किंवा खतांचा वापरही होत नाही.
सरकारी आकड्यांनुसार 2022 मध्ये भारतीय वस्त्रबाजाराचे बाजारमूल्य 165 अब्ज डॉलर्स इतके होते. 2023 पर्यंत ते 350 अब्ज डॉलर्स होण्याची शक्यता आहे. कपडे आणि वस्त्र उत्पादन देशाच्या एकूण घरगुती उत्पादनात चांगले योगदान देतात. त्यांना रोजगार तयार करणारं क्षेत्र मानलं जातं. पण या उद्योगांमुळे प्रदूषणातही वाढ होते. आयडीएच, फॅशन फॉर गुड, सत्व कन्सल्टींग तसेच रिव्हर्स रिसोर्सेस इत्यादींच्या संशोधनातून हे समोर आलंय की जागतिक वस्त्र घनकचऱ्यात भारताचे योगदार 8.5 टक्के आहे. यातला 22 टक्के कचरा एकतर जाळला जातो किंवा जमिनीत गाडला जातो.
विश्व बँकेनुसार जागतिक स्तरावरील कार्बन उत्सर्जनात कापड उद्योगाची हिस्सेदारी 10 टक्के इतकी आहे. जी सर्व विमानसेवा व जहाजसेवांपेक्षा जास्त आहे. 2030 पर्यंत कापड उद्योगांमुळे ग्रीनहाऊस गॅसचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कपड्याचा कचरा कमी करणे, त्यांचा पुनर्वापर करणे तसेच त्याचा जीवनशैलीत सहभाग करणे स्वागतार्ह गोष्टी आहेत. नवीन उद्योजक डेडस्टॉकपासून वस्तू तयार करून विकत आहेत आणि लोकांचाही त्यांच्याकडे कल वाढत आहे.
सस्टेनेबल फॅशनः जुन्या कपड्यांना मिळतेय जीवदानसस्टेनेबल फॅशनः जुन्या कपड्यांना मिळतेय जीवदान
सस्टेनेबल फॅशनच्या क्षेत्रात डेडस्टॉकसोबत काम करण्यात एक आव्हान आणि डिझाइन नवोद्योगाची संधीही आहे. डेडस्टॉक डिझायनर ब्रँड, ‘जुहू बिच स्टुडीयो’ची सह-संस्थापक प्रकृति राव सांगते की डेडस्टॉक पारंपरिक डिझाइन प्रक्रियेत उलटफेर करतो. ती सांगते, “एखादी कल्पना, विषय किंवा डिझायन यापासून इथे सुरूवात होत नाही. डेडस्टॉक आधी मिळवण्यापासून याचे काम सुरू होते आणि मग ठरवलं जातं की त्यापासून काय तयार करता येईल.” डेडस्टॉकच्या आपल्या काही मर्यादा आणि विशेष आहेत. याची जाडी, रंग, बनावट, छपाई यातल्या चुका यात असू शकतात.
धाग्यांची गुणवत्ताही कमीजास्त असते. त्यामुळे नवीन वस्तू तयार करताना त्यावर प्रक्रिया करावी लागते. कापडांचे तागे आधीच एका मापात कापलेले असतात ज्यापासून विशिष्ट कापडं तयार केली जातात. पण त्यांचा आता उपयोग झालेला नसतो. यांच्यात एकच डिझाइन, रंग, आकार असतो त्यामुळे त्यांच्यापासून विविध रंगी, आकाराच्या, डिझाइनच्या वस्तू तयार करण्यात मर्यादा येतात.
‘पॅच ओव्हर पॅच’च्या कविशा पारिख म्हणतात की डेडस्टॉकच्या मर्यांदामुळे यातील आव्हाने आणि नवोद्योगाच्या संधी त्यांच्यात जोष भरतात आणि संपूर्ण निर्माण प्रक्रिया रोमांचक होते. गुजराथच्या पारिख, छपाई आणि रंगाईतील चुका लपवण्यासाठी एप्लिक, पॅचवर्क, कटवर्क आणि क्विल्टींग इत्यादींचा वापर करतात. दोन वेगवेगळ्या टेक्सस्टाईल पॅच जोडण्यासाठी त्या थ्रेड डेडस्टॉकपासून क्रोशे तंत्राने नवीन कापड किंवा पट्ट्या तयार करतात.
गुप्ता यासाठी हाताचे विणकाम अथवा सजावटी सामानाचा उपयोग करतात. पाऊच, पोटली, लटकन इत्यादी गोष्टी तयार करण्यासाठीही डेडस्टॉक वापरला जातो. गुप्ता म्हणतात की जो डेडस्टॉक अशा गोष्टींसाठीही उपयोगी नसतो त्याचे धागे वेगळे केले जातात आणि त्यातून नवे कापड विणले जाते. डिझायनर निशा चौहान त्यांच्या ‘इन जॉय लिव्हींग’ आणि ‘नो नॅस्टीज’ ब्रँड कपड्यांसाठी वापरतात. ‘नो नॅस्टीज’, डेडस्टॉक यार्न व कपडे दोन्हींचा स्त्रोत असतात. जयपूरचे कारागीर त्यांच्यासाठी जुन्या धाग्यांपासून नवीन कापड विणतात. 
जागतिक वस्त्र घनकचऱ्यात भारताचे योगदार ८.५ टक्के
फॅशन लेबल ‘डुडलेज’च्या सह-संस्थापक पारस अरोरा सांगतात की आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांच्या ब्रँडने पक्क्या रंगातील कापसाच्या कापडांवर जास्त लक्ष केंद्रीत केलं. ते सांगतात, “कालांतराने आमच्या लक्षात आलं की ग्राहक कच्च्या मालाच्या दुर्मिळतेची प्रशंसा करतात आणि त्याला एक फरक म्हणून जास्त महत्त्व देतात जर त्या कपड्याचे डिझाइन टिकून असेल. यामुळे डेडस्टॉक उत्पादनांना एक वेगळेच आकर्षण मिळते. आमच्या नवोद्योग आणि सस्टेनेबिलीटीच्या महत्त्वालाही यातून अधोरेखीत केलं जातं.”
फॅशन लेबल ‘डुडलेज’च्या सह-संस्थापक पारस अरोरा सांगतात की आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांच्या ब्रँडने पक्क्या रंगातील कापसाच्या कापडांवर जास्त लक्ष केंद्रीत केलं. ते सांगतात, “कालांतराने आमच्या लक्षात आलं की ग्राहक कच्च्या मालाच्या दुर्मिळतेची प्रशंसा करतात आणि त्याला एक फरक म्हणून जास्त महत्त्व देतात जर त्या कपड्याचे डिझाइन टिकून असेल. यामुळे डेडस्टॉक उत्पादनांना एक वेगळेच आकर्षण मिळते. आमच्या नवोद्योग आणि सस्टेनेबिलीटीच्या महत्त्वालाही यातून अधोरेखीत केलं जातं.”
कचऱ्यातून टिकावू गोष्टी, पर्यावरणीय जागृती आणि समाज कल्याणासाठी खरेदी करण्यात ग्राहकांचा कल असल्यामुळे, डिझायनर्स देखील मर्यादित प्रमाणात व लहान प्रकारात आपली उत्पादनं आणत आहेत. यातून वैशिष्ट्याची एक भावना दिसून येते ज्यामुळे ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होतात. मुंबईतील चित्रपट निर्मात्या स्मृति एस. सांगतात, “माझी इच्छा नाही की माझ्या फॅशनमुळे आपल्या ग्रहावर विपरीत परिणाम व्हावा. त्यामुळे मी असे कपडे विकत घेण्यावर लक्ष देते की जे आपल्या निसर्गासाठी चांगले असतील.”
कापड उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च सतत वाढत आहे. त्यामुळे डिझायनर डेडस्टॉकवर काम करतात ज्यात नव्या कपड्यांसाठी होणारा खर्च, भांडवल मोठ्या प्रमाणात कमी होतो. गुप्ता सांगतात की या बचतीचा उपयोग ते मजूरी, मशिन्स आणि लॉजिस्टीक्ससारख्या अन्य व्यावसायीक गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी करतो. त्यामुळे आमचा फायदा आणखी वाढतो.
वाचलेले कपडे असल्यामुळे विकत घेण्यापासून त्यांच्यापासून नवीन उत्पादन तयार करण्यासाठी लागणारा वेळही कमी असतो. साठवण्याच्या समस्येपासून यात मुक्ती मिळते. लोकांचा अशा कलेक्शनकडे कल आता वाढत आहे. डेडस्टॉक गारमेंट्स आणि एक्सेसरीजसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘रिफॅश’चे संस्थापक आकांक्षा कैला आकाशी म्हणते, ग्राहकांचा एक वर्ग पर्यावरणाप्रती सचेत आहे. त्यांना अशा एका ब्रँडची गरज होती जो पर्यावरणस्नेही असेल. 
रिफॅशवर 130 ब्रँड्स आहेत असा तिचा दावा आहे. यातील 90 स्वदेशी ब्रँड्स आहेत. दरवर्षी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून 20 टक्के वाढती विक्री होत आहे. मात्र अरोरा म्हणतात की डेडस्टॉक फॅशन पैसा कमावण्यापेक्षा पर्यावरणीय लाभांवर जास्त केंद्रीत आहे. व्यवसायापलिकडे जात, ते विणकर आणि अन्य संबंधित लोकांना नवीन रोजगार देण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचेही काम करत आहे. ही गोष्ट चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक बाब आहे.
कविशा पारिखचा दावा आहे की त्या त्यांचा सारा कच्चा माल स्थानिक बाजारातून विकत घेतात आणि गुजराथ व हिमाचल प्रदेशच्या कारागिरांसोबत काम करतात. त्या म्हणतात, “कारागिर पारंपरिक कामात तरबेज असतात पण त्यांच्यात बाजाराला कशाची गरज आहे आणि डिझाइन्स कोणती हवी आहेत याची माहिती नसते. आम्ही यावर काम करतो यातून चांगले डिझाइन्स तयार होतात आणि ही पारंपरिक कारागिरीही टिकून राहण्यासाठी मदत होते.” या सर्व चांगल्या गोष्टी आहेत पण काही तज्ञ ग्रीनवॉशिंगविषयीही सावध करतात.
‘इंडिया वॉटर फाऊंडेशन’चे कुमार म्हणतात की काही ब्रँड्स सस्टेनेबल उत्पादनांसाठी वाढत्या मागणीचा गैरलाभ उठवू शकतात. पर्यावरणतज्ञ माईक पांडे म्हणतात, “चंगळवादात अडकलेल्या जगात ‘टिकावू शर्ट’ हे शब्द ऐकायला बरे वाटतात. पण आम्हाला खोलात जाऊन या प्रश्नाचा विचार करायला पाहिजे. मूळात जास्तीचं उत्पादन करायचंच का म्हणून?” पण ब्रँड्स आणि डिझाइनर्स यांचं म्हणणं आहे की ग्रीनवॉशिंगवर होणारी टीका यावर नियंत्रण आणि संतूलन बनवण्यासाठी उपयोगीच ठरते. पण अति टीका लोकांना अशा कामांवर प्रतिकूल परीणाम करू शकते आणि काही चांगले करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरू शकते.
(सौजन्य - india.mongabay.com)
अनुवाद - प्रतिक पुरी






